#BBM2 फायनलमध्ये नेहा आणि शिवानीसोबत असणार ‘हे’ चेहरे

#BBM2 फायनलमध्ये नेहा आणि शिवानीसोबत असणार ‘हे’ चेहरे

Bigg Boss House मध्ये गेल्या दोन दिवसांपासून Eliminate झालेले सदस्य काही क्षणांसाठी आले आणि त्यांनी फायनलसाठी नेहा आणि शिवानीला पसंती दिली. त्यामुळे Bigg Boss मराठीच्या फायनलसाठी दोन नाव तर निश्चित झाली आहेत. पण याशिवाय अजून कोणते चेहरे टॉप 5 मध्ये असतील असा प्रश्न आम्ही #POPxoMarathi च्या वाचकांना विचारला होता. चला जाणून घेऊया इलिमेनेट झालेले सदस्य आणि वाचकांचा कौल कोणाला आहे ते.

टॉप 5 साठी सगळ्यात आघाडीवर असलेली नावं

बिग बॉस मराठीच्या एलिमिनेट झालेल्या सदस्यांनी जरी नेहा आणि शिवानीला जास्त पसंती दिली. पण याउलट आमच्या वाचकांनी सर्वात जास्त पसंती दिली होती ती शिव, वीणा, नेहा आणि किशोरी यांना. बऱ्याच जणांनी या चौघांचं शेवटच्या पाच सदस्यांमध्ये असेल असा कौल दिला आहे.

वाचकांनी दिली आरोह आणि हिनालाही पसंती

वाचकांच्या कौलानुसार हिना एलिमिनेट होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कारण तिने टास्कमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण मागच्या रविवारी हिना घरातून एलिमिनेट झाली. पण तरीही टॉप 5 मध्ये अनेकांनी हिनाचं नावंही घेतलं होतं. दुसरीकडे आरोहला बिग बॉसच्या घरात येऊन जास्त दिवस झाले नाहीत पण तरीही त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्यामुळे अनेक वाचकांनी आरोहच्या नावालाही कौल दिला आहे

पराग करतोय बिग बॉसवर आगपाखड

मागच्या दोन एपिसोडमध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असलेल्या एका व्यक्तीची मात्र घरात एंट्री झाली नाही. ती व्यक्ती म्हणजे शेफ पराग कान्हेरे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यही वाटलं आहे. याच कारण काय हे जरी कळलं नसलं तरी असं दिसून आलं की, परागची सध्या सोशल मीडियावरून बिग बॉसवर आगपाखड अर्थात टीका सुरू आहे. पाहा परागने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर टाकलेल्या या पोस्ट. 

View this post on Instagram

#biggbossmarathi2 #bbmarathi2

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

बिग बॉसला केलं जातंय ट्रोल

बिग बॉसने नेहा आणि शिवानीला फिनालेचं तिकीट दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नेहा जरी फिनालेसाठी पात्र असली तरी शिवानीला डायरेक्ट फिनालेला एंट्री मिळाल्यामुळे टीका होत आहे. सोशल मीडियावर शिवला फिनाले तिकीट न मिळाल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच बिचुकलेंना घरात ठेवल्यामुळेही बिग बॉसच्या नियमांवर बोट दाखवलं जातंय. पाहा या पोस्ट्स -

बिग बॉसमधील या आश्चर्यचकित रिझल्ट्समुळे अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

#Neha and #Shivani right now

A post shared by Marathi Big boss Trolls (@bbmarathitrolls) on

हा कौल जरी आता आपल्याला कळलेला असला तरी बिग बॉस मराठी सिझन 2 चा विनर कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण खरं पाहता चढाओढ शिव आणि नेहामध्येच आहे. आजपर्यंत त्या दोघांचा खेळ पाहता त्या दोघांपैकीच कोणीतरी विनर ठरेल, असं दिसतंय. पाहूया आता बिग बॉस विनरसाठी कोणाच्या बाजून कौल देतं. कारण नियमांतील अनेक बदलांमुळे आधीच बिग बॉसवर टीका होत आहे. त्यामुळे पुढील येणारे बिग बॉसचे भाग पाहणं आवश्यक आहे.

हेही वाचा -

#BBM2 मधून इलिमिनेट होऊनही माधवच ठरला ‘विजेता’

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

हिना पांचाळच्या ‘दिलखेचक अदा’ तुम्ही पाहिल्यात का