बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय

बॉलीवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय

बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींनी नुकतेच पदार्पण केले आहे. त्यांच्या करिअरचा ग्राफ फार मोठा नसला तरी त्यांनी अगदी लहान वयात मोठा पल्ला गाठला आहे असेच म्हणायला हवे. कारण या सेलिब्रिटींची वय अगदीच लहान आहेत. बॉलीवूडमधील अशाच काही यंग सेलिब्रिटींची यादी आम्ही तयार केली आहे. त्यांचे वय तुम्हाला कळले तर तुम्हीही म्हणाल.. की ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’

सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठी करत नाही ना दिखावा

अनन्या पांडे (ananya pandey)

Instagram

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिला करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून लॉन्च केले. अनन्या सध्या 20 वर्षांची असून बॉलीवूडमधील ती सर्वात यंग अशी सेलिब्रिटी आहे. 29 मार्च 1999 ही तिची जन्मतारीख आहे. ‘ स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट फारसा चालला नसला तरी तिला या चित्रपटाचा फारच फायदा झाला. कारण या चित्रपटामुळेच तिला ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात दिसणार आहे. अनन्या पांडे वयाने लहान असली तरी ती अभ्यासातही चांगली आहे. इतक्या लहान वयात पदार्पण केल्यामुळे अनन्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे. 

तारा सुतारीया (Tara sutraria)

Instgram

बाल कलाकार म्हणून नावारुपाला आलेली तारा सुतारीया ही सध्या 23 वर्षांची आहे. रिअॅलिटी शोज आणि मालिकांमध्ये काम केलेल्या ताराला सगळ्यात मोठी संधी ही ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली. तारा सुतारीयाचा जन्म 19 नोव्हेंबर 1995 सालातील आहे. तिने सध्या एकाच चित्रपटातून काम केले असेल तरी तिच्या हातात ‘मरजावा’ नावाचा चित्रपट आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्यासोबत दिसणार आहे. करण जोहरनंतर ती आणखी एका बिग बॅनर चित्रपटात दिसणार आहे.

सारा अली खान (Sara ali khan)

Instagram

छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. तिचा मिश्किल स्वभाव आणि तिच्यातील साधेपणाच अधिकांना भावला आहे. म्हणूनच तिच्या पदार्पणानंतर तिला खूप प्रेम मिळाले. आई अमृता सिंहसारखा हुबेहुब चेहरा असून तिचा अभिनयही उत्तम आहे. सारा अली खान 23 वर्षांची असून तिचा जन्म  12 ऑगस्ट 1995 सालातील आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटात ती सुशांतसिंह राजपूतसोबत दिसली. त्यानंतर तिने रणवीर सिंहसोबत ‘सिंबा’ हा चित्रपट केला आणि आता ती इम्तियाज अलीच्या रोमँटीक चित्रपटात दिसणार आहे.

एकता कपूरने लाँच केलेले ‘हे’ कलाकार गाजवत आहेत बॉलीवूड

जान्हवी कपूर ( Janhvi kapoor)

Instagram

सैराटच्या हिंदी रिमेकमधून आलेली जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. ‘धडक’ या चित्रपटात ती इशान खट्टरसोबत दिसली होती. हा चित्रपट फार काही चालला नाही. पण जान्हवीला एक वेगळी ओळख मिळाली. जान्हवी कपूर आता करण जोहरच्या तख्त आणि गुंजन सक्सेना या बायोपिकमध्ये दिसणार आहे. जान्हवी 22 वर्षांची असून तिचा जन्म 6 मार्च 1997 चा आहे. ती सध्या 22 वर्षांची आहे.

निधी अग्रवाल (Nidhhi agerwal)

Instagram

मुन्ना मायकल या चित्रपटातून पदार्पण केलेली निधी सध्या 25 वर्षांची आहे.  17 ऑगस्ट 1993 ही तिची जन्मतारीख आहे. टायगर श्रॉफसोबत ती मुन्ना मायकलमध्ये दिसली. त्यानंतर तिने तेलगु चित्रपटातही काम केले. सव्यसाची, mr. manu हे तिचे साऊथमधील चित्रपट आहे. 


या अभिनेत्री पंचविशीच्या आत असून त्यांनी आपले पाय बॉलीवूडमध्ये घट्ट रोवले आहे. 

ब्रेकअप झाल्याच्या चर्चेदरम्यान Nach Baliye 9 च्या मंचावर दिसली ही जोडी