जेव्हा सलमान खानमुळे ऐश्वर्याला गमवावे लागले होते 5 चित्रपट

जेव्हा सलमान खानमुळे ऐश्वर्याला गमवावे लागले होते 5 चित्रपट

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरूख खान आणि ऐश्वर्या रायची जोडी प्रेक्षकांना एकेकाळी खूप आवडली होती. मग तो मोहब्बते असो देवदास असो वा अगदी बहीण-भावाच्या भूमिकेमधील जोश हा सिनेमा असो.  


एक काळ होता जेव्हा दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं आणि फॅन्सनी त्यांच्या चित्रपटांना उचलून धरलं होतं. दोघांना एकाचवेळी अनेक सिनेमा ऑफर करण्यात आले होते. पण समीकरण काही जुळलं नाही. असं म्हटलं जातं की, शाहरूख खानने ऐश्वर्या रायला तब्बल 5 चित्रपटातून काढण्यास सांगितलं.

शाहरूखने ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवलेला पहिला सिनेमा होता ‘चलते चलते’. या सिनेमासाठी पहिल्यांदा ऐश्वर्याला साईन करण्यात आलं होतं. पण नंतर राणी मुखर्जीने तिला रिप्लेस केलं.


47584418 158875785085618 1880240059298195175 n


सूत्रानुसार, ऐश्वर्याचा तत्कालीन बॉयफ्रेंड सलमान खान दारू पिऊन सेटवर पोचला आणि त्याने हंगामा केला. त्यानंतर शाहरूखने ऐश्वर्याला सिनेमातून काढलं आणि तिच्याऐवजी राणी मुखर्जीला साईन केलं.  


असं म्हणतात, यानंतर शाहरूखने ऐश्वर्याला अजून चार सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवला. या चित्रपटांमध्ये यश चोप्रा यांच्या ब्लॉकबस्टर ‘वीर झारा’चा ही समावेश होता. या चित्रपटात ऐश्वर्याला रिप्लेस करून प्रीटी झिंटाला साईन करण्यात आलं.  

Subscribe to POPxoTV

सिमी गरेवालला दिलेल्या एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये ऐश्वर्या या मुद्द्यावर बोलली होती. सिमीने तिला विचारलं होतं की, शाहरूखने तुला 5 चित्रपटातून बाहेरचा केलं होतं, याबाबत तू काय सांगशील? यावर ऐश्वर्याने सांगितलं की, मी याचं उत्तर कसं देऊ शकते? हो. असं त्यावेळी बोललं जात होतं की, आम्ही काही चित्रपट एकत्र करणार होतो, पण ते झालं नाही. मला याबाबत कोणतंच कारण सांगण्यात आलं नव्हतं, ना मला काही उत्तरं मिळाली.  


शाहरूख खाननेही नंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, ऐश्वर्याच्या खाजगी आयुष्यात मी ढवळाढवळ केली, मी असं नको करायला हवं होतं. शाहरूखने ऐश्वर्याला सिनेमामधून बाहेरचा रस्ता दाखवल्याबद्दल दुःख व्यक्त करतं म्हटलं होतं की, ऐश्वर्या आणि माझी चांगली मैत्री आहे, मी जे केलं ते चुकीचं होतं. पण मी ऐश्वर्याची माफी मागितली. त्यानंतर 2017 साली आलेल्या ऐ दिल है मुश्कील या सिनेमामध्ये ऐश्वर्या आणि शाहरूख हे एकत्र दिसले होते.

आज तरी शाहरूख आणि सलमानमध्ये सर्व आलबेल असल्याच चित्र दिसतं. 


हेही वाचा - 


सलमान खानने घेतलाय घर सोडण्याचा निर्णय


सलमान खानला सुपरस्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन


संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटासाठी सलमान-प्रियंका पुन्हा एकत्र