Video : जेव्हा रिटायरमेंट पार्टी सोडून एक्स गर्लफ्रेंडला सोडायला गेला युवराज

Video : जेव्हा रिटायरमेंट पार्टी सोडून एक्स गर्लफ्रेंडला सोडायला गेला युवराज

भारतीय क्रिकेटर युवराज सिंग (Yuvraj Singh) ने 10 जूनला भारतीय क्रिकेटला अलविदा केलं. युवराजने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केल्याने अनेकांना धक्का बसला. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर युवराजने खास रिटायरमेंट पार्टी ठेवली. या पार्टीला ना केवळ क्रिकेट जगतातील तर बॉलीवूड आणि बिझनेसमधीलही अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली. युवराजच्या या पार्टीचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या पार्टीतील काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत, ज्यांची चर्चा सर्वात जास्त आहे.

युवराजच्या पार्टीतला व्हायरल व्हिडिओ

युवराजच्या पार्टीतली खास लक्ष वेधून घेणारा व्हिडिओ म्हणजे युवराज आणि त्याची पत्नी हेजल किच तसंच त्यांच्यासोबत दिसलेली युवराजची एक्स गर्लफ्रेंड किम शर्माचा. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. युवराज रिटायरमेंट पार्टी एन्जॉय केल्यानंतर किम शर्मासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. एवढंच नाहीतर तो पार्टीमध्येच सोडून एक्स गर्लफ्रेंड किम शर्माला सी-ऑफ करायला बाहेरही आला.

एक्स गर्लफ्रेंड आणि बायकोसोबत युवराज

वरील फोटोत तुम्ही पाहू शकता की, युवराज सिंगच्या एका बाजूला बायको हेजल किच आहे तर दुसऱ्या बाजूला गर्लफ्रेंड किम शर्मा उभी आहे. युवी दोघींच्या खांद्यावर हात ठेवून तिघंजण मस्त फोटो काढून घेत आहेत. आश्चर्य म्हणजे तिघंही अगदी हसतमुख दिसत आहेत.

युवी आणि नेहराची धम्माल

एकीकडे युवीचा किमसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत असताना अजून एक धमाल व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो म्हणजे युवीच्या केक कटिंग आणि नेहराच्या स्पीचचा व्हिडिओ. 

पार्टीतील सेलेब्सची मांदियाळी

या रिटायरमेंट पार्टीमध्ये युवराजने आपल्या आईसोबत बाहेर येऊन मीडियाला धन्यवाद म्हटलं. युवराज आणि अंबानी कुटुंबियांची चांगली जवळीक आहे. त्यामुळे या पार्टीला अंबानी कुटुंबियही उपस्थित होते. या पार्टीला क्रिकेटर नेहरा, अजित आगरकर आणि त्याची बायको, इरफान खान आणि कुटुंबिय, जहीर खानच्या अनुपस्थित सागरिका घाटगे, व्हीजे अनुषा, हाताला दुखापत झाल्यामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला शिखर धवन, लव्हबर्डस फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर आणि मसाबा गुप्ता हे सामील झाले होते.