केस सिल्की आणि शायनी असावे यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता. पार्लरमधील महागडया ट्रिटमेंट करण्यापासून ते अगदी नियमित हेअर स्पा करूनही बऱ्याचदा केस काही दिवसांनी परत निस्तेज, कोरडे आणि फ्रिजी दिसू लागतात. केस काळे करण्यासाठी आणि सिल्कचे सुंदर बनवण्यासाठी आपण केवढे प्रयत्न करत असतो. सलॉनमध्ये केसांवर भरपूर केमिकल ट्रिटमेंट केल्यामुळे काही काळापुरते केस सिल्की होतात. मात्र केस धुतल्यावर अथवा झोपेतून उठल्यावर केसांचं खरं रुप दिसू लागतं. यासाठी केस आतून नैसर्गिक पद्धतीने सिल्की आणि शायनी व्हायला हवेत. काही सोपे आणि साधे घरगुती उपाय करून तुमचे केस नियमित सिल्की दिसू शकतात. मात्र हे उपाय सातत्याने करायला हवेत. यासाठी जाणून घ्या केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)
केसांना नियमित हेअर ऑईल मसाज करा
केस सिल्की आणि चमकदार दिसण्यासाठी केसांची योग्य निगा राखणं तितकंच गरजेचं आहे. यासाठीच हा केस सिल्की करण्यासाठी उपाय (Silky Shiny Hair Tips In Marathi) जरूर करा. वास्तविक बऱ्याचजणींना केसांना तेल लावायला आवडत नाही. मात्र असं चुकूनही करू नका. कारण तेलामुळे केसांच्या मुळांचे योग्य पोषण होते आणि केस मजबूत होतात. असे मजबूत आणि निरोगी केस नेहमीच चांगले दिसतात. यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केसांना मस्त हेअर मसाज करा. हेअर मसाज करण्यासाठी नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल असे कोणतेही हेअर ऑईल निवडा. हे तेल थोडं कोमट करा आणि कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर हलक्या हाताने केसांमध्ये मसाज करा. ज्यामुळे तुमच्या स्काल्पच्या खालील त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारेल आणि केसांची योग्य वाढ होऊन केस नैसर्गिक पद्धतीने सिल्की होतील. केसांसाठी उपयुक्त ठरते ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या फायदे (Olive Oil For Hair In Marathi)
केस गरम पाण्याने कधीच धुवू नका
केसांची निगा राखण्यासाठी केस नेहमी थंड पाण्याने धुवावेत हे लक्षात ठेवा. खरंतर थंडीत अथवा थंड हवेच्या ठिकाणी केस थंड पाण्याने धुणं तसं थोडं अवघडच आहे. पण जर तुम्ही केस थंड पाण्याने धुतले तर ते कायम सिल्की राहतील. या उलट जर तुम्ही केस चुकूनदेखील गरम पाण्याने धुतले तर केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाईल आणि केसांचे क्युटिकल्स ओपन होऊन तुमच्या केसांचे जास्त नुकसान होईल. त्याच प्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा केस सिल्की राहण्यासाठी केसांना शॅंपू केल्यावर कंडिशनर लावण्यास विसरू नका आणि कंडिशनर लावलेले केस धुण्यासाठी कधीच गरम पाणी वापरू नका. केस डिप कंडिशनिंग केल्यामुळे कायम मऊ राहतील.
केस कोरडण्यासाठी रगडून पुसू नका
केस धुतल्यावर ते तुम्ही कसे पुसता यावर तुमचे केस कोरडे होणार की सिल्की दिसणार हे अवलंबून आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण जर तुम्ही टॉवेलने रगडून केस पुसत असाल तर तुमचे केस कधीच सिल्की दिसू शकत नाहीत. याचं कारण केस रगडून पुसल्यामुळे केसांचे क्युटिकल्स ओपन होतात आणि केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केस अती प्रमाणात कोरडे होऊन तुटू लागतात. याउलट जर तुम्ही केस पुसताना फक्त केसांमधील पाणी टिपण्याचा प्रयत्न केला तर केस कोरडे तर होतातच शिवाय केसांचे नुकसान होत नाही.
केसांना उष्णता देणाऱ्या ट्रिटमेंट करू नका
केस स्टायलिश दिसण्यासाठी आपण केसांवर सतत निरनिराळ्या हेअर स्टाईल करत असतो. मात्र बऱ्याचशा हेअर स्टाईल करण्यासाठी केसांवर हेअर स्ट्रेटनर, हेअर कर्लर, हेअर ड्रायर वापरले जातात. या टूल्समुळे केस सरळ आणि स्मूथ होतात. पण याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. जरी थोड्या वेळासाठी तुमचे केस सुंदर दिसत असले तरी या उपकरणांमधून दिल्या जाणाऱ्या उष्णतेमुळे केस खराब होतात. केसांच्या वरील आवरण आणि हेअर फॉलिकल्स जळतात आणि केस पुढे निस्तेज दिसू लागतात. यासाठी केस नैसर्गिक पद्धतीने सिल्की (Silky Hair Tips In Marathi) राहण्यासाठी कधीच उष्णता देणारे हेअर टूल्स केसांसाठी वापरू नका.
