अजय आणि काजोल जोडप्यावर का आली नवं घर शोधण्याची वेळ

अजय आणि काजोल जोडप्यावर का आली नवं घर शोधण्याची वेळ

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा बॉलीवूडमधील सर्वात बिझी अभिनेत्यांपैकी एक आहे. जो वर्षभर शूटींग करतो आणि त्याच्या रिलीजच्या तयारीत बिझी होतो. पण त्याच्या व्यस्त शेड्यूलमध्ये अजून एक काम वाढलं आहे, ती म्हणजे भाड्याच्या घराचा शोध. घाबरू नका अजय देवगण आणि काजोलवर कोणतंही संकट आलेलं नाही.  

सूत्रानुसार, बॉलीवूडचा सिंघम अजय आणि काजोल स्वतःसाठी नव्या भाड्याच्या घराच्या शोधात आहेत. कारण देवगण कुटुंबियांच्या जूहू स्थित बंगल्याचं रीडेव्हलपमेंट करायचं आहे, ज्यासाठी जवळजवळ 2 वर्षाचा वेळ लागेल. बऱ्याच काळापासून हे कुटुंब जूहूमध्येच राहत असल्याने त्यांना याच भागात घर हवं असून त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हायची इच्छा नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Filmfare awards here we come . ...


A post shared by Kajol Devgan (@kajol) on
तुमच्या माहितीसाठी अजय आणि काजोल ज्या बंगल्यात राहतात तो बंगला अभिनेता धर्मेंद्र यांच्या बंगल्याच्या अगदी समोर आहे. हे घर रोड नंबर 11 वर आहे. आता हे कपल याच लोकॅलिटीमध्ये नव्या भाड्याच्या बंगल्याच्या शोधात आहे. हे जोडपं बऱ्याच काळापासून प्रशस्त आणि आरामदायी बंगल्याच्या शोधात आहे पण त्यांना काही मनासारखं घर मिळत नाहीयं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Colourful night....... #diwali #happylife #family


A post shared by Kajol Devgan (@kajol) on
आपल्या नव्या घरासाठी सिंघम अजयने काही डिझाईन्सही पसंत केले आहेत. पण मनासारखं भाड्याचं घर मिळत नसल्यामुळे नवीन घराचं रीडेव्हलपमेंट रखडलं आहे. भाड्याचं घर मिळताच ते शिफ्ट होऊन कामाला सुरूवात करता येईल.


वाचा: दिवाळी संदेश
 

 

 


View this post on Instagram


 

 

Playing to my strengths this Diwali ;)


A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on
अजय देवगण आणि काजोल यांचं 1999 साली लग्न झाल्यापासून ते याच घरात राहत आहेत. सूत्रानुसार अजय देवगणची एकूण संपत्ती जवळपास 32 मिलियन डॉलर इतकी आहे. या संपत्तीमध्येच अजय-काजोलच्या आलिशान घराचाही समावेश आहे. ज्याचं नाव आहे शिवशक्ती. अजयच्या या घराची किंमत तब्बल 2 करोड डॉलर इतकी आहे. एवढंच नाहीतर अजयने नुकतंच आपली मुलगी न्यासासाठी सिंगापूरमध्येही एक घर खरेदी केलं.

प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचं झाल्यास अजय देवगणचा 2019 च्या सुरूवातीला रिलीज झालेला टोटल धमाल बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आणि लवकरच तो दिग्दर्शक लव रंजनच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटातही झळकणार आहे. जो एक रोमँटीक-कॉमेडी आहे. या चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं असून त्याला खूप पसंतीही मिळाली. याशिवाय अजय देवगण बिग बजेट फिल्म ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’साठीही शूटींग करत आहे.


हेही वाचा -


अजय देवगण 2020 मध्ये करणार एअर स्ट्राईक


सिंघम नव्या चित्रपटात फुटबॉल कोचच्या भूमिकेत