जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. परदेशातून देशात आलेल्या काही पर्यटकांमुळे देशातील काहींना या व्हायरसची लागण झाली आहे. युद्धपातळीवर देशातून हा आजार बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, यंत्रणा लढा देत आहे. रोजच्या रोज या आजाराची माहिती दिली जात आहे. देशाने या आजारावर नियंत्रण मिळवले असले तरीदेखील काही काळ हा सगळ्यांसाठी धोक्याचा असणार आहे. त्यामुळे सगळ्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जनतेशी संवाद साधत एक महत्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे रविवारी घरातूनच खिडकीतून येऊन घंटानाद करण्याचा. आपल्या डॉक्टरांनी किंवा इतर सगळ्या यंत्रणांनी केलेल्या सहकार्यासाठी असे करण्यास मोदींनी सांगितले. पण 21 व्या शतकात अशा प्रकारे वागण्यासाठी कोण सांगतं? असे म्हणत अनेकांनी यावर टीका केली यामुळे व्हायरस निघून जाईल का ? असा प्रश्न पंतप्रधानांना केला आहे. पण तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण जाणून घेणे ही गरजेचे आहे. कदाचित यामुळे Corona Virus चा नायनाट होईल आणि तुम्ही लवकरच घराबाहेर पडाल.
सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी (Corona Virus Easy Care)
आपल्या भारतीय परंपरेत कोणत्याही शुभ कार्याच्यावेळी टाळ, मृदृंग, ढोल, ताशे, नगारे, घंटानाद करण्याची परंपरा आहे. आता हा फक्त आनंद साजरा करण्याचा मार्ग आहे असे आपल्याला वाटत असेल पण आपल्या पूर्वजांची यामागे अपार श्रद्धा होती. त्यांना वाटत असे की, यामुळे अनेक आजारांचे, वाईट प्रवृत्तीची हार होते. ही वाद्य वाजल्यानंतर आसंमंतात एक प्रकारे त्या आवाजाचा परिणाम काही काळासाठी राहतो. इतकंच कशाला आपण ज्यावेळी योगा करताना ओंकार म्हणतो किंवा देवाचा जप करतो तेव्हासुद्धा तो आवाज आपल्या आजुबाजूचे वातावरण शुद्ध करण्याचे काम करतो. अगदी त्याच पद्धतीने हा घंटानाद किंवा थाळीनाद केला तर आपल्या आजुबाजूला असणारे विषाणू यांचा खात्मा होऊ शकतो. त्यामुळे पुराणात सांगितलेल्या या गोष्टीकडे तुम्ही थोडे लक्ष द्यायला हवे.
अनेकदा पुराणात सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पटत नाही. पाश्चात्य संशोधकांच्या पटतात. आता तुम्हाला आवाजाने ग्लास फुटतो किंवा एखादा सूर लावल्यावर काचेचा ग्लासही फुटतो हे नक्कीच माहीत असेल नाही का? गाण्यामुळे ग्लास फुटू शकतो यावर तुम्हाला विश्वास आहे. पण घंटानाद करुन व्हायरस जाण्यावर आपल्याला विश्वास नाही. डॉ. सुचेता अश्विन सावंत यांनी ही माहिती दिल्यानंतर या गोष्टीकडे सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवे असे लक्षात आले.
आपण तसेही घरात बसून आहोत. कामांव्यतिरिक्त आणि झोपण्याव्यतिरिक्त काहीही करु शकत नाही. जर सगळ्यांनी मिळून ही एक गोष्ट केली तर तुम्हाला आजूबाजूला काहीतरी घडत आहे किंवा लोकं आहेत याचा तरी आनंद होईल. शिवाय आवाजामुळे थोडासा भार आणि टेन्शन कमी झाल्यासारखे नक्कीच वाटेल.
या व्हायरसचा नायनाट तर नक्कीच होईल. पण तरीही तुम्हाला स्वच्छता पाळणे महत्वाची आहे. बाहेरुन आल्यानंतर हात, पाय स्वच्छ धुवा.नाकाला, तोंडाला वांरवार हात लावू नका. शिंकताना हातावर शिंकू नका. प्रतिकार शक्ती वाढेल अशा पदार्थांचे सेवन करा.
आता रविवारी संध्याकाळी मोदींजींनी सांगितले त्याप्रमाणे घराच्या खिडकीत येऊन घंटानाद किंवा थाळीनाद करायला अजिबात विसरु नका.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.