खानदानी राजधानीमध्ये सुरू होत आहे स्वाद केसरिया फेस्टिव्हल

खानदानी राजधानीमध्ये सुरू होत आहे स्वाद केसरिया फेस्टिव्हल

मुंबईतल्या वातावरणात आता चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे खास हिवाळ्यात बनणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा. थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर आणि ताज्या भाज्या येतात. याच निमित्ताने भारतीय पारंपारिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या खानदानी राजधानीने आयोजित केला आहे ‘स्वाद केसरिया’ हा फेस्टिव्हल. जो 5th -31st डिसेंबरपासून सुरू होत आहे.

स्वाद केसरियाचा जबरदस्त मेन्यू

या फूड फेस्टिव्हलमध्ये सीजनल आणि पारंपारिक खाद्यपदार्थांच्या संगम पाहायला मिळतो. ज्यामध्ये आहे सगळ्यांना आवडणारा सुरती उंधियो, मेथीचं पिठलं, सुवा लिलावा सब्जी, सरसो का साग आणि बेदमी पुरी. तसंच यामध्ये शलगम आणि हिरव्या मटारची भाजी, लिलवा रताळू यासारखे काही सिजनल पदार्थही आहे. मुख्य म्हणजे जर तुम्ही डेझर्ट्सचे चाहते असाल तर गूंद के लड्डू, अदाडिया पाक, शकरकंद की रबडी, रागी कोकोनट लाडू आणि गाजराचा हलवा अशी मस्त डेझर्ट्स आहेत. पण थांबा मेन्यू अजून संपलेला नाही. कारण या हेवी मेन्यूसोबतच खानदानी राजधानीमध्ये तुम्हाला फरसाण, चटणी, अपेटायजर्स, रोटी किंवा चपाती आणि भात व खिचडीचेही अनेक ऑप्शन्स आहेत. हा मेन्यू रोज बदलत राहणार आहे. त्यामुळे थाली खाताना तुम्हाला व्हरायटी चाखता येईल. 

भारतभर स्वाद केसरिया

या फेस्टिव्हलचा आस्वाद तुम्हाला फक्त मुंबईतच नाहीतर त्यांच्या देशभरातील खानदानी राजधानीच्या रेस्टॉरंट्समध्ये घेता येणार आहे. एवढंच नाहीतर ही थाळी होम डेलिव्हरीसाठीही उपलब्ध आहे. मग या डिसेंबरमध्ये अजून काही खास प्लॅन नसेल तर स्वाद केसरियाचा आस्वाद घ्यायला तुम्ही नक्कीच जाऊ शकता.

काय : द विंटर फूड फेस्टिव्हल - स्वाद केसरिया 

कधी:  डिसेंबर 5 ते 31 डिसेंबरपर्यंत  

कुठे: सर्व खानदानी राजधानी आऊटलेट्समध्ये 

वेळ : 12 ते 3.30 आणि  7 ते 11 

खानदानी राजधानीच्या शाखा : चेन्नई, मुंबई, बंगळूरू, दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद आणि पुणे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.