ADVERTISEMENT
home / Bridesmaid Trends
साड्यांचे प्रकार

लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)

लग्न म्हटलं की, सर्वात पहिल्यांदा खरेदी करायची असते ती नवरीच्या साड्यांची (navrichi sadi) आणि तिच्या साड्यांबरोबरच घरातील अन्य महिलांच्या साड्यांचीही खरेदी तितकीच महत्त्वाची असते. महाराष्ट्रीय लग्न म्हटलं की, काही ठराविक साड्यांशिवाय (marathi wedding sarees shalu) लग्न पूर्ण होतंच नाही. लग्न म्हटलं की, या साड्या नेसायला मिळायालाच हव्यात असं साधारण एक गणित असतं. हल्ली पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नऊवारी साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पण हा झाला साडी नेसण्याचा प्रकार. पण या नऊवारी साड्या असोत अथवा अगदी लग्नाच्या वेळची मामाने दिलेली पिवळी साडी असो. अशा नवरीच्या साड्या विशिष्ट हव्यात हे नक्की. लग्नासाठी साडी (lagnachi sadi) म्हटलं की, अगदी नवरीपासून सगळेच वेगवेगळी दुकानं पालथी घालतात. लग्नामध्ये नवरीवरून कोणाचंही लक्ष हटता कामा नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. मग तो लग्नात मराठी उखाणे घेण्याचा क्षण असो वा सप्तपदीचा. त्यामुळे लग्नामध्ये नक्की काय वेगळेपणा आपण आणू शकतो आणि आपली परंपरा जपत नक्की कोणकोणते वेगवेगळे साड्यांचे प्रकार (sadyanche prakar), साड्यांची नावे आपण वापरू शकतो हे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की, पैठणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण त्याव्यतिरिक्तही लग्नामध्ये अनेक साड्या (marathi wedding sarees shalu) नेसल्या जातात. अनेक साडी प्रकार असतात, त्याबाबत आपण जाणून घेऊया.

लग्नासाठी साड्यांचे प्रकार (Lagnasathi Sadyanche Prakar)

महाराष्ट्रीयन  लग्न म्हटलं की, लग्नासाठी साड्यांचे प्रकार (sadyanche prakar) अनेक आहेत. लग्न ठरलं की, लग्नाची साडी (lagnachi sadi) खरेदीला सुरूवात होते. पण नवरीची (navrichi sadi) नक्की आवड कोणती आणि तिच्या आवडीनिवडीनुसार तिने कोणत्या साड्यांची खरेदी करायला हवी. लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार कोणते निवडावेत ते पाहूया.

पैठणी (Paithani)

