यासाठी दिवाळीला अभिनेत्री गुल पनागने घातला होता 14 वर्ष जुना ड्रेस

यासाठी दिवाळीला अभिनेत्री गुल पनागने घातला होता 14 वर्ष जुना ड्रेस

दिवाळीचा सण प्रत्येकानेच आनंदाने साजरा केला. यंदाची दिवाळी सेलिब्रेटीजनी कशी साजरी केली हे मात्र प्रत्येक चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. अनेक सेलिब्रेटीजनी त्यांचे दिवाळी साजरे करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. काहींनी तर एकत्र येऊन दिवाळी पार्टीदेखील केली. मात्र काही सेलिब्रेटीजनी दिवाळी अगदी अनोख्या पद्धतीने साजरी केली.  अभिनेत्री गुल पनागने थोड्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 

गुल पनागने अशी केली दिवाळी साजरी

अभिनेत्री गुल पनागने तिचे  काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामधील तिच्या या दिवाळी सूटची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. याचं कारण ही तसं खासच आहे. कारण तिने चक्क चौदा वर्ष जुना सूट या दिवाळीत घातला होता. ती या सूटमध्ये फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. गुल पनागने या फोटोंसोबत शेअर केलं आहे की, " ही दिवाळी येत्या वर्षीची माझी फॅशन थीम आहे. रियुज आणि रिसायकल. कारण ही थीम स्थायी म्हणजेच शाश्वत आहे. शिवाय फार खर्चिक नाही त्यामुळे यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. ( हा माझा ब्रॉकेड सूट जवळजवळ चौदा वर्ष जुना आहे )" गुल पनागच्या मनात अचानक असा विचार आला आणि तिने ही थीम यावर्षीसाठी निवडली आहे. विषेशतः सणसमारंभांसाठी अथवा कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांसाठी ही थीम खरंच खूप चांगली आहे. गुल पनागच्या मते ती फारच आळशी आहे. शिवाय तिच्या कामात ती सतत बिझी असते. त्यामुळे अशावेळी ही  थीम एक मस्त संकल्पना ठरू शकते. 

काय आह रियूज आणि रिसायकल थीम

काही दिवसांपूर्वी गुल पनागने तिचे मालदिव व्हेकेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये ती एका स्विमसूटमध्ये दिसत होती. हा स्विमसूटदेखील तिने रियूज केला होता. 1999 साली घातलेला स्विमसूट तिने पुन्हा आता 2019 साली वापरला. यामधून गुल पनागची फिटनेस आणि सुडौलपणाची कल्पना नक्कीच येऊ शकते. कारण ती तिचे दहा आणि  चौदा वर्ष जुने कपडे आजही पुन्हा घातल आहे. गुल पनागने 1999 साली मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. तिला ब्युटीफुल स्माईलचा पुरस्कारदेखील मिळाला होता. आजही ती तितकीच फिट आणि सुंदर असल्यामुळे ती तिचे तेव्हाचे कपडे पुन्हा घालू शकते. शिवाय तीला तिच्या कपड्यांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे. कारण ते कपडे तिच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. अनेकांना एकदा घातलेले कपडे पुन्हा घालणं कमी पणाचं वाटतं. मात्र अभिनेत्री गुल पनागने मात्र या विचारसरणीला दूर सारत कलाविश्वात एक नवा पायंडा पाडला आहे. ज्यामुळे कपड्यांचा पुर्नवापर करून त्याचं महत्त्व नक्कीच जपता येईल. शिवाय अनेक कपडे असे असतात ज्यांच्यासोबत आपल्या भावनिक आठवणी जोडलेल्या असतात. एखाद्या खास व्यक्तीने भेट दिलेले कपडे, आई अथवा आजीची जपून ठेवलेली साडी, पहिल्या पगार अथवा कमाईचे कपडे असे खास कपडे पुन्हा वापरून त्या आठवणी नव्याने जगता येऊ शकतात. सेलिब्रेटीज ज्या गोष्टी करतात त्या चाहत्यांसाठी ट्रेंड होतात. त्यामुळे कदाचित येत्या वर्षी कपडे रियुज आणि रिसायकल करण्याचा ट्रेंड येण्याची शक्यता आहे.   

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा - 

Viral Video: पाहा या बॉलीवूड अभिनेत्रीचा वाढदिवसाच्या दिवशी हटके अंदाज

अमिताभ बच्चन यांच्या #Diwalipartyला सेलिब्रिटींची मांदियाळी

SRK च्या फॅन्ससाठी दोन चांगल्या बातम्या