खरंच महेश भटने कंगनावर फेकली होती का चप्पल

खरंच महेश भटने कंगनावर फेकली होती का चप्पल

मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झांसी चित्रपटाच्या यशानंतर कंगना रणौत चा उत्साह अधिकच वाढला आहे. कंगना आजकाल रणवीर आणि आलियावर सतत टीका करत आहे. कंगना प्रमाणेच तिची बहीण रंगोलीदेखील आता या दोघांच्या मागे लागली आहे. कारण नुकतच रंगोलीने आलियाची आई सोनी राझदान यांच्यावर निशाणा साधला आहे. रंगोलीने सोनी राजधान यांना टॅग करत एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिने महेश भट यांच्यावर काही आरोप केले आहेत.


सोनी राझदान आणि आलियाबाबत केलं हे वक्तव्य


काही दिवसांपूर्वी कंगनाची बहीण रंगोली हिने “सोनी राझदान आणि आलिया भट या भारतीय नाहीत आणि त्या दोघी भारतात राहण्याचा गैरवापर करीत आहेत” असं म्हटलं होतं. कारण सोनी राझदान आणि आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्व असल्यामुळे त्या दोघी भारतात मतदान करू शकत नाहीत. याचा फायदा घेत रंगोलीने त्या दोघींवर तोंडसुख घेतलं होतं.सोनी राझदान यांचे प्रतिउत्तर


रंगोलीने केलेल्या टीकेवर सोनी राझदान यांनी कडक शब्दात तिला प्रती उत्तर दिलं आहे. “कंगनाला चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक महेश भटने दिला होता. आता तिच महेश भट यांच्या पत्नी आणि मुलीवर सतत टीका करत आहे. यावर बोलण्यासारखे आता काहीच उरले नाही.”


mahesh bhatt threw a chappal at kangana ranaut 2


सोनी राजधान आणि रंगोलीचा वाद एवढ्यावरच शांत झाला नाही. तर त्यानंतर रंगोलीने महेश भट यांच्यावर कंगनावर चप्पल फेकून मारल्याचा आरोप केला आहे. रंगोलीच्या मते 2006 साली ‘ वो लम्हे’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान ही घटना घडली होती. कंगनाने ‘धोका’ चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. धोकामध्ये कंगनाने सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र कंगनाने ती साकारण्यास नकार दिला होता. यावर चिडून महेशने कंगनावर पायातील चप्पल फेकून मारली होती. या घटने दरम्यान कंगना सोळा वर्षांची होती. या घटनेमुळे ती एवढी घाबरली की संपूर्ण रात्र तिने रडून काढली होती.


रंगोलीचा राग अनावर


शिवाय यासोबतच रंगोलीने पुन्हा सोनी राझधान यांनी ट्वीटरवर प्रतिउत्तर दिलं आहे. “प्रिय सोनीजी, महेश भट यांनी कंगनाला ब्रेक दिला नसून अनुराग बासु यांनी दिला होता. कारण महेश भट त्यांच्या भावच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यामुळे मेहश भट त्या प्रॉडक्शन हाऊससे मालक नक्कीच नव्हते. ” या दोघींचे एकमेकींवर टीका करणे थांबतच नसल्याने हा वाद आता किती चिघळणार हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र यामुळे बॉलीवूडमधील वातावरण मात्र नक्कीच गढूळ झाले आहे.

आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत


आलियावर कंगना पुन्हा बरसली, आलियाच्या अभिनयावर केली टीका


मिस वर्ल्डपासून ते हॉलीवूडपर्यंतचा प्रियांका चोप्राचा बदललेला लुक आहे कसा


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम  आणि ट्वीटर