हिवाळ्यात केसांची निगा राखणं जास्त गरजेचं असतं. कारण वातावरणातील बदलामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात. अशा काळात जेव्हा हवे तेव्हा केस कधीच नीट दिसत नाहीत. कारण तुम्ही कितीही काळजी घेतली तरी सतत केसांवर हवामानाचा परिणाम होतच राहतो. म्हणूनच केसांना फाटे फुटणे, केस कोरडे होणे, केसांची चमक कमी होणे अशा समस्या जाणवतात. अशा परिस्थितीत कधीही आणि कुठेही जाताना पटकन स्टायलिश दिसायचं असेल तर काही हेअर एक्सेसरीज तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. कारण त्यामुळे तुमच्या केसांची अवस्था तुम्हाला पटकन झाकता येते.
केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)
स्कार्फ
केस मोकळे असताना जर ते सतत गुंतलेले आणि विस्कटलेले दिसत असतील तर अशा केसांवर तुम्ही मस्त एक छान स्कार्फ बांधू शकता. ज्यामुळे तुम्ही ट्रेंडी आणि स्टायलिश दिसाल शिवाय तुमचे केस खराब झाले आहेत हे कोणाला कळणार देखील नाही. विशेष म्हणजे स्कार्फमुळे तुमच्या डोक्याचे, केसांचे संरक्षणदेखील होईल.
इअर मफ्स
इअर मफ्स, हेअर बॅंड अशा हेअर एक्सेसरिज वापरूनही तुम्ही तुमचे केस हिवाळ्यात मेंटेन करू शकता.कारण त्यामुळे तुमच्या केसांचा पोत झाकला जातो आणि तुमचा स्टायलिश लुक सर्वांना दिसतो. त्यामुळे जेव्हा केस खराब असतात तेव्हा अशा एक्सेसरीज वापरणं नक्कीच फायद्याचं ठरेल.
रिबन आणि बो
जर तुमचे केस फ्रिजी असतील तर तुम्हाला केसांची निगा राखणं अथवा एखादी स्टाइल करणं हिवाळ्यात खूप त्रासदायक वाटू शकतं. कारण हिवाळ्यामुळे तुमचे केस जास्तच कोरडे होतात. या काळात केसांसाठी जर तुम्ही रिबन अथवा बोचा वापर केला तर तुमचे केस नीट बांधले जातात आणि त्यांच्यावर ताणदेखील येत नाही. जेव्हा हिवाळ्यात केस जास्तच खराब होतात अशा वेळी तुम्ही या एक्सेसरिजचा वापर करून स्टायलिश दिसू शकता.
केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी वापरा हेअर सीरम (Hair Serum To Get Silky Hair)
बॅरेट
हिवाळ्यात केसांसाठी बॅरेट वापरणं नक्कीच फायद्याचं ठरेल. आजकाल बाजारात विविध रंगाचे आणि स्टाईलचे बॅरेट विकत मिळतात. तुमचे केस कोणत्याही टाईपचे असले तरी बॅरेटमुळे ते व्यवस्थित राहतात आणि तुमचा लुक परफेक्ट होतो. शिवाय स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये याचा समावेश करू शकता.
हेअर क्लिप्स
हिवाळ्यासाठी तुम्ही खास काही हेअर क्लिप्स आणि हेअर बॅंडची खरेदी करू शकता. तुम्ही ते तुमच्या केसांवर सहज वापरू शकता आणि तुम्ही त्यात स्टायलिशही दिसता.
केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)