ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
पावसाळ्यात तुमच्या पर्समध्ये असायलाच हवेत हे ब्युटी प्रॉडक्ट

पावसाळ्यात तुमच्या पर्समध्ये असायलाच हवेत हे ब्युटी प्रॉडक्ट

हवामानानुसार स्कीन केअरमध्येही काही खास बदल करायला हवेत.यासाठी असे प्रॉडक्ट निवडायला हवेत जे तुमच्या त्वचेची त्या ऋतूमध्ये निगा राखण्यास मदत करतात. पावसाळ्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी कारण या काळात वातावरणात अनेक बदल होत असतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होण्याची शक्यता असते. मात्र असं असलं तरी तुम्ही त्वचेची अथवा केसांची निगा राखण्यासाठी काय उपाय करणार ते विचारपूर्वक आणि सावधपणे करायला हवे.यासाठी पावसाळ्यात तुमच्या किटमध्ये असायला हवेत काही खास ब्युटी प्रॉडक्ट ज्यामुळे तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेतली जाईल. तसंच वाचा पावसाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी | Monsoon Skin Care Tips In Marathi, संवेदनशील त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स (Sensitive Skin Care Tips), तेलकट त्वचा असणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी (Oily Skin Care Tips In Marathi)

माइल्ड फेस वॉश 

पावसाळ्यात तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेवर तर त्वचेवर कोणता फेसवॉश वापरावा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो. यासाठी पावसाळ्यात नेहमी माइल्ड फेसवॉश वापरावा. कारण माइल्ड फेसवॉशने त्वचेचं नुकसान होत नाही आणि त्वचा स्वच्छ देखील होते. माइल्ड फेसवॉशने चेहरा धुतल्यास त्वचा ड्राय पडत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी त्वचेच्या प्रकारानुसारच फेसवॉश वापरावा.

लिप बाम

हिवाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही तुमच्या जवळ लिप बाम असायला हवा. कारण पावसाळ्यातही ओठ ड्राय होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात नैसर्गिक घटकांपासून तयार कलेले लिपबाम जास्त परिणाम कारक ठरतात. यासाठी तुम्ही गुलाब, बीटपासून घरीच लिप बाम तयार करू शकता. 

मॉइस्चराइझर

पावसाळ्यातही त्वचेला पोषणाची तितकीच गरज असते. यासाठी पावसाळ्यात त्वचेला योग्य पोषण देणारं मॉइस्चराइझर वापरावं. नेहमी अंघोळ केल्यावर एखादं चांगलं बॉडी लोशन अथवा मॉइस्चराइझर त्वचेला लावावं. पावसात भिजल्यानंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी त्वचेला फेसक्रीमची गरज असते. त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य मॉईस्चराइझर अथवा बॉडी क्रिम निवडू शकता. 

ADVERTISEMENT

सनस्क्रिन

सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात लावावं असा अनेकांचा समज असतो. मात्र लक्षात ठेवा पावसाळ्यातही त्वचेला सनस्क्रीनची गरज असते. त्यामुळे पावसाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या पर्समध्ये चांगलं सनस्क्रीन ठेवा. या काळात तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन वापरू शकता. घराबाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा तसंच दिवसातून दोन ते तीन वेळा सनस्क्रीन प्रोटेक्शनची गरज ओळखून ते तुमच्या पर्समध्येच ठेवा. 

हेअर सीरम 

त्वचेसोबतच तुमच्या केसांची निगा देखील खूप महत्त्वाची आहे. प्रदूषित वातावरणामुळे बऱ्याचदा पावसाच्या पाण्यातही केमिकल्सचे प्रमाण आढळून येते. सहाजिकच पावसाच्या पाण्याचा त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होऊ शकतो. यासाठी पावसात भिजण्यापूर्वी केसांना हेअर सीरमने सुरक्षित करा. ज्यामुळे केसांवर एक सुरक्षित लेअर निर्माण होईल आणि पावसाच्या पाण्याचा केसांवर परिणाम होण्याचा धोका टळेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT