लग्नसराई - accessories

सध्या हॉट आहे !

arrow icon redirect

फॅशन जी तुम्हाला ठेवेल नेहमी फ्रेश

तुम्हाला फॅशन इतकी आवडते का? की तुम्ही अक्षरशः फॅशन जगता. तुम्हीही फॅशनसाठी वेडे असाल आणि तुम्हाला फॅशन करायला आवडत असेल तर अगदी हाय स्ट्रीट फॅशनपासून ते स्थानिक मार्केटमधील फॅशन, माहीत नसलेले ऑनलाईन फॅशन ब्रँड्स या सगळ्यातून नक्की तुम्हाला काय आवडेल याची इत्यंभूत माहिती आणि ती कशी योग्य रितीने फॅशन कॅरी करायची याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतो. यामध्ये तुम्हाला काय काय जाणून घ्यायला मिळेल याचीही एक झलक तुम्हाला आम्ही इथे देतोय. अगदी पारंपरिक कपड्यांपासून ते आताच्या आधुनिक फॅशनपर्यंत सर्व काही तुम्हाला यातून जाणून घेता येते. 

लेटेस्ट ट्रेंड्स - वेस्टर्न 

आता खरं तर पारंपरिक कपडे हे काही कार्यक्रमांना वापरण्यात येतात. जास्तीत जास्त वापर होतो तो अत्याधुनिक फॅशनचा अर्थात वेस्टर्न आणि मॉर्डन कपड्यांचा. तुम्हाला कोणत्या स्टाईल्स सूट होतील आणि अगदी तुमचा बांधा कसा आहे इथपासून ते तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे घातल्यावर अधिक सुंदर दिसतील इथपर्यंत सर्व माहिती तुम्हाला या विभागात जाणून घेता येते. कान्सच्या रेड कारपेटवर अवतरणाऱ्या तुमच्या आवडत्या अभिनेत्रींच्या फॅशन, तसंच विविध चित्रपटांमधून त्यांनी कोणत्या नव्या फॅशनचा ट्रेंड चालू केला आहे याबद्दलही माहिती तुम्हाला या विभागातून जाणून घेता येईल. इतकंच नाही तर अगदी पारंपरिक साड्यांपासून मॉडर्न ड्रेस कसे शिवायचे आणि फॅशन कशी कॅरी करायची याचीही माहिती मिळेल. 

लेटेस्ट ट्रेंड्स - पारंपरिक 

कोणत्याही कार्यक्रमांना आजही आपल्याकडे पारंपरिक कपड्यांना महत्त्व आहे. त्यातही साडी आणि शरारा अशा कपड्यांना तर आजही मागणी आहे अर्थात ज्याला भारतीय वेशभूषा (Indian Wear) म्हटले जाते. विशेषतः साडी. कोणत्या साड्या कोणत्या कार्यक्रमांना परिधान करायच्या. त्याची कशी स्टाईल करायची. त्यावर कोणते दागिने अधिक उठून दिसतील. तसंच त्या साड्यांची आणि कपड्यांची कशी काळजी घ्यायची या सगळ्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला या विभागात मिळेल. लग्नातील साड्यांपासून बनवला जाणारा लेहंगा अथवा लग्नातील लेहंग्याचा पुढे कसा वापर करायचा या सगळ्याची माहिती तुम्हाला इथेच मिळेल.

सगळ्यांवर भारी पडते ती साडी 

कोणत्याही कार्यक्रमांना आपल्याकडे साडी हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक कार्यक्रमांसाठी विविध प्रकारच्या आणि फॅशनच्या साड्या आपल्याकडे उपलब्ध असतात.  या साडीचा पोत, त्याच्या किमती, कुठे चांगल्या साड्या मिळतील. कोणत्या प्रकारच्या साड्या कोणत्या कार्यक्रमांसाठी वापरता येतील या सगळ्याबाबत सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर. 

सूट पटियाला….

साडीनंतर कोणता पारंपरिक ड्रेसचा प्रकार असेल तर तो आहे पंजाबी सूट. यामध्येही आता वेगवेगळ्या फॅशन आल्या आहेत. अगदी साध्या पंजाबी ड्रेस पासून ते पतियाळा, पलाझो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फॅशचे पंजाबी सूट वेगवेगळ्या कार्यक्रमांना घालता येतात. त्यावर कोणत्या प्रकारचे दागिने अथवा बांगड्या घालता येतील या सगळ्याची फॅशन आणि स्टाईल तुम्हाला इथे जाणून घेता येईल. 

शरारा - शरारा आणि लेहंगा

बऱ्याचदा काही मुलांना लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये साडी सांभाळणे कठीण होते. मात्र अशावेळी हेव्ही आणि भरजरी कपडे हवे असतात. मग अशावेळी शरारा आणि लेहंगा असे पर्याय उपलब्ध असतात. पण कोणता शरारा अथवा लेहंगा कोणत्या कार्यक्रमाला आपल्याला वापरता येईल. त्याचा कोणता रंग घ्यावा आणि त्यावर कोणते दागिने वापरावेत याचा गोंधळ उडणार असेल तर तुम्ही आताच POPxo फॅशन विभागावर क्लिक करा आणि जाणून 

कुरतीची कमाल

बऱ्याच पंजाबी सूटवरील ओढणी सांभाळणं सगळ्यांना शक्य होत नाही. मग अशा वेळी अगदी धावपळीच्या ठिकाणीही आपण पारंपरिक आणि आधुनिक याचा मेळ घालून कुरती जीन्स अथवा कुरती लेगिन्स अशी फॅशन करतो. त्यासाठी कशा प्रकारची कुरती हवी. कोणत्या कोणत्या नव्या फॅशन कुरतीमध्येही आहेत या सगळ्याची माहिती तुम्हाला इथे एका क्लिकवर तुमच्या आवडीनुसार मिळते. 

पारंपरिक आणि आधुनिक मेळ असणारे स्कर्ट्स 

बाजारात विविध प्रकारचे स्कर्ट्स उपलब्ध असतात. अगदी लाँग स्कर्ट्स पासून ते डेनिम शॉर्ट स्कर्ट्सपर्यंत अनेक व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. पण बऱ्याचदा याचं कसं कॉम्बिनेशन करायचं, त्याची फॅशन कशी करायची याची माहिती उपलब्ध नसते. अशावेळी आम्ही तुमची मदत करू. याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या स्टाईल्सची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. 

सेलिब्रिटी स्टाईल 

आपल्याकडे सेलिब्रिटी आणि त्यांच्या फॅशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्या पुरस्कार सोहळ्याला अथवा कोणत्याही कार्यक्रमला सेलिब्रिटी कशा प्रकारची फॅशन कॅरी करत आहेत हे आपण अगदी बारकाईने पाहत असतो आणि त्या फॅशन फॉलोही करत असतो. वेगवेगळ्या आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचे फॅशन ट्रेंड्स आम्ही तुम्हाला इथे सांगतो. अगदी पारंपरिक साड्यांपासून ते आधुनिक वेस्टर्न वेअरपर्यंत सर्व प्रकारच्या फॅशनबद्दल तुम्हाला इथे माहिती देण्यात येते. तसंच त्यांनी घातलेल्या नव्या दागिन्यांच्या फॅशनपासून ते अगदी पूर्वीपासूनच्या दागिने आणि परपंरा जपणाऱ्या सर्व गोष्टींची माहितीही तुम्हाला इथे मिळते. 

DIY फॅशन

फॅशन म्हटलं की स्वतःची स्वतःला स्टाईल करणंदेखील जमायला हवं. नक्की ही स्टाईल कशी केली किंवा काय काय वापरलं असे दहा जणांनी आपल्याला विचारावं असं नेहमीच आपल्याला वाटतं. तो फॅशन सेन्स बऱ्याच जणांना कळत नाही. मग अशावेळी तुम्हाला मार्गदर्शन करणारे DIY फॅशनचे आर्टिकल्स तुमची मदत नक्कीच करू शकतील. अगदी गजरा घरच्या घरी कसा तयार करायचा इथपासून वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची स्टाईल कशी करायची अथवा कपडे कसे स्टाईल करायचे या सगळ्याची माहिती इथे तुम्हाला एका क्लिकवर मिळते. तुम्ही हे लेख वाचून अगदी घरच्या घरी ते फॉलो करून सुंदर स्टाईल्स नक्कीच करू शकता. 

अॅक्सेसरीज

कोणताही कपडा हा दागिन्यांशिवाय पूर्ण होत नसतो. पण कोणत्या कपड्यांवर कोणत्या स्टाईलचे दागिने वापरायचे हीदेखील एक कला आहे. ही फॅशन सगळ्यांनाच जमते असं नाही. कांजिवरम, सिल्क, कॉटन असे वेगवेगळे साड्यांचे आणि कपड्यांचेही प्रकार असतात. तसंच पारंपरिक आणि आधुनिक या दोन्हीवर घातल्या जाणाऱ्या अॅक्सेसरीज या वेगळ्या असतात. त्या कशा मॅच करायच्या आणि कशा प्रकारे त्याची स्टाईल कॅरी करायची या सगळ्याबद्दल आम्ही POPxo फॅशन अॅक्सेसरीज या विभागात तुम्हाला माहिती देत असतो. तुम्हाला या विभागात सर्वच स्टाईलची माहिती मिळेल.

आमचे सर्वोत्कृष्ट लेख

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची

मराठमोळ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी

नववधूकरिता नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स 

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

नवरीसाठी खास ‘बजेट’मधील ५० भारतीय दागिन्यांचे डिझाईन्स

‘या’ साड्यांशिवाय महाराष्ट्रीयन लग्न अपूर्णच

नक्की वापरुन पाहा कोल्हापुरी साजच्या (Kolhapuri Saaj) या अनोख्या डिझाईन्स

स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल