शाहरुख खानच्या फॅन्सना 2019 साली शाहरुखचं तोंडही पाहायला मिळालं नाही.वर्षभरात त्याचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. म्हणून अनेक फॅन्स नाराजसुद्धा असतील. पण एकही चित्रपट न करता शाहरुखने कमाई मात्र घसघशीत केली आहे. तब्बल 124 कोटींची कमाई त्याने केली आहे. नुकतीच फोर्ब्सने टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये शाहरुख खानचे नाव असून त्याने केलेला कमाईचा आकडा आश्चर्यचकीत करणारा आहे. एकही चित्रपट न करता त्याने कमाई केली कशी ते जाणून घेऊया.
शाहरुख खान बॉलीवूडचा किंग खान असला तरी काही वर्षांपासून त्याचे चित्रपट फारसे चालत नाही. त्याचे फॅन वगळता त्याचे चित्रपट कोणी पाहात असेल अशीही शंका येते. पण 2019 मध्ये एकही चित्रपट रिलीज न होता 2018 च्या तुलनेत शाहरुखने कमाई केली आहे. 2018 साली त्याने 58 कोटीची कमाई केली होती. तर आता शाहरुखने 124 कोटींची कमाई केली आहे . तर 2017 साली 170 कोटीची कमाई केली आहे.
आता शाहरुखचा चित्रपट रिलीज झाला नसला म्हणून काय झालं शाहरुख चित्रपटांव्यतिरिक्तही काम करतो. त्याने सध्या जाहिरातींचे अनेक प्रोजेक्ट हातात घेतले असून त्यातूनच ही कमाई झाल्याचे कळत आहे. शाहरुख खानने 14 ब्रँडसोबत टायअप केले असून ICICI, BYJU, बिग बास्केट,लक्स, ह्युंडाई… या सारखे ब्रँड त्याच्याकडे असून त्यांच्या जाहिरातीचे काम तो करत आहे. ब्रँड अॅम्बेसडर असल्यामुळेच त्याने या सगळ्या ब्रँडमधून घसघशीत कमाई केली आहे.
शाहरुख खान रेड चिली इंटरटेन्मेंट हे प्रोडक्शन हाऊससुद्धा चालवतो. या प्रोडक्शन हाऊसने वेबसिरिजची निर्मिती केली आहे. Bard of blood ही रेड चिली इंटरटेन्मेंटची वेबसिरिजही चांगली चालली त्यामुळे त्यातूनही त्याने चांगली कमाईल केली. त्यामुळे शाहरुखकडे चित्रपट नसले म्हणून काय झाले त्याचे खिसे मालामाल आहेत हे नक्की!
2017 पासून शाहरुखचा करिअर ग्राफ उतरता आहे. त्याचे चित्रपट आले तरी ते बॉक्स ऑफिसवर फार काही चालू शकले नाही. त्यातल्या त्यात Dear zindagi हा चित्रपट चालला होता. पण त्यानंतर त्याचे चित्रपट म्हणजे ‘झीरो’, ‘हॅरी मेट सेजल’ हे चित्रपट अजिबात चालले नाही. त्यामुळे शाहरुखचे चित्रपट आता फार काही चालत नाही हे शिक्कामोर्तब झाले.
शाहरुख रोमँटीक चित्रपटासाठी प्रसिद्ध असला तरी वयपरत्वे त्याने त्याच्या रोलमध्ये बदल करणे अपेक्षित होते. पण त्याने त्याचा रोमँटीक अंदाज न सोडल्यामुळे त्याला आता त्या रोलमध्ये पाहणे लोकांना अधिक रुचत नसावे म्हणूनच त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाले असावे असा अंदाज आहे.
पण इतके सगळे असूनही शाहरुख कमाई मात्र घसघशीत करत आहे हे नक्की!
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.