जेव्हा एकता कपूरने तुषारच्या ‘या’ गोष्टीवर रागावून केला होता पोलिसांना फोन

जेव्हा एकता कपूरने तुषारच्या ‘या’ गोष्टीवर रागावून केला होता पोलिसांना फोन

बॉलीवूडमध्ये भावंडाच्या  अशा अनेक जोड्या आहेत ज्या सतत चर्चेचा विषय ठरतात. डेलीसोप क्वीन एकता कपूर आणि  अभिनेता तुषार कपूर ही अशी एक जोडी आहे. एकता कपूर आणि तुषार कपूर सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. या दोघांनाही मुलं झाली आहेत. मात्र आजही ते दोघं लहान मुलांप्रमाणे भांडत असतात. वास्तविक त्या दोघांमध्ये प्रचंड प्रेम आहे.  एवढंच नाही तर एकता तिचा मुलगा 'रवी' आणि तुषार कपूरचा मुलगा 'लक्ष' दोघांवरही सारखंच प्रेम करते. ती तिच्या मुलाचे आणि लक्षचे फोटो सतत इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मात्र आजही एकता आणि तुषारमध्ये लहानपणीचं प्रेम आणि भांडण कायम आहे.  नुकतंच एकताने असा एक किस्सा सांगितला जेव्हा एकताने तुषारचा राग आल्यामुळे थेट पोलिसांना फोन लावला होता.

एकताने सांगितली ही मजेशीर गोष्ट

'कपिल शर्मा का शो' हा एक लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रेटी आपल्या प्रमोशनसाठी येत असतात. बऱ्याचदा कपिलशी बोलताना हसतखेळत या सेलिब्रेटीजच्या काही वैयक्तिक गोष्टी देखील उघड होतात. काही दिवसांपूर्वी एकता कपूर आणि तुषार कपूर कपिल शर्माच्या शोमध्ये दाखल झाले होते. यावेळी बोलता बोलता तुषार आणि एकताच्या बालपणीचे अनेक किस्से उघड झाले. एकताने तुषार आणि तिच्यामध्ये असलेल्या बॉडिंगविषयी सांगताना हा मजेशीर किस्सा सांगितला होता. ज्यामध्ये तुषारशी भांडण झाल्यामुळे त्याच्यावर रागावून एकताने थेट पोलिसांना फोन लावला होता.

फॅमिली ट्रिपमध्ये झालं होतं हे भांडण

एकताच्या मते सर्वच भांवडांप्रमाणे तुषार आणि तिच्यातही सतत भांडणे होतात. एकदा ते दोघं त्यांच्या आईवडील म्हणजेच जितेंद्र आणि शोभा कपूरसोबत तिरूपतीला गेले होते. फिरायला गेल्यावर तुषार आणि एकतामध्ये नेहमीप्रमाणे भांडण झालं. ज्यामध्ये भांडताना तुषारने एकताच्या नाकावर एक मुक्का मारला. मात्र याचा एकताला इतका राग आला की तिने यासाठी थेट पोलिसांनाच फोन लावला होता. आजही ते दोघं फॅमिली ट्रिपसाठी जाताना वेगवेगळ्या कारमधून जातात. कारण एकाच कारमधून गेलं तर त्या दोघांची भांडणं नक्कीच होतात. याबाबत तुषार कपूरने सांगितलं होतं की, “लहानपणी तर आम्ही इतकं भांडायचो की शाळेतून घरी येताना आमच्या शर्टाची बटणं तुटलेली असायची." हे सांगत असताना त्या दोघांच्या डोळ्यात मात्र आपल्या भांवडाबद्दलचं प्रेम नक्कीच दिसत होतं. शिवाय यावरून त्यांच्यातील प्रेम अजूनही लहानपणीसारखंच आहे हे दिसून येत होतं.

एकता आणि तुषारचे अतूट नातं

बहीण भावाचं नातं नेहमीच अतूट असतं. कारण त्यांच्यात कितीही भांडण झालं तरी शेवटी भावंडं एकमेकांच्या पाठीशी सदैव असतात हेच सिद्ध होतं. एकता आणि तुषारचं नातं देखील असंच आहे. एकता कपूरला तिच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळालं असलं तरी तुषार अभिनय क्षेत्रात फार यश मिळवू शकला नाही. मात्र आज तो जे काही आहे त्याच्या मागे त्याची बहीण या नात्याने एकता खंबीरपणे नक्कीच उभी आहे. 

एकता कपूरने का केलं नाही अजून लग्न

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. बालाजी टेलिफिल्मचा डोलारा सांभाळणारी एकता कपूर अजूनही अविवाहीत आहे. जितेंद्रच्या एका अटीमुळेच एकता कपूर अजूनही अविवाहीत असल्याचे म्हटलं जाते. एकता कपूर हिचे लग्न न करण्यामागचे कारण आहेत जितेंद्र. जितेंद्र यांनी  एकताला लग्नासंदर्भात एक अट घातली होती. ते म्हणाले होते की, लग्न आणि काम या पैकी एकाची निवड तुला करावी लागेल. एकताने कामाला पंसती देत लग्नाचा विचार मनातून काढून टाकला आणि तिने कामात स्वत:ला वाहून घेतले.

अधिक वाचा

एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय

म्हणून एकता कपूर करत नाही तिच्या मुलाचे फोटो शेअर…

जितेंद्रच्या एका अटीमुळे मालिका क्वीन एकता कपूरने केलं नाही लग्न

फोटोसौजन्य - इन्साग्राम