होळी हा सर्वांत लोकप्रिय सणांपैकी एक आहे. रंग आणि पाण्यासह हा सण साजरा करण्यासाठी आणि त्यानिमित्ताने मित्रमंडळी व कुटुंबियांना भेटण्यासाठी लोक उत्सुक असतात. पण होळीच्या दरम्यान तुमची मासिकपाळी आली तर? मासिकपाळी सुरू आहे म्हणून तुम्हाला कशालाही मुकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या माणसांसोबत रंगही खेळू शकता. कारण, मासिकपाळी आहे म्हणून रंग खेळण्यापासून लांब राहण्याची गरजच नाही! तुम्ही शरीराची आणि मासिकपाळीदरम्यान स्वच्छ राहण्याबाबत (मेन्स्ट्रुअल हायजिन) थोडी जास्त काळजी घेऊन सहभागी होऊ शकता. यासाठी आम्ही चर्चा केली शरणा जहांगियानी, हेड ऑफ कम्युनिटी, नुआ यांच्याशी. त्यांनी होळी सुरक्षितपणे व स्वच्छतेने साजरी करण्याचे हे पाच सोपे मार्ग सांगितले आहेत. त्यामुळे या होळीला तुम्हालाही मासिक पाळीचा त्रास असेल तर तुम्ही हे सोपे उपाय करा आणि होळीचा आनंद लुटा!
आधी नियोजन करा, चांगले नियोजन करा
होळीमध्ये जर अचानक पाळी चालू झाली तर नक्कीच सगळा मूड जातो. पण त्यासाठी नक्की काय नियोजन करायचं आणि काय सोपे उपाय करायचे ते पाहूया. रंग खेळणे हा शारीरिकदृष्ट्या सक्रिय सोहळा आहे आणि म्हणूनच तुमची शारीरिक स्थिती योग्य असावी या दृष्टीने थोडे अतिरिक्त नियोजन केलेले चांगले ठरेल. तुम्ही किती वेळ घराबाहेर राहणार आहात, कोणत्या कपड्यांमध्ये तुम्हाला सुटसुटीत वाटेल, आणि जिथे तुम्ही रंग खेळणार आहात तिथे कोणत्या प्रकारची स्वच्छतागृहे उपलब्ध असतील या मुद्दयांवर विचार करा. अंतर्वस्त्रांचा अतिरिक्त संच, पॅड्स, हॅण्ड सॅनिटायजर आणि वाइप्स हे सगळे ठेवलेली एकहाताळण्यास सोपी अशी बॅग बरोबर ठेवल्यास खूप उपयुक्त ठरेल.
योग्य मापाचे पॅड्स निवडा
Shutterstock
योग्य आकाराचे पॅड्स वापरल्यास (शक्यतो अधिक मोठा आणि अधिक रुंद) आजूबाजूने रक्ताची गळती टाळता येईल आणि कपड्यावर डागही पडणार नाहीत. योग्य उत्पादनांचा वापर केल्यास तुमची चिंता किमान स्तरावर राहील आणि हव्या त्या पद्धतीने सणाचा आनंद घेता येईल. क्विक-ड्राय अर्थात पटकन वाळणारे कपडे घातल्यास तुम्हाला हालचाली अधिक सुलभतेने करता येतील.
तीव्र रसायनांपासून तयार केलेले रंग आणि स्प्रे वापरणे टाळा
मौजमजेत आणि रंगांमध्ये बुडून जाण्याची कल्पना तर छानच आहे पण त्वचेचे नुकसान किंवा काही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तीव्र, कृत्रिम, रसायनांपासून तयार केलेले रंग वापरणे टाळा. तुमच्या पॅडमध्ये रसायनांपासून तयार केलेले कृत्रिम रंग शिरले तर काय होईल याचा विचार करा. रंगाचे डाग आणि त्यातही मासिक पाळीचे डाग काढणं कठीण होतं.
भरपूर पाणी प्या आणि विशिष्ट पदार्थांपासून दूर राहा
उन्हात होळी खेळणे खूपच आनंददायी असते पण यामुळे तुमच्या शरीरातील द्रवाची पातळीही घसरते. डिहायड्रेशनचा परिणाम म्हणून मासिकपाळीच्या काळात गोळे-पेटके जाणवतात. डिहायड्रेशनमुळे पायातील गोळे अधिक तीव्र होतात व बराच वेळ टिकतात. तेव्हा जेवढे पाणी पिता येईल, तेवढे प्या. तुम्ही काय खात आहात याबाबत सावध राहा आणि गोळे-पेटके वाढतील असे पदार्थ खाऊ नका. गोळे-पेटके दूर करणे असेही कठीण असते. त्यात सणाच्या दिवशी तर ते न आलेलेच बरे. होळीच्या शुभेच्छा देताना तुम्हाला उत्साह असतो. अशा नादामध्ये स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका.
कोमट पाण्याने आंघोळ करा
Shutterstock
रंग खेळून झाल्यानंतर तुम्ही स्वच्छतेची काळजी कशी घेता हे महत्त्वाचे आहे. विशेषत: तुमची मासिकपाळी सुरू असेल तर हे खूपच महत्त्वाचे आहे. या दिवसांत स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागते, काळजी घ्यावे लागते. रंग खेळून झाल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणे उत्तम. यामुळे प्रादुर्भावाचा धोका कमी होईल आणि रंग तसेच गंध निघून जाण्यात मदत होईल.
थोडी दूरदृष्टी ठेवली तर तुम्हाला या रंगांच्या या सणासाठी योग्य नियोजन करण्यात मोठी मदत होईल. हे सगळे करत असताना पोषक अन्नपदार्थ खाऊन, स्वत:चे लाड करून घेऊन ‘Go with flow’सहीत आपल्या जवळच्या लोकांबरोबर या सणाचा आनंद घ्यायला विसरू नका. रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक