एकेकाळी टीव्हीवर गाजलेला हा चेहरा कुठे आहे आज…

एकेकाळी टीव्हीवर गाजलेला हा चेहरा कुठे आहे आज…

एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध असणार अभिनेता आणि एंकर Aman Yatan Verma सध्या कुठे आहे? तुम्हाला लक्षात आहे का हा अभिनेता. आज अमनचा विषय निघाला तो त्याचा 48 व्या बर्थडेच्या निमित्ताने. अमनने टीव्हीवर आणि बॉलीवूडमध्येही अनेक भूमिका केल्या. पण एका घटनेमुळे त्याचं टीव्ही करिअर बर्बाद झालं. तुम्हालाही उत्सुकता आहे का तो सध्या काय करतोय.

का संपलं अमनचं टीव्ही करिअर

बिग अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच असतो अमनचाही वाढदिवस. एक प्रसिद्ध न्यूज चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनने अमनचं करिअर बदलून टाकलं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका मॉडेलला करिअरच्या बदल्यात सेक्शुअल फेव्हरबाबत बोलताना अमन दिसला होता. हा व्हिडिओ टेलीकास्टसुद्धा झाला होता. या स्टिंग ऑपरेशनमुळे अमनची खूप बदनामी झाली होती आणि त्याला अचानक काम मिळणं बंद झालं. अमनने या चॅनलवर केसही केली होती. 

संघर्षातून झाली होती सुरूवात

अमनने त्याच्या करिअरची सुरूवात टीव्ही सीरियल 'पचपन खंभे लाल दीवारें' मधून 1987 साली केली होती. अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केल्यानंतर अमन वर्माने फिल्म संघर्षमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात तो प्रिती झिंटाच्या हिरोच्या भूमिकेत दिसला होता. खरंतर अमनला खरी ओळख मिळाली ती एकता कपूरच्या सीरियल 'क्योंकि सास भी कभी बहू' मुळे. या सीरियलमधील लीड रोलनंतर त्याला अनेक सीरियल्समध्ये लीड रोल मिळाले. पण बॉलीवूडमध्ये मात्र त्याला कधी लीड रोल मिळाला नाही. एवढंच नाहीतर त्याने 'बागबान' चित्रपटात 20 वर्षाच्या मुलीच्या बापाची भूमिकाही केली होती. जेव्हा त्याचं स्वतःच वय फक्त 32 वर्ष होतं. अमनने त्याच्या एका इंटरव्हयूत हेही सांगितलं होतं की, हा रोल करणं त्याला खूपच महाग पडलं. कारण या चित्रपटानंतर त्याला अशाच प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या.

रिएलिटी शोने उघडले होते नशिबाचे दरवाजे पण…

अमनचा एक रिएलिटी शो 'खुल जा सिम सिम' खूपच हिट झाला होता. अमनने हा शो होस्ट केला होता. पण 2005 मध्ये त्याचं करियर अगदी संपल्यागत झालं जेव्हा त्याच्यावर कास्टिंग काऊचचा आरोप लागला. अमनने असंही म्हटलं होतं की, तो चॅनल त्याला ब्लॅकमेल करत आहे आणि पैसेसुद्धा वसूल करायच्या बेतात आहे. यानंतर अमनला अनेक वर्ष कामचं मिळालं नाही. पण नंतर हे प्रकरण थंड झालं. त्याने बिग बॉसच्या सिझन 9 मध्येही भाग घेतला होता. अमनने 2016 मध्ये टीव्ही अभिनेत्री वंदना लालवानी शी लग्न केलं. जी त्याच्यापेक्षा तब्बल 15 वर्ष लहान आहे. 

सध्या काय करतोय अमन

आता तुम्ही विचारालं की, सध्या अमन कुठे आहे आणि काय करतोय. तर अमनचं टीव्ही करिअर थांबलेलं असलं तरी त्याला आता साथ मिळाली आहे एंकरिंगची. हो...सध्या अमन निरनिराळ्या ब्युटी पॅजंट्स, अवॉर्ड शो आणि टॅलेंट शोजच एंकरिंग आणि जज म्हणून भूमिका निभावतोय. टीव्हीवरून गच्छंती झाली तरी त्याचं या क्षेत्रात चांगलं काम सुरू आहे. एवढंच नाहीतर त्याच्या खुल जा सिम सिम हा शो आता लोकल पातळीवर सादर करतोय. पाहा या शोचं पोस्टर. 

म्हणतात ना...देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा नक्कीच उघडतो. अमनला आयुष्यात चांगलाच धडा मिळाला पण त्यानंतर मात्र आता त्याचं आयुष्य चांगलं सुरू आहे. काय माहीत कदाचित तो पुन्हा टीव्हीवरही कमबॅक करेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे.तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.