YehRishteyHaiPayarKe : अबीर आणि मिष्टीच्या लग्नादरम्यान कलाकारांनी केली धमाल

YehRishteyHaiPayarKe : अबीर आणि मिष्टीच्या लग्नादरम्यान कलाकारांनी केली धमाल

मराठी अभिनेत्री संगीता कापुरे प्रसिद्ध हिंदी मालिका "ये रिश्ते हैं प्यार के" मधील विनोदी भूमिका 'निधी राजवंश' म्हणून ओळखली जाते. जी प्राइमटाइममध्ये मोठ्या प्रमाणात टीआरपी असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. तिचे पात्र निधी राजवंश उर्फ निधी मामी ही आता प्रत्येक घरात पोचली आहे. मालिकेमध्ये सध्या लग्नाचे शूट सिक्वेन्स असल्याने काही कलाकारांना नाईटशिफ्ट होती, त्या शूटच्या काही मजेदार श्रणांचे काही फोटोज नुकतेच संगीत कापुरेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

शूटदरम्यान कलाकारांची धमाल

संगीताने हे फोटो तिच्या चाहत्यांना आपल्या शूटदरम्यान घडणाऱ्या गमतीजमती दाखवण्यासाठी शेअर केले आहेत. बहुतेक वेळा आपल्या बाबतीतही असं होतं की, ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करूनही खूप आनंद होतो आणि मग घडतात ते मजेशीर किस्से आणि रोमांचक अनुभव. संगीताने शेअर केलेले फोटोज हे त्याचेच उत्तम पुरावे आहेत.

संगीताने शेअर केलेल्या फोटोजमध्ये अनेक मजेशीर फोटोज आहेत. काही कॅमेराकडे पोज करून झोपण्याचे नाटक करत आहेत तर काही गप्पामध्ये रंगलेले दिसत आहे. संगीत कापुरे " ये रिश्ते हैं प्यार के" च्या मालिकेतली अतिशय आवडती भूमिका मानली जाते आणि तिच्या सहकलाकारांसोबत तिची मैत्री खूपच घट्ट आहे.

लग्नाच्या सिक्वेन्ससाठी खास पारंपारिक लुक

"ये रिश्ते हैं प्यार के" ची गर्ल गँग मात्र या पारंपरिक कपड्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. अबीर आणि मिष्टी म्हणजेच #mishbir आणि #kuku च्या लग्नासाठी सर्व कलाकारांना छान पारंपारिक लुक देण्यात आला आहे. संगीता या लग्नाच्या सिक्वेन्ससाठी खास नथ आणि मांग टिकाच्या लुकमध्ये अतिशय मोहक दिसत आहे.

तसंच या मालिकेतील पारूल मावशीच्या भूमिकेतील अभिनेत्री चैत्राली गुप्ते हिनेही इन्स्टावर तिच्या लुकचे फोटोज शेअर केले होते. 

चैत्रीलीने आपल्या आईची फॅन मूमेंटसुद्धा इन्स्टावर शेअर केली. चैत्रालीच्या आईच्या आवडत्या कलाकाराची शाहीर शेख म्हणजेच या मालिकेतील अबीरची सेटवर भेट झाली.

'ये रिश्ते हैं प्यार के' रंजक वळणावर

View this post on Instagram

#yehrishteyhainpyaarke @rhea_shrm PC @ritvik_arora

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh) on

अनेक मराठी कलाकार असलेली ही हिंदी मालिका सध्या रंजक वळणावर आहे. वर सांगितल्याप्रमाणे यामध्ये सध्या लग्नाचा ग्रँड सिक्वेन्स सुरू असून प्रेक्षकांची लाडकी जोडी #mishbir अखेर लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचं दुसरं व्हर्जन आहे. या मालिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता पाहूया कूकू आणि मिशबीरच्या लग्नानंतर या मालिकेत पुढे काय घडतं ते.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.