जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते

जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे हॉट कपल म्हणून ओळखलं जातं. प्रियांका आणि निक नेहमीच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं दिसून येतं. पण खरं तर आपल्याला एक सामान्य माणूस म्हणून नेहमीच प्रश्न पडतो की, हे दोघं भांडत असतील का? अर्थात जगातलं कोणतंही कपल भांडतंच. पण जेव्हा लग्न झाल्यानंतर गोष्ट एक्स गर्लफ्रेंडची असते तेव्हा. तेव्हा नक्की काय प्रतिक्रिया असते अशा सेलिब्रिटीजची. नुकताच असा एक प्रकार समोर आला आहे. निक जोनासची एक्स गर्लफ्रेंड माईली सायरस होती हे सर्वांनाच माहीत आहे. तर प्रियांका आणि निक आता लग्नानंतर अतिशय आनंदी असल्याचंही त्यांच्या सोशल मीडियाच्या फोटोजवरून सर्वांना दिसत आहे मग असं काय झालं की, निक आणि माईली एकमेकांबरोबर चॅट करत होते. थांबा...थांबा...लगेच तुम्ही तर्कवितर्क लढवू नका. नक्की काय झालंय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच.


माईलीने केला निकला डायरेक्ट मेसेज


miley and nick msg


माईली सायरस आणि निक कधीच एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर प्रियांका निकच्या आयुष्यात आली आणि दोघांनी लग्न केलं. माईलीने नुकताच एक जुना फोटो निकला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवला. त्यामध्ये तिच्याबरोबर तिची लहान बहीणही आहे. पण या फोटोमध्ये खास गोष्ट अशी होती की, तिने जोनासब्रदर्सचा टी - शर्ट घातला होता. हा फोटो पाहिल्यानंतर निकने त्या फोटोला अप्रतिम, हा फोटो खरंच खूप हॉट आहे अशी प्रतिक्रिया पाठवली. माईली इतक्यावरच नाही थांबली तर तिने स्क्रिनशॉट काढून हा पोटो सोशल मीडियावरही गंमत म्हणून पोस्ट केला. त्यावर तिने खास कॅप्शन लिहिलं. ज्यामध्ये तिने लिहिलं की, ‘जेव्हा तुमच्या एक्स बॉयफ्रेंडला माहीत आहे, हा जुना फोटो हॉट आहे.’ काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर प्रियांकालादेखील कळलं की, निकने माईलीशी चॅट केलं आहे. त्यामुळे प्रियांका आता निकवर चिडेल असं सर्वांनाच वाटलं


प्रियांकाची प्रतिक्रिया अचंबित करणारी


nick and priyanka


यावर आता प्रियांका नक्की काय उत्तर देणार असंही सगळ्यांना वाटलं. पण प्रियांकाची प्रतिक्रिया ही अचंबित करणारी होती. प्रियांका अजिबात त्यावर चिडली नाही. तर तिने त्यावर वेगळीच प्रतिक्रिया दिली. ‘हाहाहा...हबी बरोबर आहे. हा फोटो खरंच खूप हॉट आहे.’ प्रियांकाने आपल्या प्रतिक्रियेमधून आपण एक चांगली पत्नी असून या गोष्टींचा नात्यावर कोणताही फरक पडणार नसल्याचं एका अर्थी दाखवून दिलं आहे. इतकंच नाही तर प्रियांका आणि माईली या दोघीही चांगल्या मैत्रीणी असल्याचंही म्हटलं  जातं. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून नात्यांमध्ये काहीच फरक पडत नाही आणि तेच योग्य आहे हेच प्रियांकाने दाखवून दिलं आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत त्यावर विश्वास असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या विश्वासानेच नातं टिकतं हे प्रियांकाला चांगलंच माहीत असल्याचंही दिसून येत आहे.


जोनास ब्रदर्स सध्या टॉपवर


jonas bro


नुकताच जोनास ब्रदर्सचा ‘सकर’ हा अल्बम प्रदर्शित झाला आहे. या अल्बमला जगभरातून अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून हा अल्बम सध्या नंबर 1 म्हणून गाजत आहे. यामध्ये जोनास ब्रदर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सनेदेखील काम केलं आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जोनास परिवार आनंदात आहे.  


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


प्रियांका - निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या घरी ‘या’ नव्या पाहुण्याचं जंगी स्वागत


प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य