तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगते तुमची रास

तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगते तुमची रास

प्रत्येक नात्यात प्रेम तर असतंच. पण प्रेमाच्या नात्यात सेक्सही तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर आपल्याला एकांतात कधी आणि कसा वेळ घालवायला मिळणार याचा नक्कीच प्रत्येक माणूस विचार करतो. असे विचार आल्यानंतर अर्थातच वेगवेगळ्या भावना आणि विचार मनात यायला लागतात. फक्त विचारच नाही तर त्या विचारात माणूस बराच पुढे निघून जातो. पण तुम्हाला माहीत आहे का तुमचा स्वभाव ज्याप्रमाणे राशीवरून ठरत असतो. तसंच तुम्हाला नक्की कशा सेक्समध्ये इंटरेस्ट आहे हेदेखील राशीप्रमाणे असतं. आपला स्वभाव हा राशी आणि नक्षत्रांवरून ठरत असतो असं म्हटलं जातं. त्याच राशीनुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो आणि त्यानुसारच त्याचं वागणं असतं. त्यामुळे प्रत्येक राशीनुसार सेक्स कसा केला जातो हेदेखील ठरतं. आम्ही तुम्हाला आज तुमची रास तुम्हाला कसं सेक्स हवं आहे हे सांगते ते सांगणार आहोत.


मेष (21 मार्च - 19 एप्रिल)


aries-bedroom
या राशीच्या मुलींचं व्यक्तीमत्त्व अतिशय पॉवरफुल असतं. अर्थात एखाद्याला खेचून घेण्याची ताकद यांच्या व्यक्तीमत्वात असते. कोणत्याही गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये ठेवणं या राशीच्या व्यक्तींना आवडतं. अशा तऱ्हेची पॅशन कोणत्याही दुसऱ्या राशीच्या व्यक्तीमध्ये सापडणार नाही. अर्थात हे सर्व त्यांच्या मूडवर अवलंबून असतं. त्यांचा मूड यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम करत असतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, जगापासून दूर जर फक्त आपल्या जोडीदाराबरोबर या राशीच्या व्यक्ती असतील तर त्यांचा जोडीदार अंदाजही लावू शकणार नाही की, सकाळी नक्की कोणत्या बाजूला त्यांना जाग येईल.


वृषभ ( 20 एप्रिल - 20 मे)


taurus-bedroom
अतिशय नम्र आणि चांगल्या प्रेयसी म्हणून या राशीच्या मुलींची ओळख आहे. आपल्या जोडीदाराचा मूड बनवण्यात यांचा हातखंडा आहे. एकांतामध्ये केवळ फिजिकल रिलेशन इतकंच यांचं अस्तित्व नाही तर अतिशय रोमँटिक असा अंदाज या राशीच्या मुलींंचा असतो. सर्वात जास्त रोमँटिक रास म्हणून या राशीचा उल्लेख करावा लागतो. आपल्या जोडीदाराला नेहमी कसं खूष ठेवायचं हे या राशीच्या व्यक्तीकडून शिकायला हवं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.


मिथुन (21 मे - 21 जून)


gemini-bedroom
आपल्या जोडीदाराला उत्तेजित करणं या राशीच्या लोकांना जास्त आवडतं. एकांतामध्ये काय होऊ शकेल किंवा काय काय करता येईल हे बोलायलादेखील या राशीच्या लोकांना खूप आवडतं. या राशीच्या लोकांमध्ये एक खास स्पार्क असतो, जो एकांतातील क्षण हे कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखे घडवून आणतो. शिवाय मिथुन राशीच्या व्यक्तीदेखील अतिशय रोमँटिक आणि सेक्समध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांचा जोडीदार हा नेहमीच सेक्सच्या बाबतीत आनंदी असतो.


कर्क (22 जून - 22 जुलै)


cancer-bedroom
यांच्यासाठी प्रेम आणि सेक्स या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकांतामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर काही क्षणातच या राशीच्या व्यक्ती इंटिमेट होतात. या राशीच्या लोकांना वाईल्ड साईड आवडत नाही असं म्हणता येणार नाही. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्यासाठी जोडीदारासोबतच कम्फर्ट असतो. एकदा जोडीदाराबरोबर व्यवस्थित कम्फर्ट झोनमध्ये आल्यानंतर यांच्यासारखा पार्टनर नाही. पण जर आपल्या जोडीदाराबरोबर या राशीच्या व्यक्ती कम्फर्टेबल नसतील तर मात्र पुढे काहीच होऊ शकत नाही. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी  कमिटमेंट खूप महत्त्वाची असते. जर कमिटमेंट असेल तर या राशीच्या व्यक्ती सेक्सचा भरपूर आनंद देऊ आणि घेऊ शकतात.


सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)


leo-bedroom
सेक्सच्या बाबतीत सिंंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास खूपच चांगला असतो. आपली वाईल्ड साईड दाखवून आपल्या जोडीदाराला खूष करणं तुम्हाला खूपच आवडतं. तुम्ही जसे दिसता तसे सेक्सच्या बाबतीत नक्कीच नाही. त्यामुळेच तुमच्या जोडीदाराला तुमचा अंदाज येणं थोडं कठीण असतं. पण सिंह राशीच्या व्यक्तींना नेहमीच वर्चस्व गाजवणं आवडत असतं आणि सेक्सच्या बाबतीतही हाच अनुभव त्यांच्या जोडीदारांना येत असतो.  


कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)


virgo-bedroom
तुमचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय शांत आणि कुल आहे, पण बेडरूममध्ये मात्र तुमचा स्वभाव अगदीच वेगळा असतो. जसं तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येतो, तुमचा पूर्ण अंदाज बदलतो. तुम्हाला डोळ्यांनी आपले भाव दाखवणं चांगलंच जमतं आणि त्यामुळेच तुमचा जोडीदार तुमच्याकडे जास्त आकर्षिक होतो. एकांताच्या क्षणांना त्यामुळेच तुम्ही जास्त खास बनवू शकता.


तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)


libra-bedroom
तूळ राशींच्या व्यक्तीसाठी सेक्स म्हणजे एक प्रकारचे साहस. प्रत्येकवेळी काहीतरी नवं करावं असं या राशीच्या लोकांना वाटत असतं. आपल्या जोडीदाराला नेहमीच काहीतरी सरप्राईज करण्याची यांची वृत्ती असते. नेहमी काहीतरी वेगवेगळ्या फँटसी या राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर करत असतात. तसंच आपल्या जोडीदाराला सेक्समध्ये आव्हान देणंही या राशीच्या लोकांना जास्त आवडतं.


वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)


scorpio-bedroom
तुमचं व्यक्तीमत्त्व अतिशय आकर्षक असतं. कोणालाही तुम्ही आपल्याकडे आकर्षून घेऊ शकता. तुम्हाला फँटास्टिक अर्थात अप्रतिम लव्हर म्हटलं जातं. तुमच्या राशीसारखं कोणीच कोणावरही प्रेम करू शकत नाही. त्यामुळेच तुमचा जोडीदारदेखील तुमच्याकडून जास्त अपेक्षा करत असतो आणि तुम्ही कधीच त्याचा अपेक्षाभंग करत नाही. वास्तविक वृश्चिक राशीची लोकं ही सर्वात जास्त रोमँटिक आणि आपल्या जोडीदाराला सरप्राईज देणारी लोकं म्हणून ओळखली जातात.


धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)


capricon
प्रत्येक बाबतीत तुम्ही अतिशय क्रिएटिव्ह असता. एकच काम तुम्हाला त्याच त्याच तऱ्हेने करणं अजिबातच आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमीच काहीतरी वेगळं करत राहण्याची इच्छा असते. नेहमीच तुमचं मन तरूण ठेवणारा तुमचा स्वभाव असल्यामुळे काहीतरी सतत वेगळं करण्याची तुमची इच्छा असते आणि त्यामुळेच तुम्ही नेहमी आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्यासाठी धडपडत असता. याच तुमच्या स्वभावामुळे सेक्स लाईफवरदेखील तसाच परिणाम होत असतो.


मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)


sagittarius-bedroom
मकर रास ही नेहमी स्वतःमध्ये गुंग असते. पण बेडरूमध्ये मात्र या राशीच्या लोकांचा स्वभाव अगदी वेगळा असतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वेगवेगळे प्रयोग करायला खूपच मजा येते. तुमच्या इच्छा आणि अपेक्षा जोडीदाराला सांगायला कधीही तुम्हाला लाज वाटत नाही आणि त्यामुळेच तुमचं सेक्स लाईफ अतिशय मस्त असतं.


कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)


aquarius-bedroom


या राशीच्या लोकांना तर लव्ह गुरूच मानायला हवं. या राशीच्या लोकांजवळ कमालीचे मूव्ह्ज असतात. जितका शारीरिक अनुभव सेक्सचा यांच्याजवळ असतो तेवढाच मानसिकदेखील असतो. या व्यक्तींसाठी सेक्स म्हणजे मन, बुद्धी, शरीर आणि भावनांचा एक अनोखा मेळच आहे.


मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)


ezgif.com-resize %282%29
तुमच्यासाठी तुमच्या जोडीदाराचा आनंद हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये हवा तो बदल घडवून आणू शकता. सेक्सदेखील तुमच्यासाठी एक रोमान्सचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे तुमचा जोडीदार नेहमीच तुमच्यापासून आनंदी राहतो. शिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराला जसं हवं त्याप्रमाणे त्याला आनंद द्यायला नेहमीच तयार असता आणि आपल्याला जे हवं तेदेखील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून या स्वभावामुळे मिळवता येतं.


फोटो सौजन्य - Giphy


हेदेखील वाचा - 


जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'


कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या


फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या