ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
तुमच्या या सवयी टाळल्यात तर अंडरआर्म्स पडणार नाहीत काळे, कारणे नक्की काय

तुमच्या या सवयी टाळल्यात तर अंडरआर्म्स पडणार नाहीत काळे, कारणे नक्की काय

काही जणींना स्लीव्हलेस ब्लाऊज अथवा ड्रेस घालणे आवडत नाही अथवा लाज वाटते कारण त्यांचे अंडरआर्म्स काळे असतात. पण तुम्ही एकट्याच या समस्येला सामोरं जात नाहीये तर अशा अनेकांना अंडरआर्म्स काळे (dark underarms) असण्याची समस्या आहे. हे दिसायला फारच खराब दिसतं आणि त्यामुळे आपल्याला नीट फॅशनही करता येत नाही.  केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही ही समस्या असते. पण हे लपविण्यापेक्षा याचे नक्की कारण काय आहे आणि कोणत्या सवयी टाळल्या तर आपल्याला या समस्येला सामोरं जावं लागणार नाही याचा विचार करणं जास्त गरजेचे आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत. तसंच या समस्येची तोडही आम्ही तुम्हाला देणार आहोत. अर्थात ही समस्या आणि त्याचे समाधान या दोन्हीबाबत या लेखातून माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

शेव्हिंग करणे

Shutterstock

अंडरआर्म्समधील केस काढण्यासाठी बरेचदा सर्वात सोपा उपाय म्हणून शेव्हिंग करण्यात येतं. शेव्हिंग केल्याने केस नक्कीच निघतात. पण त्वचेच्या आतील हेअर फॉलिकल्स दिसू लागतात. त्यामुळे अंडरआर्म्समधील त्वचा काळवंडल्याचे दिसून येते. नियमित स्वरूपात जर तुम्ही काखेखाली शेव्ह करत राहिलात तर ही त्वचा अधिक कडक आणि काळी होते आणि याठिकाणी जळजळ आणि खाजदेखील निर्माण होते. त्यामुळे त्यावर काळसरपणा अधिक चढत जातो. 

ADVERTISEMENT

समस्येचे समाधानः शेव्हिंग त्वचेला अनेक तऱ्हेने नुकसान पोहचवते. त्यामुळे जेव्हा कधी घाई असेल आणि तुम्हाला अंडरआर्म्स शेव्ह करायचे असेल तेव्हा तुम्ही स्वच्छ रेझरचा वापर करा. तसंच शेव्ह केल्यावर लगेच त्याजागी ताजे कोरफड जेल लावा. जेणेकरून त्वचा काळवंडणार नाही. त्याशिवाय त्वचेची जळजळ होण्यापासून वाचायचे असेल तर तुम्ही हलक्या हाताने शेव्ह करा.  

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या (How To Clean Underarms In Marathi)

वॅक्सिंग करणे

Shutterstock

ADVERTISEMENT

तुम्हाला जर वाटत असेल की, शेव्हिंगपेक्षा वॅक्सिंग हा चांगला पर्याय आहे तर तसंदेखील अजिबात नाही. अति वॅक्सिंग केल्यास त्वचेची जो पातळ स्तर असतो तो निघण्याची शक्यता असते.  ज्यामुळे इ्न्फेक्शन आणि जळजळ होते. सतत वॅक्सिंग करणं योग्य नाही. यामुळे त्वचा काळवंडते आणि त्रासदायक ठरते. 

समस्येचे समाधानः अंडरआर्म्समधील केस काढणं आवश्यक आहे. त्यामुळे अंडरआर्म्सच्या त्वचेची खास काळजी घ्यायला हवी. ही त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे वॅक्सिंग करताना त्वचा ओढली जाणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा काळसर त्वचा खराब दिसते. 

डेड स्किनचा त्रास

बऱ्याचदा आपल्या शरीरावर डेड स्किन असते. हे सेल्स हटविण्यासाठी त्वचेची काळजी घेणे आणि त्याची स्वच्छता राखणे गरजेचे असते. अंडरआर्म्सची त्वचा ही अगदी आतपर्यंत जाऊन स्वच्छ करावी लागते. कारण तिथे सर्वात जास्त घाम येतो आणि तो घाम साचून राहतो. त्यामुळे त्वचा अधिक खराब होऊन काळवंडते. 

समस्येचे समाधान – दर तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी तुम्ही अंडरआर्म्स त्वचा एक्सफोलिएट करायला हवी. त्यामुळे डेड स्किन जमून राहणार नाही आणि अंडरआर्म्स काळवंडणार नाहीत. 

ADVERTISEMENT

काखेतून येतोय घामाचा दुर्गंध, करा सोपे घरगुती उपाय (How To Get Rid Of Underarms Smell)

घट्ट कपडे घालणे

Shutterstock

तुम्हाला जर घट्ट कपडे घालण्याची अर्थात टाईट कपडे घालण्याची सवय असेल तर त्वचेवर हे कपडे घासले जातात आणि त्यामुळे काखेतील त्वचा पटकन काळवंडते. काखेची त्वचा ही अत्यंत नाजूक असल्याने त्याची जास्त काळजी घ्यावी लागते.  ही त्वचा संवेदनशील असते आणि त्यामुळे घट्ट कपडे घालून त्यावर घासून अधिक खराब होते आणि त्यामध्ये  खाजही येते. 

ADVERTISEMENT

समस्येचे समाधानः योग्य फिटिंग असणारे कपडे सहसा घाला. सतत घाम येऊन अंडरआर्म्सची त्वचा खराब होईल असे कपडे घालून नका. तसंच तुम्ही जेव्हा शेव्हिंग अथवा वॅक्सिंग कराल तेव्हा किमान आठवडाभर तरी तुम्ही घट्ट कपडे घालणं टाळा. 

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

 

हायपर पिगमेंटेशन

हायपर पिगमेंटेशन ही त्वचेची अशी अवस्था आहे जेव्हा त्वचा आवश्यकतेपेक्षा अधिक मॅलेनिनचे उत्पादन करत असते. त्यामुळे अंडरआर्म्स काळे पडू लागतात. तर काही ठिकाणी काळे पॅच पडलेलेही दिसून येतात. यासाठी तुम्हाला अर्थातच तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांकडून सल्ला घ्यायला हवा. 

ADVERTISEMENT

समस्येचे समाधानः थोडीशी काळजी घेऊन तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सची नाजूक त्वचा चांगली राखू शकता.  त्वचेवर योग्य कपडे घालण्यासह ओले कपडे घातले जाणार नाहीत याची काळजी घ्या.  तसंच कपडे स्वच्छ असाेत. सतत घाम येत असेल तर काख थोड्या थोड्या वेळाने स्वच्छ करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

03 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT