पानिपत चित्रटात सकिना बेगमच्या भूमिकेत झीनत अमान,पोस्टर रिलीज

पानिपत चित्रटात सकिना बेगमच्या भूमिकेत झीनत अमान,पोस्टर रिलीज

अर्जुन कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेकांना सडकून टीका केली.अर्जुन कपूर यामुळे ट्रोलसुद्धा झाला. पण आता या चित्रपटामधील अन्य महत्वाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये सकिना बेगमचे पोस्टर रिलीज करण्याच आले ही भूमिका अन्य कोणी नाही तर ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान साकारत आहे. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा झीनत अमान त्यांच्या चाहत्यांसाठी परतल्या आहेत असेच म्हणायला हवे.

सनी लिओनचा हा चित्रपट अडकला आहे वादाच्या भोवऱ्यात

पानिपतमधून पुन्हा चित्रपटात

Instagram

झीनत अमान 67 वर्षांच्या असून त्यांना आतापर्यंत 50हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या काळात त्यांची स्टाईल ही फारच प्रसिद्ध होती. अभिनयासोबतच त्या ब्युटी क्वीन म्हणून प्रसिद्ध होत्या. झीनत अधून मधून काम करतच असतातच. पण 2016 रोजी आलेल्या ‘दिल तो दिवाना है’ या चित्रपटानंतर त्या विशेष अशा चित्रपटात दिसल्या नाहीत. पण अचानक ज्यावेळी अर्जुन कपूरने त्यांचे हे सकिना बेगम अवतारातील पोस्टर शेअर केले त्यावेळी सकिना बेगमच्या भूमिकेत झीनत अमान असल्याचे कळले. याशिवाय अर्जुन कपूरने आणखी दोन पोस्टर शेअर केले आहेत.

कोण होती सकिन बेगम?

सकिना बेगम या मोघल घराण्यातील राजकन्या होत्या. त्यांचे वडील हुमायून आणि आई मा चुचक बेगम. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ- उतार आले. इतिहासात त्यांचाही महत्वाचा वाटा आहे. पानिपतच्या लढाईच्यावेळी त्या होत्या. त्यामुळेच हे महत्वाचे काम झीनत अमान यांना देण्यात आले. 

या कारणांमुळे 'पानिपत' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती

अर्जुन कपूर मात्र झाला ट्रोल

Instagram

‘पानिपत’ या चित्रपटात अर्जुन कपूर महत्वाची भूमिका बजावत आहे. अर्थातच ही भूमिका आहे सदाशिव पेशव्यांची. पानिपतच्या लढ्याची रणणिती आखणारा हा पेशवा अर्जुन कपूरच्या रुपात लोकांना भावला नाही. त्यामुळेच त्याच्यावर टीकेची झोड उठवली गेली. त्याला पानिपतच्या ट्रेलरनंतर बरेच ट्रोल करण्यात आले. या चित्रपटासंदर्भातील अनेक मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले. 

संजय दत्तची वाहवा

Instagram

या भूमिकेत संजय दत्तची भूमिका ही लोकांना फारच भावली आहे. संजय दत्त या चित्रपटात दुर्रानी साम्राज्यचे संस्थापक अहमद शहा अब्दालीची भूमिका साकारत आहे. त्याचा चित्रपटातील लुक अनेकांना आवडला.  त्यामुळे ट्रेलरमध्ये तोच जास्त भाव खाऊन गेला. चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकरांचे असून जोधा अकबरनंतर ते हा पिरियॉडीक चित्रपट करत आहेत. पण त्यांच्या या चित्रपटात ट्रेलरवरुन तरी काही नावीण्य नाही असेच वाटत आहे. आता चित्रपटाच्या रिलीजनंतर हा चित्रपट नेमका कसा झाला आहे ते कळेल. लोकांना पानिपतची गोवारीकरांनी पडद्यावर मांडलेली लढाई आवडली की नाही ते कळेल. 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.