हल्ली घराबाहेर पडताना किल्ली किंवा पैशांचे पाकीट महत्वाचे नसते. तर चार्ज केलेला मोबाईल घेतला की, नाही ते पाहणे महत्वाचे असते. पण सगळ्या गोष्टी मोबाईलवर करत असताना मोबाईलची बॅटरी कधीतरी लो होणारच ना? अशावेळी कामाला येतात त्या म्हणजे पावर बँक… तुम्हीही मोबाईलचा सतत वापर करत असाल तर तुम्हाला पावर बँकची तुमच्या आयुष्यातील किंमत काय ते माहीत असेलच. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी चांगल्या 5 पावर बँकची निवड केली आहे. तुम्ही अगदी कोणत्याही प्रवासात या पावर बँक कॅरी करु शकता.
प्रवासासाठी बेस्ट आहेत हे नेक रेस्ट, नक्की ट्राय करा
1.Ambrane PP-20 20000mAh Lithium Polymer Power Bank
Ambrane कंपनीची पावर बँक जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी फारच चांगली आहे. 20000 mAh पावर असलेली ही पावर बँक खूप काळ टिकते आणि याने तुमचा फोनही पटकन चार्ज होतो. पण या पावर बँकचा आकार आणि वजन थोडे जास्त आहे. त्यामुळे तुम्ही कदाचित या पावर बँकला पसंती देणार नाही. पण जास्त काळ टिकणारी अशी ही पावर बँक आहे. किंमतीच्या तुलनेत ही पावर बँक चांगली आहे. तुम्ही ही पावरबँक रात्रभर चार्ज करुन ठेवू शकता.
2.Syska 20000 mAh Power Bank
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये Syskaचे नाव आवर्जून घेतले जाते. 200mAh पावर असलेली ही पावर बँक वापरु शकता. ही पावर बँक तुलनेने हलकी आहे. त्यामुळे तुम्हाला ही पावर बँक आवडू शकते. कमी वजनासोबतच फोन जलद गतीने चार्ज करते. याच्या चार्जिंग कॉर्डही अगदी सहज कॅरी करण्यासारख्या आहेत. तुम्हाला जर काही वजनदार तुमच्यासोबत नको असेल तर तुम्ही ही पावर बँक घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कमी पावर असलेली पावर बँकही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वापरानुसार ही पावर बँक निवडायची आहे.
मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त
3. Realme 10000mAH Power Bank
10000 ची क्षमता असलेली ही पावर बँक आपल्याला जास्त कॅपॅसिटीच्या पावर बँकसोबत तुलना करुन चालणार नाही. Realme या ब्रँडने गेल्या काही वर्षात लोकांना स्वस्त फोन देऊन मनं जिंकून घेतली आहेत. त्यांची पावरबँकही चांगली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. फास्ट चार्जिंगसाठी ही पावर बँक चांगली आहे. पण तुम्ही एकाचवेळी दोन फोन चार्ज करायचा विचार करत असाल तर तुम्हाला ही पावर बँक कमी पडू शकते. तुमच्या एका फोनसाठी ही पावरबँक चांगली आहे.
4. Samsung Wireless Power bank 10000mAh
सँमसंग ही कंपनीसुद्धा मोबाईल फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चांगली आहे. त्यांची ही पावर बँक वायरलेस आहे. त्यामुळे तुम्हाला जर खूप वायर किंवा काही घेऊन कॅरी करायचे नसेल तर तुम्हाला ही पावर बँक चालू शकेल. दिसायला ही पावरबँक चांगली आहे. पण किंमतीच्या तुलनेत याची क्षमता जास्त नाही. त्यामुळे कदाचित तुम्ही या पावर बँकला पसंती देणार नाही.
5. Mi 20000mAH Li-Polymer Power Bank 2i
सध्या सगळीकडे Mi ची चर्चा आहे. त्यांच्या फोनपासून ते हेडफोनेसपर्यंत अनेकांच्या त्यांच्या अॅसेसरीज आवडतात. या एका पावरँबकला खूप जणांनी पसंती दिली आहे. ही पावर बँक जास्त काळ टिकते. याने मोबाईल पटकन चार्ज होतो. किमान 6 तास तुम्हाला ही पावर बँक चार्ज करायला लागतो. त्यानंतर दिवसभर ही पावरबँक चालू शकते.
आता तुम्हाला पावरबँक घ्यायची असेल तर या पर्यायाचा नक्की विचार करा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.