या कारणासाठी जान्हवी कपूरने फोटो काढण्यास दिला नकार

या कारणासाठी जान्हवी कपूरने फोटो काढण्यास दिला नकार

जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. श्रीदेवीची मुलगी असल्याने तिला आधीपासूनच सतत प्रसिद्धी मिळत आहे. शिवाय धडक चित्रपटानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीवर पापाराझींची नजर असते. अनेकवेळा यासाठी तिला तिच्या जीमबाहेर अथवा इतर ठिकाणी सतत स्पॉट केलं जातं. जान्हवीचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि सह्रदयी आहे हे तर सर्वांना माहीतच आहे. मात्र नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जान्हवी पापाराजींना दम भरताना दिसत आहे. 

जान्हवीसोबत नेमकं काय झालं...

झालं असं की जान्हवी कपूर एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्याजवळ रस्त्यावरील एक गरीब मुलगी खाण्यासाठी मागण्यासाठी आली. जान्हवी तिला खाण्याचे काही पदार्थ देत होती. तेवढ्यात पापाराझींची नजर तिच्यावर पडली. ज्यामुळे तिला फोटोग्राफर्सनी घेरलं आणि ते फोटो  क्लिक करू लागले. मात्र जान्हवीने रागावून त्यांना कॅमेरा बंद करण्यास सांगितलं. जान्हवी म्हणाली, "प्लीज एका सेंकदासाठी तुम्ही हे सर्व बंद करा. खूप विचित्र वाटत जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी...." मात्र असं करूनही काही फोटोग्राफर्सनी या घटनेचे फोटो काढलेच. ज्यामुळे जान्हवीला फार राग आला. जान्हवीने त्यानंतर त्या मुलीला खाण्यासाठी देण्यासाठी काही खाऊची पाकीटं गाडीतून काढून दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. 

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपट 'रूह अफ्जा'ची तयारीदेखील करत आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी असून ती या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यासोबत दिसणार आहे. यासोबतच ती करण जोहरच्या 'तक्त' या अॅक्शनड्रामामध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. यासोबत जान्हवी ‘दी कारगिल गर्ल’ आणि ‘दोस्ताना 2’ मध्येदेखील झळकणार आहे. दोस्तानाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी जान्हवी अमृतसर मधील सुवर्णमंदीरात गेली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन सोबत दिसणार आहे. जान्हवीने सुवर्णमंदीरातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.   थोडक्यात जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने स्टार किड असल्यामुळे तिला पदार्पणातच अनेक चित्रपट मिळाले आहेत. मात्र आता या आगामी चित्रपटांमधून चाहत्यांच्या जान्हवीच्या अभिनयाबाबतच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

अभिनेत्री स्मिता तांबेच्या अभिनयाची नवी भरारी

शाहरुख-सलमान-आमीर खान पुन्हा येणार एकत्र,दिसणार या चित्रपटात

बैजू बावरा'मध्ये रणवीरऐवजी ऋतिक होणार संजय लीला भन्सालीची बैजू

खतरों के खिलाडी' रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

जेव्हा विराट-अनुष्काला त्या कुटुंबाने ओळखलंच नाही