ADVERTISEMENT
home / Romantic Trips
पावसाळी वीकेंड लाँग ड्राईव्हसाठी बेस्ट ठिकाणं

पावसाळी वीकेंड लाँग ड्राईव्हसाठी बेस्ट ठिकाणं

जिंदगी एक सफर है सुहाना… यहाँ कल क्या हो किसने जाना…. सध्या कोरोनामुळे सगळ्यांचीच अवस्था अशी झाली आहे. आयुष्यातली चांगली दोन वर्ष आपण सगळ्यांनीच घरी बसून काढली आहेत. आता हळुहळू परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणात येऊ लागली आहे. लॉकडाऊन हळुहळू शीथिल होऊ लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घराबाहेर पडण्याची थोडी मुभा मिळाली आहे. शिवाय वातावरणही पावसामुळे इतके आल्हाददायक झाले आहे की, Nature calling म्हणत आता निसर्गाचा आनंद लुटण्याची गरज वाटू लागली आहे. एखाद्या शनिवारी किंवा तुमच्या कामाच्या सुट्टीच्यावेळात कुटुंबाला घेऊन लाँग ड्राईव्हला जाण्याची इच्छा असेल तर आरोग्याची काळजी घेत तुम्ही काही जवळच्या ठिकाणी नक्कीच एक फेरफटका मारुन येऊ शकता. ही ठिकाणं मुंबई- पुण्यापासून जवळ असल्यामुळे तुम्ही परिस्थितीचा अंदाज घेऊन जाऊ शकता.

भारतात आजही आहेत अशा रहस्यमयी लेण्या, जाणून घ्या वैशिष्ट्य

पवना लेक 

टुरिस्टचे खास आकर्षण असलेला पुण्यातील पवना लेक हा फारच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पावसात एकदम रम्य असे वातावरण असते. या ठिकाणी लेकच्या काठावर बसून तुम्ही मस्त आनंद घेऊ शकता. पवना लेकला कॅम्पेन होत असतात. पण आता पावसात या ठिकाणी ते होत नाही. त्यामुळे तुम्हाला छान मोकळ्या वातावरणात फिरता येईल. या ठिकाणी जाताना रस्ता आणि जर तुम्हाला पाऊस मिळालाच तर जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. 

ADVERTISEMENT

कर्जत 

मुंबईपासून जवळ असलेले असे हे ठिकाण निसर्गसौंदर्याने बहरलेले आहे. या ठिकाणी तुम्ही नुसते फिरायला जरी गेलात तरी देखील तुम्हाला खूप भारी वाटेेल. उन्हाळ्यात या दिवसात खूपच रखरखीत असं उन असतं. पण तुम्ही आता गेलात तर तुम्हाला मात्र या ठिकाणी मुळीच गरम होणार नाही. तुम्हाला या ठिकाणी मस्त हिरवी गार शेते दिसतील. एक दिवसात जाऊन येऊन तुम्ही हा लाँग ड्राईव्ह करु शकता. तुम्हाला कर्जतच्या बाजारात गरमा गरम भजी, वडापाव आणि उत्तम घरगुती जेवण मिळेल ज्याचा आस्वाद घेऊन आणि थोडा बाजारहाट करुन तुम्ही घरी येऊ शकता. 

लोणावळा 

लोणावळा हे टुरिस्ट आकर्षण आहे. या दिवसात या ठिकाणी पर्यटकांची नुसती झुंबड उडते. पण गेल्या वर्षी कोरोनामुळे म्हणावे तितके पर्यटक या ठिकाणी आले नाहीत. पण आता जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही लोणावळ्याला नक्की जाऊ शकता. रोमँटीक लाँग ड्राईव्हसाठी लोणावळा एकदम बेस्ट डेस्टिनेशन आहे. मुंबईहून लोणावळ्याला जाण्यासाठी साधारण 2 तास लागतात. लोणावळ्याला जाताना तुम्हाला मस्त गरम गरम मॅगी,भुट्टा असे सगळे काही मिळेल. जे तुमचा मूड एकदम चांगला करेल. 

ADVERTISEMENT

 

सांदण दरी (Sandan Valley) एक थरारक अनुभव

पावसाळ्यातील लोणावळा

Instagram

ADVERTISEMENT

येऊर 

आता मुंबईतून दूर जाण्याची परवानगी तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही ठाण्यातील येऊर येथे देखील जाऊ शकता. येऊर परिसरात अनेक लहान लहान बंगले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे ठिकाण पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. तुम्ही या ठिकाणी नुसते फिरून येऊ शकता. जाताना मस्त कटिंग चहा- कॉफी आणि भजीचा आनंद घेऊन मस्त ठिकाणी पोटभर जेऊन तुम्ही दिवस आनंदात घालवू शकता. 

बीच 

मुंबईत अनेक बीचेस आहेत. त्या ठिकाणी तुम्ही मस्त एक फेरफटका मारु शकता. बीचवर जाण्याची परवानगी जरी नसली तरी देखील तुम्ही शक्य असेल तेवढ्या जवळ असलेल्या बीचेसवर जाऊ शकता. खूप जणांना बीचेस पावसाळ्यात खूप आवडतात.  त्यामुळे एखाद्या रोमँटीक ड्राईव्हसाठी तुम्ही जाऊ शकता. 

ADVERTISEMENT

आाता पावसाळ्याच्या लाँग ड्राईव्हसाठी या काही ठिकाणी नक्की जा.

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

10 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT