ADVERTISEMENT
home / बिग बॉस
या कारणांमुळे लोक बघतात #BiggBoss सारखे रियालिटी शोज

या कारणांमुळे लोक बघतात #BiggBoss सारखे रियालिटी शोज

आपल्यापैकी बऱ्याच जणांना #BiggBoss सारखे रियालिटी शोज आवडत नाहीत. त्यामुळे ते बघणाऱ्यांनाही अनेकदा विचारलं जातं की, काय आवडतं तुम्हाला या शोजमध्ये. अशा शोजवर अनेकदा स्क्रिप्टेड असल्याचाही आरोप होतो. मग तरीही या शोजना एवढा टीआरपी आणि फॅन फोलोइंग का असतं? असा प्रश्न पडतो. कारण या शोजनी दीड दशक टीव्हीवर राज्य करणाऱ्या सास-बहू सीरियल्सची मोनोपॉली तोडत हाय टीआरपी मिळवला. अनेकदा बदनामी होऊनही हे शोज कायम लोकप्रिय असतात. पाहूया यामागील काही कारणं. 

उत्सुकता आणि रॉ इमोशनला भारतीयांची पसंती

Instagram

अनेक वेबसीरिज आणि एप्स येऊनही टीव्ही मनोरंजन आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या काही काळापासून टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये एकसुरीपणा आला होता. पण हे तोडण्याचं काम केलं ते रियालिटी शोजनी. हे शो लोकप्रिय होण्यामागचं कारण आहे लोकांना फॅमिली ड्रामा खासकरून सास बहू सीरियल्सचा आलेला कंटाळा. त्यांना नव्या प्रकारचं मनोरंजन मिळालं ते रियालिटी शोजमध्ये. जे कोणत्याही स्क्रिप्ट आणि डायलॉग्ज्सशिवाय पुढे काय होईल याची उत्सुकता देतात.

ADVERTISEMENT

#BiggBoss13 : रश्मी देसाई सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट

बिग बॉसच्या यशाचं गणित

बिग बॉससारख्या रियालिटी शोमध्ये स्पर्धक एकमेंकासोबत राहतात. तिथे त्यांची मैत्री होते. काही स्पर्धकांचं एकमेकांशी पटत नाही. काहीजण जिंकण्यासाठी अनेकदा चलाखी करतानाही दिसतात. त्यामुळे रियालिटी शोमध्ये फ्रेंडशिप, प्रेम आणि वैर या सगळ्या भावना पाहायला मिळतात. याच कारणामुळे भारतीय इमोशन्सच्या जाळात अडकून हे शोज फॉलो करू लागतात. त्यामुळे त्यांना लगेच टीआरपी मिळतो.

Bigg Boss 13: स्ट्राँग स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाची एक चूक महागात, झाला बेघर

जुन्या आठवणींना मिळतो उजाळा

ADVERTISEMENT

Instagram

हा प्रत्येक मनुष्याचा स्वभाव असतो की, प्रत्येक गोष्टीची तुलना स्वतःशी करतो. डान्स, सिंगिंग किंवा गेम बेस्ड शोजशी आपण लगेच कनेक्ट होतो. आपल्याला त्यातील स्पर्धक आवडू लागतात त्यांच्याशी आपण रिलेट करतो. ते पुढे जावेत म्हणून व्होट करतो. ज्यांची स्वप्न अपूर्ण असतात ते त्या स्पर्धकांमध्ये स्वतःला पाहू लागतात. कदाचित याच गोष्टीमुळे रियालिटी शोज हे घराघरातील चर्चेचा विषय बनतात. स्पर्धकांच्या आनंदात प्रेक्षक स्वतःचा आनंद आणि त्यांच्या भांडणात स्वतः गुंततात.

दुसऱ्यांच्या आयुष्यात झाकण्याची सवय

हे झालं अनोळखी स्पर्धकांबाबत जे साध्या कुटुंबातून येऊन रिएलिटी शोच्या माध्यमातून फेम मिळवतात. पण नच बलिए, झलक दिखला जा आणि बिग बॉससारखे रियालिटी शोज ज्यामध्ये सेलिब्रिटी असतात. त्यांनाही प्रेक्षकांची भरपूर पसंती असते. ते आपल्या आवडत्या आणि विवादीत स्पर्धकांचं आयुष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना जवळून पाहून ते खऱ्या आयुष्यात कसे आहेत ते पाहण्यासाठी असे शोज आवर्जून पाहिले जातात. सेलेब्सना काय आवडतात, त्यांची नाती कशी आहेत, ते सीरियल बाहेर कसं वागतात. हे लोकांना पाहायला आवडतं. कारण प्रत्येकाला गॉसिपमध्ये इंटरेस्ट असतोच. मग साहजिक आहे अशा शोजमधील गॉसिप्सना खूप टीआरपी मिळतो.

तब्बल 17 वर्षांनी बिग बॉस 13मुळे चर्चेत आली ही ‘काटा लगा’ फेम अभिनेत्री

ADVERTISEMENT

रियालिटी शोचं कनेक्ट

एकदा हे सगळं फॉलो करायला लागल्यावर लोकं हमखास रोज ते पाहू लागतात. कारण आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. कधी कधी केबीसी बघणारे प्रेक्षक मग ऑफिसमध्येही असे प्रश्नोत्तरं करू लागतात आणि मग चर्चा रंगतात. रियालिटी शोमधील रोजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मग अगदी ऑफिसमधील किंवा घरातील मोकळ्या वेळात ते पाहिले जातात.

मुख्य म्हणजे साध्या घरातील एखादी व्यक्ती जिंकणं किंवा आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला जिंकताना पाहणं. तेही कोणत्याही स्किप्टशिवाय, मनोरंजनासोबत आणि घरबसल्या हे सर्व पाहायला मिळणं. यामुळे रिएलिटी शोज आजही हिट आहेत. जोपर्यंत रियालिटी शोजचं इमोशनल कार्ड चालतंय तोपर्यंत त्यांना टीआरपी मिळतच राहील. 

मग तुम्हीही करता का फॉलो बिग बॉस किंवा इतर रिएलिटी शोज तुमचं कारण काय आहे?

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
07 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT