जेव्हा दीपिका पदुकोण विसरली की, तिचं लग्न झालंय

जेव्हा दीपिका पदुकोण विसरली की, तिचं लग्न झालंय

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची जोडीही बॉलीवूडमधील सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. दोघंही नेहमीच एकमेंकाबद्दलचं त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. लग्नापासून ते अगदी प्रत्येक वेळेला दोघंही जेव्हा सोबत असतात तेव्हा ते फॅन्स आणि मीडियाने घेरलेले असतात. पण यावेळी मात्र असं काही झालं की, दीपवीरचे फॅन्स झाले आश्चर्यचकित. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोण चक्क विसरली की तिचं लग्न झालंय आणि ती रणवीर सिंगची बायको आहे.

आता तुम्हाला माहीत असेलंच की, दीपिका पदुकोणचं लिव्ह लव लाफ (Live Love Laugh) नावाने एक फाऊंडेशन आहे. दीपिकाने डिप्रेशनसह अन्य मानसिक रोगांनी पीडितांसाठी खासकरून या एनजीओची उभारणी केली. नुकतंच या एनजीओला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दीपिकाने मानसिक आरोग्य या विषयावर पहिलीवहिली लेक्चर सीरिज सुरू केली. याच फाउंडेशनच्या लेक्चर सीरिजदरम्यान झाला पुढील किस्सा.

या इव्हेंटमध्ये दीपिकाही सामील झाली होती. ज्यातील व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका सांगत आहे की, “मी एक मुलगी आहे, बहीण आहे आणि अभिनेत्री आहे” त्यानंतर ती थांबते. तेव्हा शो होस्ट तिला सांगते की, ती एक पत्नीसुद्धा आहे. तेव्हा दीपिका हसते आणि म्हणते की, हो मी एक पत्नीसुद्धा आहे. हे देवा...मी तर विसरलेच होते. दीपिकाने असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

खरंतर दीपिकाने स्वतःसुद्धा डिप्रेशनचा सामना केला आहे. त्यामुळे ती या विषयाची गंभीरता समजते आणि तिला याबाबत जास्तीत जागरूकता करण्याचा प्रयत्न करत आहे. 'लिव्ह लव लाफ' (Live Love Laugh) फाउंडेशनची स्थापना तिने याच हेतूने केली आहे. दीपिकानुसार, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी नवरा रणवीर सिंगचा मोठा हात आहे. रणवीरच्या साथीनेच तिने या समस्येचा लढा दिला होता.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं लग्न 2018 साली झालेल्या सर्वात ग्रँड लग्नांपैकी एक होतं. त्यांचं लग्न खूपच खाजगी पद्धतीने झालं होतं. इटलीतील लेक कोमो या निसर्गरम्य ठिकाणी त्यांचं लग्न झालं होतं. एवढंच नाहीतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही मोबाईल किंवा कॅमेरासोबत ठेवण्याची परवानगी नव्हती. या दोघांचा लवकरच एकत्र भूमिका असणारा 83 हा सिनेमाही येत आहे. तसंच छपाक नावाचा एसिड पीडितेवरच्या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका अभिनेत्री आणि निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.