अभिनेत्री शिवांगी जोशीला लाईफ पार्टनरमध्ये हव्या आहेत या ‘3’ गोष्टी

अभिनेत्री शिवांगी जोशीला लाईफ पार्टनरमध्ये हव्या आहेत या ‘3’ गोष्टी

टेलिव्हिजनवरील मालिकांचा नेहमीच एक खास प्रेक्षकवर्ग असतो. ज्यामुळेया मालिकांमधील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हिंदी मालिकांमधील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका अनेक वर्षांपासून टेलिव्हिजनवर प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये हिना खाननंतर 'शिवांगी जोशी'वर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. शिवांगी जोशी या मालिकेत ‘नायरा सिंघानिया’ची भूमिका साकारत आहे तर मोहसिन खान हा ‘कार्तिक गोयंका’ची भूमिका साकारत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीवर चाहते अक्षरशः फिदा आहेत. ज्यामुळे अगदी कमी काळातच या जोडीला विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र एवढंच नाही तर ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच शिवांगी आणि मोहसिनच्या खऱ्या खुऱ्या केमिस्ट्रीबद्दल देखील नेहमीच चर्चा होताना दिसते. काही दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच ते एकमेकांशी लग्न करतील अशी चर्चा रंगत होती. मात्र त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. वास्तविक या दोघांनी आपल्या नात्याबद्दल मीडियाला कधीच काही उघडपणे काही सांगितलं नाही. मात्र शिवांगीने आता तिला नेमका कसा लाईफ पार्टनर हवा याबद्दल एक खुलासा केला आहे.

Instagram

शिवांगीला नेमका कसा हवा आहे जोडीदार

प्रत्येक मुलीच्या तिच्या लाईफ पार्टनरकडून काही खास अपेक्षा असतात. ज्यामुळे ती तिच्या स्वप्नातील राजकुमार नेमका कसा असेल याची नेहमीच स्वप्न रंगवत असते. शिवांगी जोशीच्यादेखील तिच्या लाईफ पार्टनरकडून तीन स्पेशल अपेक्षा आहेत. शिवांगीला तिचा लाईफ पार्टनर प्रेमळ, काळजी घेणारा आणि प्रामाणिक हवा आहे. शिवांगी नेमकं आताच या गोष्टीचा खुलासा का केला हे आता सांगता येणार नाही. कदाचित तिला मोहसिन खानमध्ये हे गुण आढळत असावेत अथवा तो या गुणांमध्ये मुळीच बसत नसावा असंही असू शकेल. कारण काही असलं तरी शिवांगीच्या लाईफ पार्टनरकडून असलेल्या या अपेक्षा तिने आता जगजाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे असा कोणीतरी तिच्या आयुष्यात लवकरच येण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. तेव्हा या अपेक्षांना पात्र असलेला कुणीतरी लवकर शिवांगी जोशीच्या आयुष्यात आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

Instagram

लॉकडाऊनमध्ये शिवांगीचा कसा आहे दिनक्रम

लॉकडाऊनमुळे सध्या शिवांगी तिच्या घरी म्हणजेच डेहरादूनला कुटुंबासोबत राहत आहे. विशेष म्हणजे ती घरातूनच तिच्या मालिकेसाठीही वर्क फ्रॉम होम करत आहे. घरात राहून घरच्यासोंबत वेळ घालवता घालवता ती तिचं कामही घरातून करत आहे. सध्या तिच्या मालिकेच्या शूटिंगसाठी तिचं संपूर्ण कुटुंब तिला मदत करत आहे. मालिकेसाठी तिला देण्यात आलेले सीन ती तिच्या घरातून एका थ्रीडी कॅमेऱ्यावर शुट करते आणि केलेलं शूटिंग ती पुढे तिच्या क्रिएटिव्ह टीमकडे पाठवून देते. ज्यामुळे मग ही टीम घरातूनच या शॉटवर एडिंटींगचं काम करत आहे. ज्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही लवकरच चाहत्यांना या मालिकेचे पुढील भाग पाहाता येतील. लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आता अशा नवनवीन युक्त्या वापरून आपापली कामे अशी घरातूनच करावी लागत आहेत. 

Instagram

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा -

नव्वदच्या दशकातील मालिकाच नाही जाहिरातदेखील होत्या सुपरहिट

Lockdown मुळे दिल्लीत अडकलेल्या जया बच्चन यांना मिस करतोय अभिषेक

शुटिंग करता करता झाले प्रेम आणि मग केलं लग्न