Paithani
पैठणी साडी प्रकार

पैठणी ही अशी साडी (lagnachi sadi) आहे ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न सोहळा अपूर्ण आहे. पैठणी म्हटली की, अगदी येवला या ठिकाणी जाऊन पैठणी खरेदी करून आणण्यापासून लग्नघराची तयारी असते. येवला इथे पैठणीचा बाजार आहे. याठिकाणी तुम्हाला हव्या तशा आणि तुम्हाला आवडतील त्या रंगाच्या पैठणी मिळतात. लग्नासाठी खास येवल्याला जाऊन पैठणी घेणारे तुम्हाला अनेक भेटतील. पैठणीचेही अनेक प्रकार आहेत. जरतारी असणारी पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी. तसंच हल्ली नवनवीन प्रकार आले असून काही पैठणीवर तुम्हाला हवी तशी वेगवेगळी कलाकुसरही करून घेता येते. 
पैठणी ही कापसाचा धागा आणि रेशीम यापासून हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची साडी आहे. या साडीच्या पदरावर मोराचं जरीकाम करण्यात येतं. पूर्वी केवळ मोरपंखी रंगातच मिळत असे पण आता अनेक रंगांमध्ये पैठणी पाहायला मिळते. एक उभा धागा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा असं वापरून धूपछाव प्रकारचा परिणाम या साडीला देण्यात येतो. पदरावर मोर, तोता, मैना, पोपट, कलश, मुथाडा, बारवा अशा विविध नक्षी नसून ही सर्वात महागडी साडी (marathi wedding sarees shalu) असं म्हटलं जातं. पैठणीचे काही प्रकार आपण पाहू – 
बालगंधर्व पैठणी – बालगंधर्व पैठणी ही सर्वात सुंदर पैठणी म्हणून ओळखली जाते. वेगवेगळं जरीचं काम असलेली ही साडी लग्नासाठी अप्रतिम आहे. प्रत्येक नवरीला हवीहवीशी वाटणारी ही साडी लग्नात नवरीचीही शोभा वाढवते
पेशवाई पैठणी – नक्षीकाम असणारी पेशवाई पैठणी तुम्हाला एक रॉयल लुक देते. लग्नामध्ये तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पेशवाई पैठणी आणि त्यावर शोभेसे दागिने इतकं घातलं की, तुमचं काम झालं.
महाराणी पैठणी – महाराणी पैठणी ही सर्वात महाग पैठणी आहे. ही पैठणी तुम्हाला एक वेगळाच लुक आणून देते. ही पैठणी खास बनवून घेता येते. 

वाचा – Nauvari Saree Quotes In Marathi

ADVERTISEMENT

बनारसी सिल्क (Banarasi Silk)

Banarasi Silk
साड्यांचे प्रकार (sadyanche prakar)

तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी (Traditional Indian Saree) म्हणून बनारसी साडी (Banarasi Saree) हा उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटली की बनारसी साडी (marathi wedding sarees shalu) नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी शालू नेसले जायचे.  पण बनारसी शालू जड असल्यामुळे नंतर कालांतराने डिझाईनर साड्यांची मागणी वाढली. पण तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये  ब्रायडल लुक हवा असेल तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्यासमोर नक्कीच आहे. लग्न, इतर कोणतं पारंपरिक कार्य घरात असेल अथवा कोणत्याही खास आणि शुभ दिवशी बनारसी साडी नेसणं महिलांना नक्कीच आवडतं. प्रत्येक महिलेला ही साडी शोभून दिसते. तसंच बनारसी साडी ही दिसायला अतिशय रॉयल आणि सुंदर दिसते. त्यामुळेच सर्वांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी बनारसी साडीची निवड केली जाते. याशिवाय तुम्ही गौराईला साडी कशी नेसवावी याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

चंदेरी (Chanderi)

Chanderi
लग्नासाठी साडी

चंदेरी ही मूळची ग्वाल्हेरजवळील चंदेरी या गावातील साडी. पण महाराष्ट्रातही ही साडी तयार होते. या साडीला आता लग्नामध्ये खूपच मागणी आहे. साडीचा किनारा आणि बुट्ट्यांमध्येच त्याचं वैशिष्ट्य दडलेलं असतं. यावरील बुट्टेही दोन प्रकराचे असतात. याच्या किनाऱ्यामध्ये हिरवी पानं विणलेली असतात. तर किनारीचा एक पट्टा रुंद आणि दुसरा अरूंद असतो. ही साडी अतिशय तलम असल्यामुळे उन्हाळ्यात नेसायला अतिशय सोपी आणि सुंदर साडी आहे. त्यामुळे लग्नात या साडीला जास्त मागणी असते. या साडीमध्ये चक्र, पानं या डिझाईन्स असून सर्व काही विणकाम केलेलं असतं. तसंच दिसायलादेखील ही साडी आकर्षक असते. या साडीचे ड्रेसही छान दिसतात. 

वाचा – जुन्या साडीपासून नवीन ड्रेस बनवण्यासाठी खास आयडियाज

खण साड्या (Khun Sarees)

Khun Sarees
साडी चे प्रकार

साडी म्हटलं की एक वेगळाच लुक डोळ्यासमोर येतो. आता अगदी वेगवेगळ्या साड्यांची फॅशन आली आहे. पण आजही महाराष्ट्रीयन खणाची साडी ही सगळ्यात अप्रतिम ठरते आणि या साडीची भुरळ आपल्या मराठी अभिनेत्रींनाही पडली नसती तर नवलचं.  खणाच्या या साडीचा लुकच वेगळा आहे. त्यातही फ्युजन लुक आणि अगदी मराठमोळा लुक असा कोणताही लुक तुम्ही करू शकता. याबरोबर तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिने  घातले की वेगळाच साज चढतो. अशीच आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींची ही खणाची साडी नेसल्यावर केलेली स्टाईल ही वाखाणण्याजोगी आहे. तुम्हालाही हे लुक पाहून आपल्या वॉर्डरोबमध्ये ही मराठमोळी साडी असायलाच हवी असं वाटेलच.  खणाची साडी हा महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अगदी पूर्वकाळापासून ही साडी नेसण्यात येते. पण आता त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. तर मिक्समॅच करून नेसण्यात येणारी ही साडी वेगळाच स्टायलिश लुक मिळवून देते.  

ADVERTISEMENT

मंगळसूत्राचे काय आहे महत्त्व

कांजिवरम अथवा कांचिपुरम (Kanjivaram Or Kanchipuram)

Kanjivaram Or Kanchipuram
lagnachi sadi

फॅशनच्या जगामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात, बदल होत असतात पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. फॅशनमध्ये साडी ही सर्वांचीच आवडती आहे. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. साडी नेसण्याच्या पद्धती आणि फॅशन कितीही वेगळ्या केल्या तरीही कांजिवरम (Kanjivaram) साडीचं वेड हे कधीच कमी होणार नाही. अनेक साडी प्रकार (sadyanche prakar) आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे कांजिवरम साडी. प्रत्येक स्त्री ला आपल्या वॉर्डरोबमध्ये कांजिवरम साड्या हव्याच असतात. पण बऱ्याचदा खऱ्या आणि खोट्या कांजिवरम साड्यांमधील फरक कळत नाही. कांजिवरम ही साडी दक्षिणेतील कांचीपुरममध्ये तयार होते त्यामुळे या साड्यांना कांचीपुरम साड्या असंही म्हटलं जातं. लग्नासाठी या साड्यांचे प्रकार खूपच सुंदर आणि अधिक आकर्षक दिसतात. त्यामुळे दाक्षिणात्य लग्नामध्येच नाही तर अगदी मराठमोळ्या लग्नांमध्येही या साड्या अधिक प्रमाणात नेसल्या जातात.

नारायण पेठ (Narayan Peth)

Narayan Peth
नारायण पेठ – साड्यांची नावे

महिला अनेक साड्यां चे प्रकार वापरतात. पण महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नारायण पेठ हा साडीचा प्रकार (sadyanche prakar) सर्रास पाहायला मिळतो. नेसायला सोपी आणि अतिशय हलकी पण दिसायला अगदी रॉयल अशी ही साडी असते. या साडीच्या रचनेवरून आणि काठावरून ओळखता येते. नारायण पेठ या साडीचा काठ सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ही साडी पाचवार, सहावार आणि नऊवार या तिन्ही प्रकारात मिळते. सहसा नवरी (navrichi sadi) या साडीचा वापर करत नसली तरीही लग्नामध्ये इतर महिला ही साडी अगदी आवर्जून नेसतात. कारण धावपळ करायला लागली तर ही साडी अतिशय हलकी असल्यामुळे जास्त सांभाळावी लागत नाही. तसंच या साडीमध्ये जास्त गरमही होत नाही. त्यामुळे मुंबईसारख्या धावपळीच्या ठिकाणी अशी साडी लग्नामध्ये नेसून जायला प्राधान्य देण्यात येतं. 

