सुशांत सिंग राजपूतने दिला सारा अली खानसोबत काम करण्यास नकार

सुशांत सिंग राजपूतने दिला सारा अली खानसोबत काम करण्यास नकार

ताज्या बातमीनुसार सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) ने केदारनाथ (Kedarnath) को-स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत काम करण्यास नकार दिला आहे. सारा अली खान (Sara Ali Khan) चा डेब्यू चित्रपट केदारनाथ (Kedarnath) मध्ये को-स्टार असलेल्या सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ला आता मात्र तिच्यासोबत काम करायचं नाही. या दोघांची केदारनाथ चित्रपटातील रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यांची जबरदस्त ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहून त्यांचा ऑफ स्क्रीन रोमांस सुरू असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण तेव्हा मात्र दोघांनी या बातम्यांना नकार दिला होता. तरीही त्यांच्या अफेअरच्या बातम्या येतच होत्या. पण या अफेअरच्या चर्चा मात्र जास्त दिवस चालल्या नाहीत आणि त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

साराला मिळाला कार्तिक

सूत्रानुसार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सोबतचा सारा अली खानचे आज कल (Aaj Kal) चित्रपटाच्या सेटवरचे रोमँटिक फोटोज सुशांत-साराच्या ब्रेकअपसाठी कारणीभूत ठरले होते. परिणामी सुशांतने साराला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केलं होतं. त्यानंतर सतत कार्तिकसोबत साराचं नाव जोडलं जाऊ लागलं. तर या सगळ्याला होकार असल्यासारखं सारानेही मान्य केलं की, तिचा कार्तिक आर्यनवर क्रश आहे.

सुशांतच्या आयुष्यातील नवीन #Loveinterest

दुसरीकडे छिछोरे (Chhichhore) स्टार सुशांतच्या आयुष्यातही एका नवीन #haseena ने पाऊल ठेवलं आहे. तर सूत्रानुसार, सुशांत आणि रेहा चक्रवर्ती एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचेही एकत्र पब्लिक अपियरंसचे फोटोज आल्यानेही त्यांच्या अफेअरच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

सुशांतने काम करण्यास नकार देण्याचं कारण

एका एंटरटेनमेंट पोर्टलच्या बातमीनुसार सारा आणि सुशांतला एका खास ब्रँडसाठी साईन करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण सुशांतने या ब्रँडसाठी सारासोबत ऑन स्क्रीन रोमान्स करण्याच्या ऑफर नकार दिला होता. मीडिया रिपोर्टनुसार सुशांतला पुन्हा सारासोबत स्वतःच नाव जोडून घ्यायचं नाही. त्यामुळे त्याने या चांगल्या ऑफरलाही नकार दिला आहे. सूत्रानुसार त्यावेळी साराने केदारनाथऐवजी सिंबा चित्रपटाला जास्त महत्त्व दिल्यानेही सुशांतला तिचा राग आला असावा असं म्हटलं जातं. खरंतर साराचा बॉलीवूडमधला पहिला चित्रपट हा केदरानाथच होता पण या चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी वाद झाल्यामुळे चित्रपटांवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे साहजिक आहे प्रोफेशनल असलेल्या सुशांतने सारासोबत काम करण्यास नकार दिला असावा.