कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची ताटातूट

तुम्हाला कशी वाटते सारा आणि कार्तिकची जोडी? तुम्हीही या दोघांचे फॅन्स आहात का? जर तुम्हालाही बॉलीवूडमधली यंग आणि फ्रेश जोडी आवडत असेल तर तुमच्यासाठी आहे एक बातमी, जी ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) या जोडीचा अजून एकही चित्रपटसोबत आलेला नाही पण त्या आधीच त्यांची केमिस्ट्री पसंत केली जात आहे. एवढंच नाहीतर सारा आणि कार्तिकची जवळीक वाढल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. सध्या बॉलीवूडमध्ये या नव्या कोऱ्या जोडीबाबत बरंच हॉट गॉसिप रंगतंय. पण आता मात्र या चर्चांना विराम लागण्याची शक्यता आहे. हो कारण आता ही हॉट जोडी आपल्याला एकत्र दिसणार नाहीये. असं अचानक काय झालंय की ही या जोडीमध्ये अचानक ताटातूट झाली.


कार्तिक आणि साराची ताटातूट


गेल्या काही दिवसांपासून सारा आणि कार्तिकची जोडी सतत एकत्र फिरल्यामुळे चर्चेत होती. अगदी दिल्लीतील गल्ल्यांपासून ते मुंबईतल्या गल्ल्यांपर्यंत सगळीकडे हे दोघं एकत्र फिरत होते. किती छान दिसते ना यांची जोडी.

पण कुठे माशी शिंकली माहीत नाही आणि या दोघांच्या सो कॉल्ड मैत्रीलाही नजर लागली. सूत्रानुसार, या दोघांच्या मैत्रीला चक्क त्यांच्या आगामी चित्रपटाचा दिग्दर्शक इम्तियाज अली खानचीच नजर लागली आहे.


लव आजकल 2 मुळे आला सारा-कार्तिकमध्ये दुरावा

इम्तियाजच्या आगामी लव आजकल 2 या चित्रपटांमध्ये कार्तिक आणि साराची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण या दोघांमधली जवळीक इम्तियाजला मात्र आवडत नाहीये. त्यामुळे त्याने या दोघांनाही पब्लिकली एकमेंकासोबत न फिरण्याची तंबी दिली आहे. कारण इम्तियाजच्या मते, जर फॅन्स आणि प्रेक्षकांना ही जोडी चित्रपटाआधीच वारंवार एकमेंकासोबत दिसली तर या जोडीमध्ये काहीही नावीन्य राहणार नाही. ज्याचा परिणाम साहजिकच त्यांच्या चित्रपटावर पडेल. लव आजकल 2 हा चित्रपट पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे ला रिलीज होणार आहे. त्यामुळेच इम्तियाजने या दोघांना थोड लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.  


सारानंतर आता ही नवोदित अभिनेत्री कार्तिकच्या प्रेमात


सारा आता एकटीच फिरतेय मुंबईत
 

 

 


View this post on Instagram


 

 

#saraalikhan snapped post pack up #loveajkal2


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
इम्तियाजने तंबी देताच त्याचा परिणाम दिसू लागला आहे. नुकतीच बांद्रा परिसरात सारा एकटीच फिरताना दिसली. जेव्हा तिने मीडियाला पाहताच नेहमीप्रमाणे गोड स्माईल दिलं.


सारा आणि कार्तिकच्या केमिस्ट्रीला अशी झाली सुरूवात


एका अवॉर्ड फंक्शनच्या दरम्यान रणवीर सिंगने खास सारा आणि कार्तिकची ओळख करून दिली होती. कारण सारा करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये साराने तिला कार्तिकवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांना लगेच एकत्र सिनेमाही मिळाला आणि तेव्हापासून या जोडीचे एकत्र फिरतानाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.