केस पुसण्यासाठी टॉवेल ऐवजी टी शर्ट वापरा
केस धुतल्यावर ते सुकवण्यासाठी तुम्ही टर्किशचा टॉवेल वापरता का. केसातील पाणी टिपण्यासाठी टर्किश टॉवेल कितीही चांगले वाटत असले तरी त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी एखादा जुना न वापरत असलेला टीशर्ट वापरणं तुमच्या फायद्याचं ठरेल. टर्किश टॉवेल आणि जुना टी शर्ट केसांतील पाणी टिपण्याचेच काम करेल मात्र टी शर्टचे कापड मऊ असल्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान मात्र नक्कीच होणार नाही.
ओले केस कंगव्याने विंचरा, कोरडे केस ब्रश करा
केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंता होत असेल तर केस सोडवताना हा नियम नेहमी लक्षात ठेवा की ओले केस असतील तेव्हा ते कंगव्याने सोडवा आणि कोरड्या केसांवर ब्रश वापरा. कारण जर ब्रश करताना काळजी घेतली नाही तर तुमचे केस ओले असताना मोठ्या प्रमाणावर तुटू शकतात. यासाठीच जेव्हा केस ओले असतील तेव्हा ते सोडवण्यासाठी फक्त मोठ्या दातांचा कंगवाच वापरा. मात्र केस कोरडे झाल्यावर ते सेट करण्यासाठी तुम्ही नक्कीच हेअर ब्रश वापरू शकता. केसांची निगा राखण्यासाठी आणि केस सिल्की राहण्यासाठी चांगला कंगवा आणि हेअर ब्रशमध्ये पैसे खर्च करा.
केसांना संरक्षण देणारे हेअर सीरम वापरा
केसांना कोरडे केल्यावर अथवा ब्लो ड्राय केल्यावर केस कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला केसांवर ड्रायर वापरायचे असेल तर केस कोरडे केल्यावर केसांवर हेअर सीरम वापरण्यास विसरू नका. ज्यामुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक चमक कायम टिकून राहिल. केसांच्या वरील आवरणावर या सीरममुळे एक संरक्षण लेअर तयार होतो ज्यामुळे तुमचे केस खराब न होता सिल्की आणि शायनी दिसतात. मात्र लक्षात ठेवा ओले केस ऐंशी टक्के सुकल्यावरच केसांवर सीरम लावा. शिवाय सीरम स्काल्पवर न लावता फक्त केसांच्या मध्यापासून टोकाकडील भागावर लावा. शिवाय सीरमचा वापर प्रमाणात असेल याची काळजी घ्या. आयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी (Ayurvedic Hair Care Tips In Marathi)
केस नियमित ट्रीम करा
केस लांबसडक आणि मजबूत असावेत असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा नसेल तरी तीन महिन्यातून एकदा केस ट्रीम जरूर करा. कारण केस सिल्की (Silky Hair Tips In Marathi) ठेवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. केस ट्रीम केल्यामुळे केसांना आलेले फाटे कमी होतात आणि केसांची मुळे आणि टोक दोन्ही मजबूत होते. केस ट्रीम केल्यावर ते जास्त सुंदर आणि सिल्की दिसतात. केस शायनी दिसावेत यासाठी उपाय (Shiny Hair Tips In Marathi ) असाल आम्ही सांगितलेल्या या टिप्स अवश्य लक्षात ठेवा.
केस सरळ करण्यासाठी घरगुती उपचार करा
केस सरळ करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक उपचार केले जातात. मात्र या उपचारांसाठी केसांवर अती केमिकल्सचा वापर केल्यामुळे केस काही दिवस चांगले दिसतात मात्र त्यानंतर गळतात अथवा निस्तेज होतात. केसांची चमक कायम असेल तर केस सिल्की दिसतील यासाठी केस सरळ करण्यासाठी नेहमी घरगुती उपचारांचा वापर करा. कोरफड, दही, अव्होकॅडो, अंडे अशा घरातील वस्तू वापरून तुम्ही तुमचे केस कंडिशनिंग करू शकता. केसांना नैसर्गिक पोषण मिळाल्यामुळे तुमचे केस सरळ तर होतातच शिवाय ते आतून चमकदार आणि सुंदर दिसू लागतात. केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)
झोपताना सॅटिन कव्हरची उशी वापरा
तुम्ही झोपताना कोणत्या उशीवर झोपता यावर तुमचे केस सिल्की दिसणार की निस्तेज हे अवलंबून आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित थोडं आश्चर्य वाटेल पण जर तुम्ही जाड, सुती कव्हर असलेली उशी वापरत असाल तर तुमचे केस झोपेत जास्त प्रमाणात तुटू शकतात. याउलट सुळसुळीत असल्यामुळे आरामदायक नसली तरी सॅटिन कव्हरची उशी तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण या कापडाच्या उशीच्या कव्हरमुळे तुमचे केस तुटत नाहीत. शिवाय झोपताना केस दुमडले जाण्याची, डोके अथवा हाताखाली अडकण्याची शक्यता जास्त असते. सॅटिनच्या कापडामुळे केस त्यावरून सहज सरकले जातात आणि तुटत नाहीत.