ईरकल (Irkal) 

Irkal
साड्यांचे प्रकार – ईरकल

इरकल ही सोलापूर ठिकाणची स्पेशालिटी आहे. इरकल हीदेखील अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायलाही सोपी आहे. मुळात या साडीमध्ये सर्वच गडद रंग असतात जे तुमचा लुक अतिशय सुंदर करतात. या साडीवर लहान लहान जरीचे बुट्टे असतात. शिवाय नेहमीच्या साड्यांच्या रंगांपेक्षा या साड्यांचे रंग थोडे वेगळे असल्यामुळे लग्नामध्ये नेसण्यासाठी महिलांना जास्त आवडतात. या साडीला इल्कल असंही म्हटलं जातं. ही साडी मूळची ‘इल्केकल्लू’ नावाच्या विजापूरजवळच्या गावातील आहे. एकदम तलम आणि मऊ मुलायम असणारी ही साडी गर्भरेशमी असते. मूळची कर्नाटकातील असूनही आता मात्र ही साडी संपूर्णतः महाराष्ट्राची झाली आहे. घराघरातील आजीकडे अशी साडी पूर्वी असे. पण आता महाराष्ट्रीयन लग्नामध्येही या साडीला महत्त्व प्राप्त झालं आहे. ही साडी यंत्रमाग आणि हातमाग अशी दोन्ही स्वरूपातील असून हातमागावर विणलेल्या साडीची किंमत जास्त असते. या साडीवरील कशिदादेखील खूपच प्रसिद्ध आहे. यावरून मराठीमध्ये ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला’ हे गाणंदेखील लिहिण्यात आलं होतं.  

ADVERTISEMENT

बंधेज साडी (Bandhej Sarees)

Bandhej Sarees
साड्यांचे प्रकार – बंधेज

आजकाल लग्नांमध्ये नेहमीच्या पारंपरिक साड्या नेसण्यापेक्षा वेगळ्या आणि पारंपरिक आणि आधुनिक लुक देणाऱ्या साड्यांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये राजस्थान आणि गुजरातची रॉयल बंधेज साडी सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. बंधेज साडी तुम्हाला रॉयल लुक देते आणि तुम्ही अधिक उठावदार आणि आकर्षकही दिसता. बांधेज अर्थात बांधणी साड्यांमध्येही खूपच विविधता आहे. मुळात या साड्या अगदी कमी किमतीपासून ते महाग अशा स्वरूपात मिळतात. त्यामुळे कोणत्याही वर्गातील महिलांना या साड्या विकत घेणे सोपे होते. तसंच याचा लुक अधिक रॉयल असल्यामुळे एखाद्या साडीची किंमत कमी असली तरीही ती जाणवत नाही. परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालत बांधेज साड्यांचा अप्रतिम लुक तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. 

शालू साडी (Marathi Wedding Sarees Shalu)

Marathi Wedding Sarees Shalu

आजही अनेक लग्नांमध्ये शालू (marathi wedding sarees shalu) या साडीचा प्रकार नेसला जातो. अनेकांना लग्नासाठी भरजरी शालू हा प्रकार आवडतो. लग्नामध्ये मुलीकडचे लोक बस्ता बांधताना शालूची निवड करतात. गडद रंगाचा हा शालू थोडा जड असतो. त्यामुळे बऱ्यापैकी कमी खरेदी केला जातो. कारण आजकाल मुलींना तितकी जड साड्या नेसायची सवय राहिलेली नाही. मात्र तरीही शालूची खरेदी लग्नाच्या वेळी करणं हे आजही तितकेच आनंददायी वाटते. 

