ADVERTISEMENT
home / सौंदर्य
Monsoon Skin Care Tips In Marathi

पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी | Monsoon Skin Care Tips In Marathi

आपण सगळे जास्त करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी या बद्दल जास्त जागरूक असतो परंतु असं नाही आहे. सर्व ऋतू मध्ये त्वचेवर वेगवेगळे परिणाम होत असतात. सध्या पावसाने जोर धरला आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाळा आणि निसर्गरम्य परिसर सर्वांना भुरळ घातल असला तरी पावसाळा म्हणजे आजारी पडणे हे सामान्य आहे. परंतू सतत आजारी पडणे याचा अर्थ आपली रोग प्रतिकार क्षमता कमी आहे असा आहे. म्हणूनच पावसाळा आला की प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही आरोग्यदायी हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजे. या दिवसांत आरोग्याप्रमाणेच त्वचेचीदेखील विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो. पावसात भिजल्यामुळे अथवा रस्त्यावरील साठलेल्या पाण्यातून फिरण्याने तुम्हाला त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. पावसात हवामानामध्ये दमटपणा वाढलेला असतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. यासाठी जाणून घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची आणि कोणती उत्पादने त्वचेची निगा राखण्यासाठी वापरावी . तसंच वाचा या संवेदनशील त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स  (Sensitive Skin Care Tips), तेलकट त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स (Oily Skin Care Tips In Marathi), कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi)

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचे महत्त्व – Importance Of Monsoon Skin Care Routine In Marathi

Monsoon Skin Care Routine In Marathi
Monsoon Skin Care Routine In Marathi

पावसाची सुरूवात झाली की ओल्या मातीचा सुगंध मनाला वेड लावतो. निसर्गाचं बदललेलं रूप पाहून मन प्रसन्न होतं. मात्र वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अति प्रमाणात वाढते. असं वातावरण जीव जंतूंच्या पोषणासाठी अतिशय पोषक असतं. जीवजंतूचे प्रमाण वाढल्यामुळे इनफेक्शनचा धोका वाढतो. वातावरणातील थंडावा कमी करण्यासाठी या दिवसांमध्ये गरमागरम, तेलकट, चमचमीत पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मान्सून पिकनिकला जाणं वारंवार होतं. सतत भिजल्यामुळे, तेलकट-तूपकट उघड्यावरचे पदार्थ खाण्यामुळे आरोग्य आणि त्वचेवर वाईट परिणाम होतात. अशा वातावरणात जंतूसंसर्ग झाल्यास तुम्हाला अंगाला खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, पायांवर खरूज, नायटा होणे, त्वचा कोरडी आणि रूक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. यासाठीच पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात योग्य स्कीन केअर रूटिन फॉलो करून, योग्य उत्पादने वापरून आणि काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखू शकता. 

पावसाळ्यासाठी स्किन केअर रूटीन – Skin Care Routine For Monsoon

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज स्किन केअर टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यातदेखील सुंदर आणि आकर्षक दिसू शकता.

क्लिंझिंग (Cleansing)

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना नियमित क्लिंझिग करणे गरजेचे आहे. यासाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यावर त्वचेला क्लिंझिंग करावे. बाजारात उत्तम प्रकारचे क्लिंझर उपलब्ध असतात. मात्र तुम्ही कच्चे दूध, बटाट्याचा रस, काकडीचा रस वापरून तुमची त्वचा स्वच्छ करू शकता. यासोबतच मेकअप काढण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल, बदाम तेल नक्कीच वापरू शकता. क्लिंझिंग केल्यामुळे त्वचेच्या आतील छिद्रे मोकळी आणि स्वच्छ होतात. शिवाय यामुळे त्वचेवरील डेड स्किनदेखील निघून जाते. त्वचेची छिद्रे मोकळी झाल्यामुळे त्वचेला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पूरवठा होतो. ज्यामुळे चेहरा फ्रेश आणि नितळ दिसू लागतो. जर तुम्ही यासाठी एखाद्या उत्तम क्लिंझरच्या शोधात असाल तर वापरा मायग्लॅमचं हे युथफूल हायड्रेटिंग फोम क्लिंझर… कारण यात आहे सोप फ्री आणि पीएच बॅलन्स फॉर्म्युला. यातील वॉटर बॅंक टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान न होता त्वचा मुळासह स्वच्छ होते. हे क्लिंझर संवेदनशील त्वचेचा विचार करून तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे चेहराल स्वच्छ करण्यासाठी आणि मेकअप काढण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

टोनिंग (Toning)

टोनिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेलं धुळ आणि प्रदूषण कमी होतं. मात्र पावसाळ्यात एखादं विकतचं टोनर वापरण्यापेक्षा घरातच ग्रीन टी, गुलाबपाणी अथवा काकडीच्या रसाने तुम्ही तुमची त्वचा टोन करू शकता. सर्वात बेस्ट टोनर म्हणजे साधं पाणी. पाण्याने त्वचा टोन करण्यासाठी एखाद्या स्प्रेच्या बाटलीत साधं पाणी घ्या आणि दिवसभरातून दोन ते तीन वेळी ते तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या त्वचेला फ्रेश ठेवणारं एखादं बेस्ट टोनर हवं असेल तर तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टचं हे व्हिटॅमिन सी फेस टोनर नक्कीच वापरू शकता. यामध्ये शंभर टक्के नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे तुमच्या त्वचेचा पीएच बॅलन्स राखला जातोच शिवाय त्वचेवर एक संरक्षक लेअर तयार होतो. 

मॉईस्चराइझिंग (Moisturizing)

त्वचेची काळजी घेण्यामधील एक सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे त्वचेला मॉश्चराईझर लावणं. त्वचेला नियमित मॉश्चराईझ केल्यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. त्वचेला देखील पोषणाची फार गरज  असते. मॉश्चराईझरमुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकतो. ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम दिसते. त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मॉश्चराईझ करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता. शिवाय यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही.पावसाळ्यात तुमच्या त्वचेला तेलकट न करणारी आणि दिवसभर हायड्रेट ठेवणारी फेस स्क्रीम अथवा मॉईस्चराझरची गरज असते. यासाठी तुम्ही मायग्लॅमचं हे ब्लुबेरी आणि स्ट्रॉबेरीचे घटक असलेलं फेस क्रीम वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेला भरपूर अॅंटि ऑस्किडंट्स मिळतात आणि त्वचेचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं. विशेष म्हणजे हे क्रीम लाइटवेट असल्यामुळे त्वचेवर चिकट थर निर्माण करत नाही. 

सनस्क्रीन ( Sunscreen)

पावसाळ्यात वातावरण ढगाळ असलं तरी याचा अर्थ मुळीच नाही की तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल. कारण या दिवसातदेखील तुमच्या त्वचेला सूर्याच्या अतीनिल किरणांचा धोका असू शकतो. यासाठीच पावसाळ्यात घराबाहेर पडताना एखादे चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लोशन जरूर लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर बाहेरील वातावरणाचा दुष्परिणाम होणार नाही. जर तुम्ही यासाठी एखाद्या उत्तम सनस्क्रीनच्या शोधात असाल तर पॉपएक्सोचं नवीनच लॉंच झालेलं हे सनस्क्रीन तुम्ही वापरून पाहायलाच हवं. कारण यात आहे एसपीएफ 30 जे तुमच्या त्वचेचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून 97 टक्के संरक्षण करतं. हे नॉन ग्रिसी असल्यामुळे तुमची त्वचा सनस्क्रीनमुळे तेलकट होत नाही, शिवाय यात असे नैसर्गिक प्रोबायोटिक्स वापरण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेचं अधिक पोषणही होतं.

लिप केअर (Lip Care)

पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे तुमचे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. यासाठीच पावसाळ्यात ओठांना लिप बाम लावण्यास विसरू नका. नैसर्गिक पद्धतीने ओठांना मऊ ठेवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन अथवा दुधाची साय तुमच्या ओठांना लावू शकता. पण हा उपाय तुम्हाला घराबाहेर असताना करता येणार नाही. यासाठीच तुम्हाला गरज आहे मायग्लॅमच्या सुपरफूड कलर लिप बामची… यात तुम्हाला एकूण सहा शेड उपलब्ध आहेत. शिवाय यात अवाकॅडो बटर, शीया बटर, व्हिटॅमिन ई, जोजोबा आणि मोरिंगा ऑईलचा वापर केलेला असल्यामुळे तुमच्या ओठांसाठी ते अतिशय पोषक आहेत.  

ADVERTISEMENT

पावसाळ्यात त्वचेसाठी स्कीन केअर टीप्स –Monsoon Skin Care Tips In Marathi

पावसाळ्यात डेली रूटीन टिप्स फॉलो करण्यासोबत आणखी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे सौंदर्य अधिक खुलून येऊ शकते.

मुबलक पाणी प्या (Drink Plenty Of Water)

पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे तुम्ही पाणी कमी प्रमाणात पिता. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. आपलं शारीरिक कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. शिवाय पाण्यावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली गेल्यामुळे तुम्हाला अॅक्ने अथवा पिंपल्सच्या समस्या होत नाहीत. यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी जरूर प्या. वातावरणातील थंडाव्यामुळे तुम्हाला पाणी पिण्याची आठवण अथवा तहान लागत नसेल तर काही ठराविक काळाचे अर्लाम लावा. ज्यामुळे तुम्ही  दिवसभरात पुरेसे पाणी नक्कीच प्याल.

अति मेकअप करू नका (Don’t Do Too Much Makeup)

पावसाळ्यात तुमची त्वचा अतीशय नाजूक आणि संवेदनशील होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात अती मेकअप करू नये. मात्र अनेकजणी या दिवसांमध्ये वॉटरप्रूफ मेकअप करतात. वॉटरप्रूफ मेकअप पावसातदेखील टिकत असला तरी त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. दिवसभर असा मेकअप त्वचेवर राहील्याने तुमच्या त्वचेची छिद्रं बंद होतात. ज्यामुळे त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि तुम्हाला  त्वतेच्या समस्या निर्माण होतात.

पायांची काळजी घ्या (Take care of your feet properly)

पावसाळ्यात आपण आपल्या चेहऱ्याची जितकी काळजी घेतो तितकीच काळजी पायांची घ्यायला हवी. कारण पाय या दिवसांमध्ये सतत ओले होतात. ज्यामुळे पायांच्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच घरी आल्यावर पाय स्वच्छ करा आणि कोरडे करा. पायाला फूट क्रीम लावा आणि घरात असताना सॉक्स वापरा. ज्यामुळे पाय मऊ आणि मुलायम राहतील.  पायाला फंगल इनफेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चांगले फूटवेअर वापरा. 

ADVERTISEMENT

दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहरा धुवा (Rinse your face at least 2-3 times a day)

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. कारण पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे तुमची त्वचा अति कोरडी अथवा अति तेलकट होऊ शकते. तेलकट त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्हाला दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा चेहरा धुण्याची खूप गरज असते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं तुम्हाला रोखता येऊ शकतं. त्वचा कोरडी होत असेल तर चेहरा धुतल्यावर चांगलं मॉइस्चराइझर लावून त्वचेचं संरक्षण करा. 

त्वचा कोरडी ठेवा (Keep the skin dry)

पावसाळ्यात वातावरणात अति प्रमाणात आर्द्रता निर्माण झाल्यामुळे तुम्हाला सतत घाम येतो. त्वचेवर घाम आणि तेलकटपणा निर्माण झाल्यामुळे पिंपल्सच्या समस्या होऊ शकतात. तसंच ओलाव्यामुळे त्वचेवर खाज, खरूज असे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. यासाठी त्वचा कोरडी राहिल याची काळजी घ्यायला हवी. यासाठी पावसात भिजल्यानंतर अंग स्वच्छ पुसून घ्या. अंगाला पावसाने खाज येत असेल तर लगेच अंघोळ करून अंग पुसा. घाम येऊ नये यासाठी त्वचेवर अॅंटि फंगल पावडर लावा. 

आहार संतुलित ठेवा (Maintain Healthy Diet)

पावसाळ्यात तळलेले पदार्थ आणि चमचमीत पदार्थ खाण्याची नकळत इच्छा होत असते. ज्यामुळे वारंवार भजी, वडे असे पदार्थ खाण्याकडे कल वळतो. पण जर तुम्हाला वारंवार त्वचेच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही पावसाळ्यात योग्य आणि संतुलित आहारल घ्यायला हवा. कारण तेलकट पदार्थ आणि जंक फूडमुळे तुमच्या त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. यासाठी पौष्टिक आणि ताजे अन्न खा. पावसाळ्यातील हंगामी भाज्या, फळं आहारात असतील याची काळजी  घ्या.

धुम्रपान आणि मद्यपान टाळा (Avoid Smoking And Drinking)

पावसाळा असो वा कोणताही ऋतू धुम्रपान आणि मद्यपान नेहमी टाळणेच योग्य  आहे. कारण या दोन्ही गोष्टींचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला पावसाळ्यातदेखील फ्रेश  आणि सुंदर दिसायचं असेल तर या व्यसनांपासून शक्य तितकं दूर रहा.

ADVERTISEMENT

चांगल्या गुणवत्तेची सौंदर्यप्रसाधने वापरा (Use Branded Cosmetics)

पावसाळ्यात नेहमी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने वापरा. कारण पावसामुळे तुमची त्वचा नाजुक आणि संवेदनशील झाली असते. कोणतेही सौंदर्यप्रसाधन वापरण्याआधी त्याच्यावरील लेबल जरूर वाचा.

पावसाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय – Home Remedies For Oily Skin In Monsoon

तेलकट त्वचेच्या लोकांच्या त्वचेवर अतिरिक्त तेलाचा थर जमा होत असतो. ज्यामुळे अशी त्वचा अती तेलकट आणि चमकणारी असते. तेलकट त्वचेवर लवकर धुळ आणि प्रदूषण जमा होते. ज्यामुळे अशा त्वचेच्या लोकांना पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या फार लवकर जाणवतात. म्हणूनच पावसाळ्यात या त्वचेला अधिक काळजीची गरज असते.

कडूलिंबाची पानं (Bitter Leaf)

कडूलिंब हा सौंदर्य वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण कडूलिंबांमध्ये अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे तुम्हाला त्वचेच्या इनफेक्शनचा धोका कमी असतो. तेलकट त्वचेवर अती तेलामुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला या फेसफॅकचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. हा पॅक तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच संपूर्ण शरीरावरील त्वचेच्या संरक्षणासाठी वापरू शकता.

स्टेप 1 – कडूलिंबाची पाने वाटून घ्या अथवा कडूलिंबाची कोरडी पावडर घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 2 – कडूलिंबाच्या मिश्रणामध्ये एक चमचा मध टाका

स्टेप 3 – हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासाने चेहरा धुवून टाका.

चंदन पावडर (Sandalwood Powder)

चंदन पावडर आाणि गुलाबपाणी तुमच्या त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. कारण चंदन पावडचा हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि डेडस्किन निघून जाईल. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक नितळपणा  आणि चमकदेखील येईल.

स्टेप 1- दोन चमचे चंदन पावडर आणि एक चमचा गुलाबपाणी घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 2 – हे मिश्रण एकजीव करून एक फेसपॅक तयार करा

स्टेप 3 – हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी धुवून टाका.

मुलतानी माती (Multani Mitti)

मुलतानी माती तुम्ही कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी वापरू शकता. मात्र जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही गुलाबपाणी आणि मुलतानी मातीचे मिश्रण तुमच्या त्वचेसाठी बेस्ट ठरेल. हा पॅक तुम्ही महिन्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा वापरावा.

स्टेप 1- दोन चमचे मुलतानी माती, दोन चमचे गुलाबपाणी आणि चिमुटभर हळद घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 2 – हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा.

पावसाळ्यात कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय – Home Remedies For Dry Skin In Monsoon

काही लोकांची त्वचा ही कोरडी आणि रुक्ष असते. अशी त्वचा पातळ असल्याने या त्वचेवर बाहेरील बदलेल्या हवामानाचा परिणाम लवकर जाणवतो. हिवाळयात आणि पावसाळयात कोरड्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

जोजोबा ऑईल (Jojoba Oil)

जोजोबा ऑईल त्वचेसाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. जोजोबा ऑईल इतर तेलांच्या मानाने अतिशय हलके आणि कमी तेलकट असते. जोजोबा ऑईल तुमच्या त्वचेच्या मुळांशी जातं आणि त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवतं. शिवाय यामुळे तुमचा कामाचा आणि मनावरचा ताणदेखील कमी होतो. यासाठीच कोरड्या त्वचेच्या लोकांनी पावसाळ्यात जोजाबा ऑईल जरूर लावावं.

स्टेप 1 – एका वाटीत जोजोबा ऑईलचे काही थेंब घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 2 – चेहरा स्वच्छ करून कोरडा करून घ्या

स्टेप 3 – जोजोबा ऑईलने चेहऱ्यावर हलक्या हाताने आणि बोटांनी मसाज करा.

पपईचा गर (Papaya Curry)

पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चे  प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होऊ शकतं. पावसाळ्यात हवामानात झालेल्या बदलांमुळे तुमची त्वचा कोरडी दिसू लागते. अशा वेळी तुम्ही दोन ते तीन दिवसांनी पपईचा गर चेहऱ्यावर नक्कीच लावू शकता. पपई आणि मध एकत्र चेहऱ्यावर लावल्यानेदेखील तुम्हाला चांगला फरक दिसून येऊ शकतो. पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि डेडस्किन कमी होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक तजेलपणा आणि ग्लो येतो.

स्टेप 1  – एका वाटीत पपईचा गर घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 2 – पपईचा गर मिक्सरमध्ये लावा.

स्टेप 3 – पपईच्या गरात मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा

स्टेप 4 – चेहरा अर्धा तासाने स्वच्छ करा

मध (Honey)

मध हे कोरड्या त्वचेवर एक रामबाण उपाय आहे. मध आणि दुधाचे मिश्रण त्वचेला लावल्यामुळे तुमच्या त्वचेला एक प्रकारचा नैसर्गिक ओलावा मिळतो. पावसाळ्यात त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे ती कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. मात्र हा फेसपॅक लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते.

ADVERTISEMENT

स्टेप 1 – एका वाटीत मध घ्या

स्टेप 2 – मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका.

पावसाळ्यात नॉर्मल त्वचेसाठी घरगुती उपाय – Home Remedies For Normal Skin In Monsoon

सर्वसामान्यपणे अनेकजणींची त्वचा ही नॉर्मल असते. नॉर्मल त्वचा ही मऊ आणि गुळगुळीत असते. जी जास्त कोरडी अथवा जास्त तेलकट नसते. मात्र पावसाळ्यात नॉर्मल त्वचेचीदेखील विशेष काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे.

टोमॅटोचा गर (Tomato)

टोमॅटोचा गर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावर चमकदारपणा येतो. कारण टोमॅटो एक नैसर्गिक सौदर्योपचार आहे. शिवाय प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात टोमॅटो सहज मिळू शकतो. यासाठी एका टोमॅटोचा गर घ्या त्यात थोडं मध टाकून तो गर चेहऱ्यावर लावा. अर्धा तासाने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

ADVERTISEMENT

स्टेप 1 –  टोमॅटोचा गर काढून त्यामध्ये थोडंसं मध टाका

स्टेप 2 –  हा  फेसपॅक चेहऱ्यावर लावून काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका.

रोझ पावडर (Rose Powder)

गुलाबाचे पाणी आणि पावडर दोन्ही सौंदर्य खुलविण्यासाठी उत्तम आहेत. गुलाबपाण्याने चेहरा नियमित टोन केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक तजेलदारपणा येतो. याशिवाय तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्याची पावडर मधासोबत नियमित चेहऱ्यावर लावू शकता. असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लवकर एजिंगच्या खुणा दिसणार नाहीत. शिवाय पावसाळ्यात त्वचेवर दिसणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय  असू शकतो.

स्टेप 1 – दोन ते तीन चमचे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांची पावडर घ्या.

ADVERTISEMENT

स्टेप 2 –  या पावडरमध्ये दुधाची साय टाकून एक मिश्रण तयार करा

स्टेप 3 – फेसपॅक चेहऱ्यावर लावून कोमट पाण्याने चेहरा धुवा.

गाजराचा रस (Carrot Juice)

गाजराचा रस आरोग्यासाठी तर गुणकारी आहेच पण त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौदर्यदेखील वाढू शकते. जर तुम्हाला पावसाळ्यात सुंदर  दिसायचंअसेल तर चेहऱ्यावर गाजराचा रस जरूर लावा. गाजराच्या रसामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा कायम चिरतरूण दिसू शकते.

स्टेप 1 – गाजराचा किस करून घ्या.

ADVERTISEMENT

स्टेेप 2 – गाजराचा किस अथवा रस चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासाने चेहरा धुवून टाका.

पावसाळा आणि त्वचेची काळजी याबाबत महत्वाचे प्रश्न – FAQ’s

प्रश्न – पावसाळ्यामध्ये सनस्क्रिन लावण्याची गरज का असते?

उत्तर – पावसाळ्यात चेहऱ्यावर सनस्क्रिन लावणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जरी पावसाळ्यात वातावरण ढगाळ असलं. तरी वातावरणातील ओझोनचा थर कमी झालेला असल्यामुळे सुर्याची अतीनील किरणं तुमच्या त्वचेचे नुकसान करू शकतात. यासाठीच पावसाळ्यात सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे.

प्रश्न – पावसात भिजण्यापूर्वी त्वचेची कशी काळजी घ्यावी?

उत्तर – पावसाळा म्हटलं की सर्वानांच पिकनिकला जाण्याचे आणि भिजण्याचे वेध लागतात. मात्र पावसात भिजल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी पावसात भिजण्यापूर्वी आणि भिजल्यानंतर वर दिल्याप्रमाणे त्वचेची काळजी घ्या आणि मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद लुटा. शक्य असल्यास भरपुर पाणी प्या आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.

प्रश्न – पावसाळ्यात पाणी कमी प्यायल्यास काय त्रास होऊ शकतो?

उत्तर – पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे आणि हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे आपण पाणी कमी प्रमाणात पितो. मात्र शारीरिक क्रिया सुरळीत चालण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. पावसात पाणी कमी पिण्याने तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय पाण्यावाटे शरीरातून बाहेर पडणारे टॉक्सिन्स बाहेर न पडल्यामुळे तुम्हाला आजारपणांना सामोरं जावं लागू शकतं.

ADVERTISEMENT

प्रश्न – पावसामुळे एक्ने येतात का ?

पावसात वातावरणात दमटपणा वाढतो. ज्यामुळे त्वचेवर घाम येण्याचे आणि त्वचा तेलकट होण्याचे प्रमाण वाढते. जर त्वचा वारंवार स्वच्छ केली नाही तर यामुळे तुमच्या त्वचेवर एक्ने येऊ शकतात. 

Conclusion –  थोडक्यात उन्हाळ्या आणि हिवाळ्या प्रमाणे पावसातही त्वचेची निगा राखणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही दिलेलं पावसाळ्यातील स्कीन केअर रूटिन फॉलो करून आणि स्कीन केअर टिप्स, सौंदर्य उत्पादने वापरून तुम्ही त्वचेची योग्य निगा नक्कीच राखू शकता. 

05 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT