ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
best-oil-for-body-massage-as-per-ayurveda

आयुर्वेदानुसार बॉडी मसाजसाठी उत्कृष्ट तेल

बॉडी मसाजसाठी आपण कोणकोणते उत्तम तेल वापरू शकतो त्यासाठी तुमचं उत्तर काय असेल बरं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल अथवा असेलही. पण तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेदानुसार बॉडी मसाजसाठी असे काही ऑईल्स (Body Massage Oil) आहेत, जे बॉडी मसाजसाठी वापरणे जास्त चांगले ठरते. तुम्हाला या तेलांबाबत काही माहिती नसेल तर तुम्ही या लेखातून अशा उत्कृष्ट तेलांबाबत माहिती मिळवू शकता. आयुर्वेदानुसार बॉडी मसाजसाठी उत्कृष्ट तेल नक्की कोणते आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. 

माशा तायला ऑईल (Masha Taila Oil)

तुम्हाला कदाचित या तेलाबाबत माहीत नसेल. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आयुर्वेदात या तेलाला एक चमत्कार म्हटलं जातं. जर तुम्हाला पाठीचा त्रास, सांधेदुखीचा त्रास इत्यादी त्रासासाठी हे तेल उत्तम ठरते. बऱ्याच आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, तुम्ही या तेलाचा वापर करून बॉडी मसाज करू शकता. तुमचे शरीर बारीक असेल तर तुम्ही या तेलाचा नक्की वापर करून घ्या. तुमच्या शरीरासाठी हे तेल आरामदायी आणि फायदेशीर ठरते. 

खशेरबाला थाईलम ऑईल (Ksheerabala Thailam Oil)

खशेरबाला थाईलम ऑईल हे एक आयुर्वेदिक तेल आहे, जे मध्यम फॅट अर्थात ज्यांचे शरीर मध्यम आकाराचे असते त्यांच्यासाठी हे तेल अत्यंत उपयोगी ठरते. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगत आहोत की, खशेरबाला थाईलम हे दक्षिण भारतीय राज्यातील केरळमध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येते. याच्या वापराने अनेक सांधेदुखीच्या समस्या सुटण्यास मदत मिळते.

ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)

Olive Oil Benefits In Marathi

ऑलिव्ह ऑईलने हलक्या मालिशनेदेखील शरीराला आराम मिळतो. ऑलिव्ह ऑईल हे शरीरामध्ये हळूहळू शोषून घेतले जाते. हे तेल तुमच्या मांसपेशींना आराम देण्यासाठी आणि त्वचेला मुलायमपणा देण्यासाठी अत्यंत योग्य तेल आहे. ऑलिव्ह ऑईल हे त्वचेसाठी वरदान आहे. तसंच रक्ताचा प्रवाह वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. शरीरावरील कोणत्याही प्रकारची सूज असेल तर तुम्ही या तेलाचा वापर आयुर्वेदानुसार करू शकता. नियमित स्वरूपात ऑलिव्ह ऑईल लावल्याने तुमची त्वचा ऑक्सिडेटिव्ह तणावापासून तुम्ही वाचू शकता.

ADVERTISEMENT

तिळाचे तेल (Sesame Oil)

हाडं मजबूत करण्यासाठी आणि डोकं शांत ठेवण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाने शरीराचे मालिश करून घ्या. तिळाच्या तेलाने तुम्हाला योग्य आराम मिळतो. तिळाच्या तेलामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, कॉपर, ओमेगा – 3 फॅट आणि प्रोटीनयुक्त असून त्वचा अधिक मॉईस्चराईज करण्यासाठी याचा उपयोग होतो. याशिवाय यातील विटामिन ई हे त्वचेवरील स्ट्रेचमार्क्स काढून टाकण्यासही मदत करते. तसंच तुमच्या वाढत्या वयाचा परिणाम त्वचेवर कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

टीप – या प्रकारचे तेल तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून प्राप्त करता येतील. 

या गोष्टींची घ्या काळजी  

ज्या व्यक्तींचे शरीर जाड आहे त्यांनी शक्यतो या तेलाचा वापर करण्यापासून वाचावे. तर या तेलाने शरीराचा मसाज केल्यानंतर तुम्हाला साधारण अर्ध्या तासानंतर अथवा किमान 40 मिनिट्सनंतर आंघोळीला जायला हवं. त्याआधी तुम्ही आंघोळीला अजिबात जाऊ नका. तसंच तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर नियमित साबण न वापरता त्याऐवजी तुम्ही हर्बल साबणाचा वापर करा. याशिवाय तुम्ही त्रिफला, ग्रीन ग्राम इत्यादी गोष्टींचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात येतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT