जागतिक मानसिक आरोग्‍य दिनानिमित्त कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

जागतिक मानसिक आरोग्‍य दिनानिमित्त कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

10 ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक मानसिक आरोग्य दिन या नावाने ओळखला जातो. यंदाच्या वर्षी हा दिवस अशा काळात आला आहे जेव्हा जगभरातील सर्वच लोकांना मानसिक स्वास्थ्याची नितांत गरज आहे. एकतर कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीचा फटका समाजातील अनेक घटकांना बसला. त्यात या महामारीने आरोग्य आणि आर्थिक स्थिती या दोन्हींवर वाईट परिणाम केला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक जण घरात अडकून पडले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे, अनेक लोक अजूनही वर्क फ्रॉम होमच करत आहेत. घरातील माणसं कधीच इतका वेळ एकत्र राहत नव्हती. मात्र असं अचानक घरात कोंडून राहवं लागण्यामुळे घरातील कौटुंबिक कलह वाढत गेले. बरेच दिवस शूटिंग बंद असल्यामुळे कलाकारांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागलं. सेलिब्रेटी हे मनोरंजनाचे काम करत असले तरी ते देखील माणूसच आहेत आणि सर्व सामान्याप्रमाणे त्यांच्याही जीवनातही अनेक समस्या असू शकतात. कलाकारांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची आजवर अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. पूर्वी याबाबत उघडपणे कोणीच बोलत नव्हतं. मात्र सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर आता सर्वजण यावर उघडपणे बोलण्यास तयार झाले आहेत. टेलीव्हिजन माध्यमात काम करणाऱ्या कलाकारांनीही याबाबत त्यांची मतं सांगितली शिवाय ते या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाय करतात तेही त्यांनी शेअर केलं. 

कलाकार ताणतणाव दूर ठेवण्यासाठी करतात हे उपाय -

कोरोना महामारीचा यंदा प्रत्‍येकाच्‍याच जीवनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे लॉकडाऊन संपलं असलं तरी लोकांना आजही अनेक आव्‍हानांना सामोरं जावं लागतंय. पूर्वीपेक्षा ताणतणावही सध्या जास्तच वाढलेला दिसून येत आहे यंदाच्‍या जागतिक मानसिक आरोग्‍य दिनानिमित्त टेलिव्हिजन माध्यामातील या कलाकारांनी आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त केल्या. 

'भाबीजी घर पर है'मधील अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) व मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड), मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी), मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी'मधील वंदना (जुही अस्‍लम), मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मधील संतोषी माँ (ग्रेसी सिंग) व इंद्रेश (आशिष कडियन) यांनी मानसिक आरोग्‍याचे महत्त्व आणि ते कशाप्रकारे तणावावर मात करतात याबाबत आपली मतं मांडली. 

रोहिताश्‍व गौर (मनमोहन तिवारी) यांनी शेअर केलं की, ''मला वाचनाची खूप आवड आहे... वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केले आहे की, ३० मिनिटे पुस्‍तक वाचन केल्‍याने तणाव कमी होण्‍यामध्‍ये मदत होते. त्यामुळे सध्या कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी मी वाचनाची आवड जोपासत आहे''

Instagram

हिमानी शिवपुरी (कटोरी अम्‍मा) ने शेअर केलं की, ''मी श्‍वासोच्‍छवासावर नियंत्रण ठेवणे व चिंतनाचा सराव करते. यामुळे मला अवधान ठेवण्‍यामध्‍ये, सकारात्‍मक ऊर्जा आणण्‍यामध्‍ये आणि तणाव दूर करण्‍यामध्‍ये मदत होते.''

Instagram

ग्रेसी सिंग (संतोषी माँ) म्‍हणाली, '' आध्‍यात्मिकदृष्‍ट्या चिंतन व नृत्‍य हे माझ्या जीवनाचे मूलभूत भाग आहेत. चिंतन हा तणाव दूर करण्‍याचा सर्वोत्तम उपाय आहे. तसेच नृत्‍य देखील. यामुळे मला शारीरिकदृष्‍ट्या तंदुरूस्‍त राहण्‍यामध्‍ये मदत होते आणि माझे मन देखील प्रसन्‍न राहते.'' 

Instagram

जुही अस्‍लम (वंदना) म्‍हणाली, ''हास्‍य तणाव कमी करते अणि मनाला आराम देते. मानसिक आरोग्‍याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि प्रत्‍येकाने शारीरिक आरोग्‍यासोबत मानसिक आरोग्‍यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी सतत हसत राहते ज्यामुळे मला तणाव कमी जाणवतो. '' 

Instagram

आशिष कडियन (इंद्रेश) ने सांगितलं की, ''मानसिक आरोग्‍य उत्तम असण्‍यासाठी तणावमुक्‍त मन असणे आवश्‍यक आहे.त्यामुळे मी शक्य तितक्या ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो''

Instagram