बधाई हो! कुस्तीपटू गीता फोगटच्या घरी आला नवा पाहुणा

बधाई हो! कुस्तीपटू गीता फोगटच्या घरी आला नवा पाहुणा

महिला कुस्तीपटू आणि कॉमनवेल्थ गेम्स 2010 (CWG) मधील सुवर्ण पदक विजेता गीता कुमारी फोगटनं मंगळवारी (24 डिसेंबर) मुलाला जन्म दिला आहे. गीतानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. पती पवन कुमार आणि बाळासोबतचा फोटो देखील तिने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये गीतानं लिहिलंय की,’HELLO BOY, तुझं स्वागत. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद बाळाला द्यावेत. यानं आता आमचं आयुष्य परिपूर्ण केलं आहे. आपलं बाळ जन्मताना पाहण्याची भावना शब्दांत वर्णन करून सांगता येणार नाही’.  20 नोव्हेंबर 2016 रोजी गीता फोगट आणि पवन कुमार या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. 

(वाचा : ‘अर्जुन रेड्डी’सोबत काम करण्यास करण जोहर उत्सुक, दिली मोठी ऑफर)

CWCमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला 

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दंगल’ गीता फोगट आणि तिची बहीण बबिता फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गीता फोगटनं रिअ‍ॅलिट शो ‘खतरों के खिलाडी’मध्येही भाग घेतला होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहली भारतीय महिला होती.

(वाचा : गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार एकत्र)

हरियाणातील बलाली गावातील गीता फोगट आणि बबिता फोगट या दोघींचा जन्म झाला. महावीर सिंह फोगट हे या दोघींचे वडील आणि माजी कुस्तीपटू देखील आहेत. महावीर फोगट यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनीच आपल्या मुलींना कुस्तीचे धडे दिले. 

(वाचा : ‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका)

गीतानं गोड बातमी अशी केली होती शेअर

काही महिन्यांपूर्वी गीता फोगटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या प्रेग्नंसीचा फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. निसर्गरम्य पर्वत रांगामध्ये बेबी बम्पवर हात ठेवून गीतानं फोटो काढला होता. या फोटोसोबत तिनं मातृत्वाबाबत भावूक मेसेजही शेअर केला होता. गीता फोगटनं लिहिलं होतं की, 'जेव्हा एखादा नवीन जीव पोटात आकार घेतो, तेव्हापासूनच आईच्या आनंदाला सुरुवात होते’.

बबिता फोगटही अडकली लग्नबंधनात

गीताची बहीण कुस्तीपटू बबितानं 1 डिसेंबर 2019 रोजी कुस्तीपटू विवेक सुहागसह विवाह थाटला. विवेक सुहाग हा हरियाणामधील कुस्तीपटू आहे. त्यानं 2018 मध्ये ‘भारत केसरी’ पुरस्कार पटकावला आहे.  

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.