कोणत्याही मुलीसाठी आपल्या लग्नातील वेडिंग आऊटफिट (Wedding Outfit) सर्वात जास्त महत्त्वाचे असते. आपल्याकडे लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जाते आणि साडी कशी नेसावी हेदेखील बरेचदा लग्नाआधी अनेक जणी शिकून घेत असतात. लग्नात विविध प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. पण आता ब्रायडल फॅशनमध्येही अनेक बदल झाले आहेत. लेहंगा घालून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने लाल रंगाच्या ब्रायडल साडीची निवड करण्यात येते. पण आपल्याकडे साडी विविध पद्धतीने लग्नामध्ये नवरीला नेसवण्यात येते. ब्रायडल साडी ड्रेपिंगबाबत (Bridal Saree Draping) या लेखातून आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. तुम्हीही या टिप्सचा वापर करून वेगळ्या पद्धतीने साडी नेसू शकता.
ओपन फॉल स्टाइल (Open Fall Style of Bridal Saree)
अत्यंत सोबर स्टाईलमध्ये आणि दुपट्ट्यासह तुम्हाला साडी नेसून हवी असेल तर तुम्ही ओपन फॉल स्टाईल ट्राय करू शकता. यासाठी काही खास टिप्स
साडी नेसण्याच्या टिप्सः
- तुम्हाला ओपन फॉल स्टाईलमध्ये कमी वजनाची ब्रायडल साडी नेसायची असेल तर तुम्ही त्यावर हेव्ही दुप्पटा कॅरी करू शकता
- अशा पद्धतीच्या साडीमध्ये पदराच्या तुम्ही जितक्या अधिक निऱ्या काढाल तितकी ही साडी अधिक घेरदार आणि आकर्षक दिसेल
- तसंच साडीच्या पदराच्या निऱ्या या जितक्या बारीक काढता येतील तितक्या काढा. यामुळे साडीची शोभा वाढते
- तुम्ही साडीसह डोक्यावर जर दुपट्टा घेणार असाल तर तुम्ही तुमचा साडीचा पदर हा थोडा लहान लांबीचा काढू शकता
अधिक वाचा – प्लस साईज महिलांना अशी नेसावी साडी
लग्नात आईची साडी
प्रसिद्ध फॅशन डिझाईनर अथवा बाजारातील विविध पद्धतीच्या साड्या नेसण्यापेक्षा काही मुली आपल्या आईच्या लग्नातील शालू अथवा साडी नेसणे अधिक निवडतात. आपल्या आईची साडी आणि त्यावर अप्रतिम अशी अगदी आईचीच पूर्वपरंगत चालत आलेली नथ तुम्ही वापरलीत तर तुम्ही लग्नात अधिक सुंदर दिसता. हा नथीचा नखरा तुम्हाला अधिक आकर्षक आणि उठावदार दर्शवितो.
वाचा – Nauvari Saree Quotes In Marathi
साडी नेसण्याच्या टिप्सः
- आईची साडी जरी जुनी असली तरी त्याला सर्वात आधी तुम्ही पॉलिश करून घ्या. लग्नात नेसताना तुम्ही उलटा पदर खांद्यावरून खाली घ्या आणि साडी नेसा. शोल्डर प्लेट्स स्टाईलमध्ये तुम्ही ड्रेप करू शकता. या साडीचा पदर तुम्ही मध्यम आकारात ठेवा
- तुमचे खांदे जर मोठे असतील तर तुम्ही साडीचा पदर मोठा काढा. अन्यथा तुम्ही साडीचा पदर लहानच ठेवा. तो अधिक चांगला दिसेल
- साडी नेसताना ती तुम्ही अधिक जड वाटत नाही ना याची काळजी घ्या
- तुम्ही जर सिल्क साडीची निवड करणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सुंदर असेल तर बॉर्डर लपवू नका आणि पदर अशा तऱ्हेने काढा जेणेकरून बॉर्डर व्यवस्थित दिसून येईल
- सिल्कची साडी असेल तर साडीच्या निऱ्या काढताना अधिक मोठ्या काढू नयेत याची काळजी घ्या
- तसंच तुम्ही सिल्क साडीवर फ्रंट लोअर प्लेट्ससह साईड लोअर प्लेट्सही काढू शकता. यामुळे तुमच्या साडीचे फिटिंग अधिक चांगले होते आणि दिसायलाही आकर्षक दिसते
तुम्हीही लग्न करणार असाल तर तुम्हाला लग्नात कोणत्या पद्धतीने साडी नेसायची आहे हे नक्की ठरवा आणि त्याप्रमाणे तयार व्हा लग्नासाठी!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक