‘खतरों के खिलाडी’ सीझन 9 चा विजेता ठरणार का पुनीत पाठक

‘खतरों के खिलाडी’ सीझन 9 चा विजेता ठरणार का पुनीत पाठक

‘खतरों के खिलाडी’ चा सीझन 9 सध्या फुल फॉर्मात आहे. या सीझनमध्ये असलेल्या सर्व स्पर्धकांपैकी एक स्पर्धक असा आहे ज्याला अगदी पहिल्या भागापासून आतापर्यंत एकदाही फिअर फंदा मिळालेला नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल की, तो कोणता स्पर्धक आहे. टास्क कोणताही असो. अगदी झोकून त्या स्पर्धेत आपले 100 टक्के देणारा स्पर्धक म्हणजे पुनीत. आता या स्पर्धेतील आव्हान अजूनच वाढत चालली आहेत. पण प्रत्येक आव्हानामध्ये कुठेही न घाबरता आणि आपल्या प्रत्येक भीतीला मागे सोडत पुनीत पुढे चालला आहे. नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पुनीतने स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. आता या सीझनमध्ये पुनीतमध्ये बेडरपणादेखील प्रेक्षकांना भावत आहे. मुळात कोणतंही काम पूर्ण करण्याची त्याची वृत्ती या सर्व खेळांमधून दिसून येत आहे. त्यामुळे फक्त प्रेक्षकांचाच नाही तर निवेदक रोहित शेट्टीचादेखील पुनीत सध्या आवडता झाला आहे.


khatron ke khiladi
पुनीत होईल का या सीझनचा विजेता?


पुनीतला टक्कर देण्यासाठी या सीझनमध्ये गायक आदित्य नारायणदेखील आहे. शिवाय जास्मिन भासिनदेखील चांगली खेळत आहे. मुलींमध्ये भारती, जास्मिन, रिद्धिमा आणि शमिता या चारही मुली चांगल्या टक्कर देत असून मुलं मात्र कमी पडत आहेत. पण पुनीतला टक्कर द्यायला आदित्य एक चांगला खेळाडू आहे. मागच्या आठवड्यात आदित्यच्या डोळ्याला लागल्यामुळे त्याच्यासाठीदेखील पुनीतने स्टंट केला आणि भल्याभल्यांना जमणार नाही असा स्टंट त्याने करून दाखवला. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये पुनीतच या सीझनचा विजेता ठरणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. या आठवड्यात दोन एलिमिनेशन झाल्यामुळे आता केवळ सात खेळाडू राहिले आहेत. आता या खेळामध्ये अजून रंग चढू लागला आहे. त्यामुळे आता फायनल चार कोण असणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. अगदी किटक, साप, मगर असे सर्व अडथळे पार करत सध्या स्पर्धक आपल्या भीतीला मागे सोडत प्रत्येक टास्क पूर्ण करत आहेत. पण याआधी बऱ्याचदा काही स्पर्धकांना स्टंट अबॉट केल्यामुळे निवेदक रोहित शेट्टी मागच्या भागात सर्वांवर प्रचंड चिडला होता आणि त्यानंतर स्पर्धकांनी आपली भीती बाजूला ठेवून टास्क पूर्ण करण्याची शपथ घेतली आणि प्रत्येक टास्क पूर्ण केला.


KKK
सर्वात जास्त मस्तीखोर पुनीत


पुनीत जितका स्टंट करण्यात पुढे आहे तितकाच प्रँक करण्यातही त्याचा हातखंडा आहे. पण रोहित शेट्टीसुद्धा प्रँकस्टार असल्यामुळे या सीझनमध्ये प्रँक बघण्याचीही एक वेगळीच मजा आहे. पुनीत प्रत्येक टास्कमध्ये आपला जीव ओतून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून पूर्ण करत आहे. तर दुसरीकडे काही जणांनी अबॉट केल्यामुळे त्यालाही या गोष्टीचा त्रास होत आहे. पण तरीही आजपर्यंत पुनीतने एकही स्टंट अर्धवट सोडला नसून कोणताही स्टंट अबॉटही केलेला नाही. त्यामुळे तो जिंकण्याची जास्त शक्यता प्रेक्षकांना वाटत आहे. आता जसजसा फिनाले जवळ येत आहे तसतसे गेम्सदेखील जास्त आव्हानात्मक होत आहेत. त्यामुळे आता पुनीतला पुढची सगळी आव्हान झेपतील का आणि तो आणि अन्य स्पर्धक ही आव्हानं कशी पार पाडतील याचीही आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दरवर्षीचा सीझन काहीतरी वेगळी आव्हान घेऊन येत असतो. यावर्षीदेखील काही टास्क अतिशय वेगळे आहेत. आता लवकरच कळेल नक्की या सीझनचा विजेता किंवा विजेती कोण असेल. पण तरीही पुनीत विजेता झाल्याचं बऱ्याच प्रेक्षकांना आवडेल हे नक्की.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


जय मल्हारफेम ‘म्हाळसा’ अडकली लग्नाच्या बेडीत


अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर करणार ‘एंड काउंटर’


प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय 'आम्ही बेफिकर'