या मालिकेच्या सेटवर अनेकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, उडाला गोंधळ

या मालिकेच्या सेटवर अनेकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, उडाला गोंधळ

#MissionBegingAgain च्या हाकेनंतर आता मुंबई हळुहळू पूर्ववत होऊ लागली आहे. मनोरंजन क्षेत्राचीही कामे नियमांचे पालन करुन सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन सुरु झाले असून आता घरबसल्या अनेकांना मालिकांचे नवे भागही पाहता येत आहेत. सेटवर कमीत कमी गर्दी करुन आणि अत्यंत काळजीपूर्व असे काम सुरु असताना अचानक एका प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या एका अभिनेत्याचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ उडाला. हा अभिनेताच नाही तर इतर काहींनीही ज्यावेळी कोरोना टेस्ट केली त्यावेळी त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या मालिकेच्या शूटिंगचे काम तातडीने थांबवण्यात आले आहे. ही मालिका हिंदीतील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका आहे. जाणून घेऊया नेमकं काय घडलं 

रणवीर सिंगवर खळबळजनक आरोप, सुशांत प्रकरणात टीका

अभिनेत्याला येत होता ताप

Instagram

हिंदीतील या लोकप्रिया मालिकेमध्ये काम करणारा अभिनेता सचिन त्यागी याला काही दिवसांपासून थोडा थोडा ताप येत होता. म्हणून त्यांनी स्वत:च जाऊन कोरोना टेस्ट करणे पसंत केले. त्यांनी टेस्ट केल्यानंतर त्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टने एकच गोंधळ उडाला. सोमवारी नेहमीप्रमाणे शूटिंगचे शेड्युल लागले असताना हा रिपोर्ट आल्यामुळे शूटिंगचा गाशा गुंडाळावा लागला. सचिनच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचा कोरोना टेस्ट करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यापैकी काहींचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळत आहे. पण त्यावर POPxomarathi खात्री देऊ शकत नाही. कारण अद्याप कोणत्याही कलाकाराने माहिती दिली नाही.पण सचिन त्यागी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मात्र वाऱ्याच्या वेगात पसरली आहे. 

शूटिंग बंद करण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यामुळे त्याचा धोका इतरांना होऊ नये यासाठी मालिकेच्या शूटिंगचे काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता शूटिंग पुन्हा कधी सुरु होईल हे मालिकेच्या टीमच्या माध्यमातूनच कळू शकेल. कारण अद्याप काही जणांचा रिपोर्ट हा यायचा आहे. मुळात टीममधील एक व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनीही सेटवर न येणेच पसंत केले आहे. 

अजय देवगण पहिल्यांदाच करणार यशराज बॅनरमध्ये काम, अहान पांडेचे पदार्पण

या आधीही सेटवर कोरोनाचे संक्रमण

Instagram

सेटवर कोरोना होण्याची ही पहिली वेळ नाही तर या आधीही हिंदी मालिकांच्या शूटिंग दरम्यान कोरोना झालेली काही उदाहरण आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर मालिकांचे शूटिंग काही काळासाठी बंदही करण्यात आले आहे. या आधी मेरे साई, एक महानायक डॉ. बी आर आंबेडकर, कसौटी जिंदगी की या मालिकांच्या सेटवरही कोरोना झाला आहे. त्यामुळे या मालिकांनीही ब्रेक घेतला. तर दुसरीकडे एका मालिकेच्या सेटवर कोरोनामुळे एकाचा मृत्यू देखील झाला आहे. 


त्यामुळे आता जर ही तुमची आवडती मालिका असेल तर कदाचित तुम्हाला काही काळ याचे नवीन भाग पाहायला मिळतील की, नाही याची शंका आहे. 

 

एस. एस. राजमौलीच्या 'RRR' मध्ये आता आलियाऐवजी प्रियांकांची वर्णी