Year Ender : या कलाकारांनी घेतला यंदा जगाचा निरोप

Year Ender : या कलाकारांनी घेतला यंदा जगाचा निरोप

एखाद्या कलाकाराने जगाचा निरोप घेतल्यावर कलाजगतावर शोककळा पसरते. या कलाकाराने निरोप घेतल्यावर त्यांची पोकळी भरून काढणं सोपं नसतं. असंच काहीसं यंदाही झालं. जेव्हा अनेक कलाकारांनी अचानक तर काहीचं वृद्धापकाळाने निरोप घेतला.

हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाने भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं 17 डिसेंबरला त्यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते आणि बऱ्याच काळापासून आजारी होते. चित्रपटांसोबतच मराठी, हिंदी आणि गुजराती रंगमंचाशीही ते निगडीत होते. श्रीराम लागू यांनी 20 पेक्षा अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं आहे. मराठी रंगमंचाच्या 20 व्या शतकातील सर्वात उत्तम कलाकारांमध्ये त्यांची गणना होते. श्रीराम यांच्याशिवाय अजूनही काही कलाकारांनी कलाजगताला केलं अलविदा. चला जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार. 

'शोले' चित्रपटातील 'कालिया' ही प्रसिद्ध भूमिका साकारणारे मराठी अभिनेते विजू खोटे यांचं 30 सप्टेंबरला मुंबईत निधन झालं. विजू हे 77 वर्षांचे होते. विजू यांनी हिंदीसोबतच मराठीतील अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. तब्बल 300 चित्रपटांमध्ये काम केलेल्या विजू यांनी टीव्ही इंडस्ट्रीतही भरपूर काम केलं. विजू खोटेंना 1993 साली आलेल्या टीव्ही सीरियल 'जबान संभाल के' नेही प्रसिद्धी दिली होती. विजू खोटे यांनी रंगमंचावर काम केलं होतं. विजू खोटे यांची बहीण शुभा खोटे याही अभिनेत्री आहेत.

सिनेमाजगतावर 49 वर्ष राज्य करणारे अभिनेता गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांनी 10 जूनला सिनेमाजगतला अलविदा केलं. गिरीश हे बऱ्याच काळापासून आजारी होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी नाटक, स्क्रिप्ट रायटिंग आणि दिग्दर्शन या तिनही क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं. 1970 मध्ये कन्नड फिल्ममधून त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून सुरुवात केली. गेल्या चार दशकांपासून आपल्या लिखाणाने प्रेक्षकांचं मन गिरीश कर्नाड यांनी जिंकून घेतलं होतं. त्यांनी लिहिलेल्या नाटकांचं इंग्रजी आणि अन्य बऱ्याच भाषांमध्येही अनुवाद करण्यात आला आहे. तसंच या नाटकांचं दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक इब्राहिम अल्काझी, अलेक पदमसी, प्रसन्ना, अरविंद गौर, सत्यदेव दुबे, विजया मेहता, श्यामानंद जलान, अमाल अलाना आणि झफर मोहिउद्दीन यांनी केलं.

World Cancer Day च्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यांचे निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून उपचार सुरु होते. सत्तर वर्षीय रमेश भाटकर यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. ‘हॅलो इन्स्पेक्टर’ आणि ‘कमांडर’मधून गाजलेले आणि नावारूपाला आलेले रमेश भाटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय नावाजलेले कलाकार होते. गायक आणि संगीतकार वासुदेव भाटकर यांचे सुपुत्र असणारे रमेश भाटकर यांनी आपल्या अभिनयाने अनेक नाटकं गाजवली. रंगभूमीपासूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या रमेश भाटकरांना खरी ओळख दिली ती, ‘अश्रूंची झाली फुले’मधील लाल्याने. अगदी आजही त्यांना या भूमिकेने ओळखले जाते. ‘राहू केतू’, ‘मुक्ता’, ‘अखेर तू येशीलच’, ‘केव्हा तरी पहाटे’ ही रमेश भाटकर यांची गाजलेली नाटकं होती.

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका गीता माळीचं रस्ता अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आगरा हायवेवर झाला. नाशिककडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांच्या नवरा विजय माळी हेही होते. तेही या अपघातात गंभीर जखमी झाले. गीता या अमेरिकेतील एका शोनंतर मायदेशी परतून नाशिकला जात होत्या.

बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांची आई आणि अभिनेत्री-लेखिका शौकत कैफी आझमी (Shaukat Kaifi) यांचं 22 नोव्हेंबरला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी मुंबईत प्रार्थना सभाही ठेवली होती. या सभेला सिनेमाजगत अनेक सेलिब्रिटीज आणि त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. 90 वर्षांच्या शौकत कैफी या बऱ्याच काळापासून आजारी होत्या.

बॉलीवूडमध्ये एक्शनला नव्या उंचीवर नेणारे वीरू देवगण यांनी 27 मे ला जगाचा निरोप घेतला. अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांनी 1967 मध्ये 'अनीता' या चित्रपटातून स्टंटमन म्हणून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. ते पंजाबच्या अमृतसरचे होते आणि गेल्या काही काळापासून आजारी होते. मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने वीरूचं यांचं निधन झालं. वीरू देवगण यांनी हिंदी सिनेमाजगतात 80 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये एक्शन सीन्सचं दिग्दर्शन केलं होतं.

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडीयन दिन्यार कॉट्रँक्टर यांचं 5 जूनला निधन झालं. 79 वर्षांचे दिन्यार हे बऱ्याच काळापासून आजारी होते. कॉमेडी भूमिकांमध्ये हातखंडा असणारे दिन्यार कॉट्रँक्टर यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटातही काम केलं आहे. दिन्यार यांचे अंत्यविधी पारसी पारंपारिक पद्धतीने करण्यात आले.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.