जेव्हा दीपिका एक्स बॉयफ्रेंड रणबीरला करते सगळ्यांसमोर किस

जेव्हा दीपिका एक्स बॉयफ्रेंड रणबीरला करते सगळ्यांसमोर किस

दीपिका आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या फोटोमध्ये दीपिकाला चक्क किस करत आहे. पण थोड थांबा कारण या फोटोमागील स्टोरी देखील तुम्हाला माहीत असायला हवी. कारण त्यानंतर या सगळ्या वायफळ चर्चांना फुलस्टॉप मिळू शकेल. कारण पापाराझींच्या कॅमेरातून टिपलेला हा फोटो जरी तुम्हाला काही वेगळे सांगत असला तरी त्यामागील सत्य जाणून घेण्याचा अधिकारही सगळ्यांना आहे.


deepika ranbir spotted


काय आहे या फोटोमागील सत्य?


तर तुम्हाला माहीत असेलच की, दीपिका आणि रणबीरने नुकतीच एशियन पेंटसची एक जाहिरात केली. याची आधीच सगळ्या प्रसारमाध्यमांनी चर्चा केली.याच जाहिरातीचा पोस्ट इव्हेंट सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याठी दीपिका आणि रणबीर आले होते. आता अर्थात जाहिरातीमध्ये दोघे एकत्र आहेत. म्हटल्यावर एकत्र भेटणे आलेच. आता हा फोटो हे दोघे कोणतेतरी शूट संपवून आले तेव्हाचा आहे.शूट संपवून घरी परतत असताना त्यांनी एकमेकांना सीऑफ केले. आता पापाराझींनी त्यांना जेव्हा क्लिक केले तेव्हा त्यांचा तसा फोटो येणे स्वाभाविक होते. त्यामुळे यावर चर्चा करण्यासारखे काही नाही.


अभिषेकमुळे करणे रंगपंचमी खेळणे केले बंद, जाणून घ्या कारण


सिम्बावर नाचला रणबीर कपूर


रणवीर सिंहचा ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. यातील ‘आला रे आला सिम्बा’ आला हे गाणे देखील चांगलेच गाजले. एशियन पेंट्सच्या  इव्हेंटमध्ये रणबीर कपूर सिम्बाच्या गाण्यावर थिरकलासुद्धा त्यामुळे या दोघांनीही मागचे सगळे विसरुन पुढे जायचे ठरवले आहे,असेच दिसते. त्यामुळे त्यांच्या नात्यासंदर्भात गॉसिप करणाऱ्यांना त्यांनी चांगलीच चपराक दिली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#bhartisingh #ranbirkapoor and #deepikapadukone set rhe stage on fire 😃😋😎 @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
सज्ज व्हा!येतोय  बिग बॉस मराठीचा सीझन २


दीपिका झाली होती उदास


रणबीर कपूरच्या रिलेशनशीपबाबत नेहमीच काहीना काही समोर येत असते.सध्या तो आलिया भटसोबत सगळीकडे दिसतो. सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघे लग्न देखील करणार आहेत. पण रणबीरने इंडस्ट्रीत पाय ठेवल्यापासून चित्रपट कमी पण अफेअर्स जास्त केले आहेत. त्याने आतापर्यंत अवंतिका मलिक, दीपिका पडुकोण, कतरीना कैफ यांना डेट केले आहेत. त्याचे अनेक फोटो त्यावेळीही चर्चेचा विषय ठरत होते. दीपिकासोबत रिलेशनशीपमध्ये असताना ही जोडी लग्न करणार अशी चर्चा होती. पण त्यांचे नातेही फार काळ टिकू शकले नाही. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका जरी दुखावली गेली असेल. तरी तिने काम थांबवले नाही. या दोघांनी ब्रेकअपनंतर ‘ये जवानी ये दिवानी’ आणि ‘तमाशा’ हे दोन चित्रपट केले. त्यांच्यातील नाते विसरुन त्यांनी प्रोफेशनलिझम पाळला आणि चित्रपटात काम केले.


ऐन उन्हाळ्यात रणवीरला भरली का भरली थंडी


ब्रम्हास्त्रचे शुटींग सुरु


रणबीर सध्या त्याची गर्लफ्रेंड असलेल्या आलियासोबत चित्रपट करत आहे. करण जोहरच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा लोगो रिलीज करण्यात आला. हा चित्रपट पुराणकथेतील असून इंडियन सुपरहिरोवर आधारीत असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट तर तगडी आहे. या चित्रपटाशिवाय आलियाकडे तेलगु चित्रपट 'रामा रावणा राज्यम' हा देखील चित्रपट आहे. एस.एस.राजमौलीचा हा मोठा प्रोजेक्ट आहे.


bramastra fi


(सौजन्य-Instagram)