अरे हा बिनोद आहे तरी कोण? सोशल मीडियावर त्याचीच चर्चा

अरे हा बिनोद आहे तरी कोण? सोशल मीडियावर त्याचीच चर्चा

अरे देवा सोशल मीडियावर कधी काय प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. आता याच सोशल मीडियावर ‘बिनोद’ नावाची चर्चा होत आहे. युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम अगदी सगळीकडे याची चर्चा होत आहे. त्याचे क्रेझ इतके वाढले आहे की, लोक त्या व्यक्तिला  शोधण्यासाठी लाईव्ह येऊ लागली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची चर्चा वाढू लागली आहे. तुम्हाला ही या बिनोदचा विनोद काय ते माहीत आहे का?  आता तुम्ही बिनोद म्हणून गुगल सर्च करायला जाल तर तुम्हाला हे महाशय आणि हे सगळे प्रकरण काय याचा एका मिनिटात गुंता सुटेल असे वाटत असेल तर असे होणार नाही. कारण मार्केट मै नया है यह! जाणून घेऊया नेमका काय आहे बिनोद प्रकरण 

जुन्या फोटोंवर होतोय कवितांचा पाऊस, कवी तेच..

 

अरे हे बिनोद प्रकरण काय?

सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटी आहेत. जे वेगवेगळ्या विषयावरचे अनेक व्हिडिओ बनवत असतात. एखादा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाईक, कमेंट करा असे ते सांगतात. आता याच कमेंट बॉक्समध्ये अनेकदा शिव्या किंवा वाईट काहीतरी लिहिण्याची अनेकांना सवय असते. पण काही प्रसिद्ध युट्युबर्सच्या अकाऊंट खाली कमेंट बॉक्समध्ये फक्त ‘बिनोद’ इतकीच कमेंट देण्यात येत आहे. आता एखादी व्यक्ती ही कमेंट एकदा असेल तर ठिक म्हणेल. पण नाही हे प्रकरण इथे थांबत नाही. तर या कमेंट अनेक युट्युबरच्या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये सतत दिसत आहे. फोटो असो वा व्हिडिओ त्याखाली नुसते ‘Binod’ असे टाईप केले जात आहे. तर या कमेंटमुळेच हा बिनोद सगळीकडे ट्रेंड होऊ लागला आहे. 

असा कळला बिनोदचा विनोद

स्ले पॉईंट नावाने युट्युबवर एक चॅनेल आहे.त्यांनी त्याच्या कमेंट बॉक्स आणि लोकांच्या कमेंटवर एक रोस्ट व्हिडिओ केला. त्यामध्ये त्यांना बिनोद नावाची कमेंट होती. त्यांनी हा बिनोद आहे तरी कोण असा प्रश्न केला. त्यानंतर अनेक युट्युबर्सना त्यांच्या कमेंटबॉक्समध्ये ही कमेंट दिसली. मग काय सगळ्यांनीच हा बिनोद कोण याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर असा शोध लागला की, बिनोद थारु नावाचे एक अकाऊंट युट्युबर असून त्या व्यक्तिने एकही व्हिडिओ शेअर केला नाही पण त्याने त्याच्या अकाऊंटवरुन स्वत:च्या नावाचा बराच बोलबाला केला आहे. 

मौनी रॉयचा साखरपुडा, फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत

सगळीकडे झाला हिट

आता या एका कमेंटमुळे हा बिनोद इतका हिट झाला आहे की, सगळीकडे तो ट्रेंड होऊ लागला आहे. सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी त्यावर खास व्हिडिओ बनवले आहेत. इतकेच नाही तर याच नावाचे मीम्स, ट्विट्स सगळीकडे वायरल होऊ लागले आहे. तुम्ही अजूनपर्यंत या बिनोदचा विनोद ऐकला नसेल तर आता गुगल सर्च करा तुम्हाला लाखोनी मीम्स फक्त आणि फक्त बिनोदवर पाहायला मिळतील. 


आता तुम्हालाही ट्रेंड व्हायचे असेल तर तुम्ही बिनोद कमेंट करा आणि हिट व्हा. 

टीव्हीवर या कलाकारांनी निभावली आहे साक्षात श्रीकृष्णाची भूमिका