गेले अनेक वर्ष चालणारी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेने अनेक कलाकार घडवले. हिना खानचे करिअर याच मालिकेने सुरू झाले होते. तर अभिनेत्री शिवांगी जोशीला या मालिकेमुळे एक वेगळी ओळखही मिळाली. मात्र आता या मालिकेतील नायरा या व्यक्तिरेखेची अचानक एक्झिट होत आहे. शिवांगी जोशीने ही मालिका अचानक सोडल्यामुळे या मालिकेतून नायरा ही व्यक्तीरेखाही काढून टाकावी लागणार आहे. मात्र शिवांगी आणि मालिकेचे दिग्दर्शिक राजन शाही यांचे बिनसल्यामुळेच शिवांगीने अचानक या मालिकेतून काढता पाय घेतला असल्याच्या सध्या अफवा आहे. यावर शिवांगीने आता आपली बाजूही मांडली आहे. कोणताही वादविवाद नसल्याचे शिवांगीचे म्हणणे आहे. मात्र निर्मात्यांशी असलेल्या वादामुळेच शिवांगी या मालिकेतून बाहेर पडत आहे असं सध्या म्हटलं जात आहे.
प्रियांका चोप्राने केले लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन, सलॉनमध्ये पोहचले पोलीस
शिवांगीने स्वतः सांगितले कारण
शिवांगी गेली चार वर्ष या मालिकेत काम करत असून तिची नायरा ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रसिद्ध झाली. मात्र आता या मालिकेतून निघण्याचा विचार शिवांगीने केला आहे. याबाबत तिने स्वतः माहिती दिली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी त्यामुळे नायरा ही व्यक्तिरेखा संपविण्याचाच विचार केला आहे. शिवांगीने आपल्या जाण्यामागील कारण स्वतः सांगितले आहे. ‘माझ्यासाठी नायराची व्यक्तिरेखा सोडून पुढे जाणं खूपच कठीण आहे. पण म्हणतात ना कहाणी संपते, पण व्यक्तिरेखा नाही. या साडेचार वर्षात शिवांगी कधी नायरा झाली आणि नायरा कधी शिवांगी बनली हे कळलंच नाही. नायरासह मला अनेक व्यक्तिरेखा करण्याची संधी मिळाली. एक मुलगी, एक सून आणि एक आई या व्यक्तिरेखा तर मी केल्याच पण सर्वात सुंदर व्यक्तिरेखा होती ती पत्नीची. कार्तिक आणि मी एकत्र येऊन कायरा बनलो आणि जगातील सर्वात मोठा आनंद कायराने मला दिला. पण आता नायराला अलविदा करण्याची वेळ आली आहे.’ हा तिचा व्हिडिओ चॅनेलच्या युट्युबवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र शिवांगीने हा प्रवास थांबवणं कठीण असल्याचंही म्हटलं आहे.
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण
व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर शिवांगीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे अनेक चाहते असून अचानक अशा प्रकारे मालिका सोडल्यामुळे नाराजही आहेत आणि हैराणही आहेत. कारण शिवांगी जोशीला या मालिकेने एक वेगळी ओळख मिळवून दिली. तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. पण आता शिवांगीची ही व्यक्तिरेखा संपत असून शिवांगी पुढे काय करणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तर तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला तिचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छाही देत आहेत. तर काहींनी नाराजी व्यक्त करत तिला मालिका न सोडण्याचा सल्लाही दिला आहे. येत्या दहा दिवसात शिवांगीची ही व्यक्तिरेखा संपणार असून चाहत्यांना खूपच वाईट वाटत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कोरोना कॉलरट्यून विरोधात कोर्टात याचिका
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक