प्रवासासाठी बेस्ट आहेत हे नेक रेस्ट, नक्की ट्राय करा

प्रवासासाठी बेस्ट आहेत हे नेक रेस्ट, नक्की ट्राय करा

प्रवासात अनेक वेळा झोपायचे म्हटले तर झोपता येत नाही. बस, ट्रेन, कार किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना झोप लागलीच तर उठल्यावर मान दुखल्यावाचून राहात नाही. प्रवासात तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी आणि आराम मिळण्यासाठी नेक रेस्ट फारच महत्वाचे आहेत. आज आपण नेक रेस्टविषयीच जाणून घेणार आहोत. शिवाय नेक रेस्ट निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ते देखील जाणून घेणार आहोत.

प्रेग्नंसीदरम्यान विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

नेक रेस्ट म्हणजे काय?

Instagram

तुमच्या मानेला आधार देण्याचे काम नेक रेस्ट करत असते. गोलाकार आकारात असलेले नेकरेस्ट एक प्रकारे उशीसारखेच काम करते. पण प्रवासात बसल्या जागी झोपण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे तुमच्या मानेला आधार देणारी अशी ही उशी असून तिलाच नेक रेस्ट असे म्हणतात

नेक रेस्टचे फायदे

Instagram

  1. तुमच्या मानेला आधार मिळतो. मान दुखत नाही. 
  2. शिवाय झोपताना तुमची मान ज्या स्थितीत हवी अशी तशीत ती राहते.
  3. अनेकदा प्रवासात आपल्याला अचानक झोप लागते. अचानक आपला तोल जातो. आपण दुसऱ्याच्या अंगावर पडण्याची शक्यता जास्त असते. नेक रेस्ट मानेला घातल्यानंतर तुमचा तोल अजिबात जात नाही. तुम्हाला छान बसल्याजागी झोप येते. 
  4. नेक रेस्ट कॅरी करायला कठीण वाटत असले तरीसुद्धा तुम्हाला त्याचे वजन नसते. त्यामुळे ते सांभाळायला सोपे जाते.
  5. प्रवासात थकवा पटकन येतो. तुमची झोप व्यवस्थित झाली तर तुमचा दिवसही चांगला जातो. 

कार अथवा बसने प्रवास करताना उलटीचा होतो त्रास, ट्राय करा 5 टिप्स

कोणते नेक रेस्ट आहेत तुमच्यासाठी बेस्ट

Instagram

आता नेक रेस्ट ही प्रवासातील तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट असल्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी बेस्ट नेक रेस्टची निवडही करता यायला हवी. त्यामुळे नेकरेस्ट घेताना तुम्हाला काय गोष्टींची काळजी  घ्यायला हवी ते देखील तुम्हाला माहीत हवे 

  1. नेक रेस्टमध्ये वेगवेगळ्या साईज मिळतात.  तुम्ही प्रवासात तुम्हाला सोयीस्कर पडेल म्हणून लहान नेकरेस्ट घेऊ नका. तर तुमच्या मानेला व्यवस्थित बसेल तुम्हाला फार घट्ट होणार नाही अशी साईज निवडा. 
  2. आता काही जण सतत फिरत असतात त्यांना तर नेक रेस्ट अगदी मस्ट आहे. अशांनी फिकट रंगाचे नेक रेस्ट अजिबात घेऊ नका . कारण ते प्रवासात खराब होतात. 
  3. सहज धुता येईल अशा नेक रेस्टची निवड करा. 
  4. नेक रेस्ट आरामासाठी हवे असते. म्हणून मऊ कपडा निवडा. म्हणजे तुम्हाला आराम मिळेल.
  5.  चांगल्या प्रतीचे नेक रेस्ट निवडणे नेहमीच चांगले कारण त्याचा आकार परफेक्ट असतो. 

आता तुम्ही प्रवासाला जाताना  नक्की नेक रेस्ट कॅरी करा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.