उन्हाळा आणि पावसाळ्यात नाकाच्या आसपास ब्लॅकहेड्स होणे, लहान लहान पुळ्या येणे आणि पूर्ण चेहऱ्यावर तेलकटपणा जाणवणे ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांना तर यामुळे अधिक त्रास होतो. त्वचेवर जास्त वेळ तेल राहिले तर यामुळे मुरूमं येण्यासारख्या समस्यांना अधिक वाढ मिळते. ब्लॅकहेड्स आणि लहान लहान पुळ्या चेहरा अधिक निस्तेज करतात. तसंच यासह नाक, कपाळ आणि डोळ्यांवर जमलेले तेल मेकअप खराब करतात. चेहऱ्याची स्वच्छता करण्यसाठी आणि घाण काढून टाकण्यासाठी सहसा वाफ, फेसवॉश, एक्सफोलिएशन इत्यादीचा वापर करण्यात येतो. पण नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेचा नैसर्गिक पीएच संतुलन खराब न करता तुम्ही त्वचेची काळजी घ्यायला हवी. तुमच्या चेहऱ्यावरील जमलेली घाण, ब्लॅकहेड्स तुम्ही 5 मिनिट्समध्ये घालवू शकता. त्यासाठी उत्तम ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. चेहऱ्यावर जमलेल्या तेलामुळेच या समस्या अधिक होतात. त्यामुळे तुम्ही या ट्रिक्सचा वापर करून नक्की पाहा.
ब्लॅकहेड्स आणि तेल घालविण्यासाठी ट्रिक्स (How to remove blackheads and oil from face in 5 minutes)
ब्लॅकहेड्स आणि तेल घालविण्यासाठी ट्रिक्स (How to remove blackheads and oil from face in 5 minutes)
तुम्हाला कुठेतरी लवकर जायचे असेल आणि तुमच्याजवळ केवळ तयार होण्यासाठी 5 मिनिट्सचा वेळ असेल आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स (blackheads) घालवायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या ट्रिक्सचा वापर करा.
ग्रीन टी (Green Tea)
Freepik
ग्रीन टी हे त्वचेसाठी उत्तम ठरते. याचा कसा वापर करून घ्यायचा ते पाहूया.
- अर्धा चमचा ग्रीन टी घ्या आणि कोमट पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 1- 2 मिनिट्स तशीच राहू द्या. ही सुकल्यावर हलक्या बोटांनी प्रेशर देऊन मसाज करा
- यामुळे चेहऱ्यावर पोर्स उघडतील आणि त्यातील असणारी घाण बाहेर पडण्यास मदत होईल
- तुम्ही हे रोज करू शकता कारण हा नैसर्गिक उपाय आहे आणि ग्रीन टी त्वचेसाठी चांगले समजण्यात येते
- लक्षात ठेवा तुम्ही हे स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करा. यामध्ये ग्रीन टी च्या जागी नॉर्मल चहा पावडरचा वापर करू नका. कारण यामुळे त्वचा खराब होऊ शकते. तसंच यामध्ये असणारे केमिकल्स हे त्वचेसाठी चांगले नाहीत
कॉफी मास्क (Coffee Mask)
Freepik
तुम्ही त्वचा अधिक टाईट बनविण्यासाठी आणि एक्सफोलिएशनसाठी तुम्ही कॉफी आणि ब्राऊन शुगरचा फेस मास्क लाऊ शकता. कॉफी तुमच्या त्वचेला केवळ तजेलदारपणाच देत नाही तर तुमचे पोर्स टाईट करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
- 1 चमचा कॉफी आणि थोडीशी ब्राऊन शुगर पाणी घालून पेस्ट करून घ्या
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि मग 5-10 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर बोटांनी हलक्या हाताने चेहऱ्याला, नाकाला मसाज करा
- थंड पाण्याने नंतर धुवा. तुमच्या चेहऱ्यावरील तेल आणि ब्लॅकहेड्स जाण्यास याची मदत होते. त्वरीत ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा उत्तम उपाय आहे
अंड्याचा सफेद भाग (White Egg)
Freepik
अंड्याचा सफेद भाग आणि लिंबाचा रस तुमच्या त्वचेला केवळ टाईटनेस देत नाही तर त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासही उपयोग ठरतो.
- 1 अंड्याचा सफेद भाग आणि पाव चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावा
- 5-10 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा
- या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत मिळते
टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)
Shutterstock
अॅक्ने, लहान लहान पिंपल्स, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स इत्यादी कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचा उपयोग होतो.
- 2-3 थेंब टी ट्री ऑईल घ्या आणि त्यात एक चमचा गुलाबपाणी मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा की, टी ट्री ऑईल डायरेक्ट चेहऱ्यावर लाऊ नका
- त्यानंतर हे मिक्स्चर कापसाच्या सहाय्याने तुम्ही चेहऱ्याला लावा
- दिवसातून एक वेळा ही प्रक्रिया करा
या सर्व पद्धती तुमच्या त्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवून आणि तेल काढून चेहरा अधिक सुंदर आणि तजेलदार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधा. तसंच याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून पाहा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक