बिग बॉसनंतर हॉट झालेली शमिता ( Shamita Shetty )आणि राकेशची (Raquesh Bapat) लव्हस्टोरी ही अजूनही सुरुच आहे बरं का! अनेक सोशल इव्हेंटसमध्ये, लंच,पार्टीसाठी ही जोडी एकत्र फिरताना दिसते. सुरुवातीला अनेकांना हे रिलेशनशीप खोटे असेल असे वाटले होते. पण आता त्यांचे प्रेम पाहता या दोघांमध्ये नक्कीच खरे प्रेम झाले असावे असे दिसत आहे. पुण्याचा राकेश बापट कायमचा मुंबईत शमितासाठी आल्याचे एका पोस्टमधून समारे आल्याचे दिसत आहे. या घरात तो रुळलेला दिसत आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते ही खूश झाले आहेत.
राकेशने मुंबईत घेतलं नवं घरं
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शमिता आणि राकेशमध्ये गेल्या काही महिन्यापासून खटके उडत होते. या खटक्यांचे कारण त्यांच्यामधील अंतर होते. राकेश हा पुण्यात राहतो तर शमिता ही मुंबईत. कामांव्यतिरिक्त राकेश हा शमिताला भेटण्यासाठी मुंबईत येतो. पण त्याचे मुंबईत येणे हे फारसे नाही. त्यामुळेच त्यांच्यातील दुरावा वाढत होता. आता तो दुरावा मिटवण्यासाठीच राकेशने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. राकेशच्या सगळ्यात जवळचे पुणे सोडून तो मुबंईत राहायला आला आहे. मुंबईत त्याने घर घेतले असून त्याचा फोटो देखील त्याने त्यामध्ये शेअर केला आहे.
शमिताच्या प्रेमाची अशी झाली सुरुवात
शमिता आणि राकेशच्या प्रेमाची सुरुवात ही बिग बॉस ओटीटीमध्ये झाली. स्पर्धक म्हणून आलेले हे दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना देखील कळले नाही. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देखील याच शोमध्ये दिली. बिग बॉसचा खरा सीझन ज्यावेळी सुरु झाला. त्यावेळी राकेशला देखील शमितासाठी पुन्हा बोलावण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान शिल्पा शेट्टीची बहीण म्हणून अनेकदा शमिताला खूप काही फेव्हर मिळाले असे देखील अनेकांचे म्हणणे होते. पण शमिताने प्रेमाची कबुली दिल्यानंतर या सगळ्या गोष्टीला वेगळे वळण मिळाले.
शमिताआधी होता या नात्यात
राकेश बापट हा तसा मराठी आणि हिंदी मालिकेतील नावाजलेला चेहरा आहे. तो अनेक वर्ष रिद्धी डोगरा सोबत लग्नबंधनात होता. पण अचानक त्यांच्यातील दुराव्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ज्याचा धक्का त्यांच्या चाहत्यांना बसला. रिद्धीसोबत राकेशने 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. 2019 मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर आता गेल्यावर्षी म्हणजे 2021मध्ये या रिॲलिटी शो दरम्यान तो शमिता शेट्टीच्या प्रेमात पडला. शमिता शेट्टीचे नाव या आधी अनेकांसोबत जोडले गेेले. तिचे फिल्मी करिअर हे फारसे चालले नाही. तिला पुन्हा एकदा या नात्यामुळे प्रसिद्धी मिळाली असे म्हणायला काहीच हरकत नाही.
चाहते लग्नाच्या प्रतिक्षेत
राकेश आणि शमिता त्यांचे नाते कधी लग्नापर्यंत नेणार याची अनेक जण वाट पाहात आहेत. कारण या अनेकदा अशी नाटक टिकत नाहीत,असे चाहत्यांना वाटले. टिकले तरी ते नाते लवकर लग्नापर्यंत जात नाही असे देखील म्हटले जाते. आता शमिता राकेश सोबत लग्नाचा निर्णय कधी घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राकेश- शमिताने लग्न करावे असे तुम्हाला देखील वाटते का? आम्हाला नक्की कळवा.