नऊवारी साडी (Nauvari Saree)

Nauvari Saree
साडी प्रकार – नऊवारी

आजकाल नऊवारी साडीचे विविध प्रकार (sadyanche prakar) बाजारात शिऊन आपल्याला मिळतात. तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसायची हे माहीत नसलं तरी रेडीमेड नऊवारी नेसून तुम्ही या लुकला सुरूवात करू शकता. मात्र लक्षात ठेवा नऊवारी साडीचा रंग पारंपरिक आणि उठावदार असायला हवा. ज्यामुळे तुमचा लुकही सुंदर आणि साजरा दिसेल. शिवाय साडीचा काठ आणि कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर तुमचं फोटोशेन सर्वात हटके होईल. खण, पैठणी, इकरल, जिजामाता, राजमाता या प्रकारच्या नऊवारी साडी खूपच खुलून दिसतात. 

उपाडा सिल्क (Uppada Silk)

Instagram – साड्यांचे प्रकार – उप्पाडा सिल्क साडी

लग्नासाठी हल्ली उपाडा सिल्क साड्यांचाही पर्याय पाहिला जातो.  लग्नासाठी साडी म्हटलं की पूर्ण वेळ त्याचे वजन झेपेल की नाही तेदेखील पाहिले जाते. उपाडा सिल्क हा पर्याय त्यासाठी उत्तम आहे. नवरीला सांभाळायला हलकी आणि दिसायला मात्र तितकीच आकर्षक अशी ही साडी आहे. लग्नासाठी याचा पर्याय उत्तम ठरतो. तसंच यामध्ये विविध डिझाईन्सही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. 

ADVERTISEMENT

काठापदराची साडी (Kathpadar Silk Saree)

Instagram – साड्यांचे प्रकार – काठापदराची सिल्क साडी

काही जणांना लग्नात पारंपरिक साडी नेसावी असं वाटतं. त्यासाठी काठापदराच्या सिल्कच्या साडीचा पर्याय निवडला जातो. आपल्या आजीची साडी हादेखील त्यासाठी चांगला पर्याय ठेवतो. बऱ्याचदा लग्नामध्ये आई अथवा आजीचा आशीर्वाद हवा या भावनिक हेतूनेदेखील एखाद्या विधीच्या वेळी काठापदराची साडी हा उत्तम पर्याय निवडला जातो. यामुळे भावनाही जपली जाते आणि पारंपरिक लुकदेखील मिळतो. 

कोटा सिल्क साडी (Kota Silk Saree)

लग्नसमारंभासाठी कोटा सिल्क साडीचे प्रकारही नवरीला पर्याय म्हणून वापरता येतात. एखाद्या मुलीला जड साडी लग्नात सांभाळता येत नसेल तर कोटा साडी हा नवरीसाठी चांगला पर्याय आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी साडी निवडताना तुम्ही या साड्यांचीदेखी निवड करू शकता. 

तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे कशी कराल साडीची निवड (How To Choose Saree As Per Your Figure)

कोणत्याही नवरीसाठी साडीची निवड करणे हे तसं पाहायला गेलं तर कठीणच काम असतं. पण तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या आकाराप्रमाणे साड्यांचे प्रकार निवडले तर अधिक आकर्षक दिसतील आणि तुम्हाला तुमचा लुक फायनल करायला अधिक मदत मिळेल. 

पिअर शेप्ड बॉडी (Pear Shaped Body)

Pear Shaped Body

तुमच्या वरच्या शरीराच्या भागापेक्षा तुमच्या शरीराचा खालचा भाग अधिक मोठा असेल तर त्याला पिअर शेप्ड बॉडी असं म्हणतात. अशावेळी तुम्हाला लग्नामध्ये अथवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये शिफॉन (Chifon Saree) अथवा जॉर्जेटच्या साड्या (Georgette Sarees) नेसणे अधिक चांगले आणि फायदेशीर ठरते. तुमच्या शरीराचा खालचा आणि वरचा भाग योग्य दिसावा आणि संतुलित करण्यासाठी या साड्या तुम्हाला मदत करतात. तसंच तुम्ही साडी कशी नेसता यावरदेखील तुमचा लुक अवलंबून असतो. यामध्ये बोल्ड आणि ब्राईट रंगाची निवड तुम्ही करावी. तसंच याचा पदर तुम्ही सरळ काढल्यास, तुम्ही अधिक सुंदर दिसता. 

ADVERTISEMENT

अॅपल शेप्ड बॉडी (Apple Shaped Body)

ज्यांच्या शरीराचे पोट आणि खालचा भाग थोडा बाहेरच्या दिशेला आहे अशा शरीराला अॅपल शेप्ड बॉडी असं म्हणतात. अशा व्यक्तींना साडी नेसताना पोट तर दिसणार नाही ना असा प्रश्न असतो. नवरीच्या शरीराचा आकार असा असेल तर अशा नवरीने सहसा एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साड्यांची निवड करावी. ज्या साड्यांवर बोल्ड प्रिंट्स आहेत आणि मिसमॅच ब्लाऊज आहेत अशा साड्या अधिक उठावदार दिसतील. 

उंच आणि बारीक शरीर असणाऱ्या नवरी (Tall And Slim Body)

Tall And Slim Body

उंच आणि बारीक मुलींना कोणत्याही प्रकारच्या साड्या या लग्नात सुंदरच दिसतात. अगदी कॉटन साडीपासून ते शालू (marathi wedding sarees shalu) पर्यंत कोणत्याही साडीमध्ये या मुली आकर्षकच दिसतात. मात्र हेव्ही बॉर्डर, मोठ्या प्रिंट्स असणाऱ्या साड्यांना अशा मुलींनी प्राधान्य लग्नामध्ये द्यावे. यामुळे या मुली अधिक आकर्षक दिसतात. 

उंचीने लहान आणि जाड मुलींसाठी (Short And Fat Body)

उंचीने लहान आणि ज्या नवरी जाड असतात त्यांच्यासाठी शालू (marathi wedding sarees shalu) असल्यास, पैठणी असल्यास, बारीक काठाच्या असाव्यात. तसंच अधिक भरलेल्या साड्या अशा मुलींनी लग्नामध्ये नेसू नयेत.कारण त्यामुळे अधिक जाड दिसायला होतं. फोटोमध्ये अधिक भरल्यासारख्या या मुली वाटतात. त्यामुळे कांजीवरम अथवा अन्य शिफॉन, बंधेज साड्यांचा वापर करावा. 

संतुलित लुकसाठी (For Balanced Look)

एखाद्या नवरीला जास्त मेकअप लुक अथवा हेव्ही लुक आवडत नसेल तर संतुलित लुक ठेवण्यासाठी शिफॉन, लाईट सिल्क साडी अथवा हँडलूम साड्यांचा वापर करावा. तसंच नवरीसाठी गडद रंगाच्या साड्यांची निवड करावी. यासह तुम्ही पूर्ण हाताचा ब्लाऊज अथवा लाँग ब्लाऊज घातला तर तुम्हाला अधिक चांगला दिसून येईल. 

ADVERTISEMENT

लग्नामध्ये साडीलुक करण्यासाठी काही सोप्या टिप्स (Tips To Enhance Your Look In Saree For Wedding Function)

तुम्हाला साडी लुक हवा असेल अधिक आकर्षक तर तुम्ही काही टिप्स फॉलो करायला हव्यात – 

  • तुम्ही साडीवर हिल्स घालणार असाल तर लक्षात ठेवा साडी नेसताना तुम्ही आधीच हिल्स घाला आणि मग साडी नेसा. यामुळे तुमची साडी पायात अडकणार नाही आणि व्यवस्थित राहील
  • तुमची साडी कितीही सुंदर असली तरीही त्याच्या निऱ्या जोपर्यंत नीट येत नाहीत तोपर्यंत ती आकर्षक दिसणार नाही. त्यामुळे साडीच्या निऱ्या काढताना योग्य लक्ष द्या. त्याच्या निऱ्या व्यवस्थित आल्यानंतरच साडी खोचा 
  • साडी नेसल्यानंतर त्यासह योग्य दागिन्यांची निवड करा. अन्यथा साडीचा लुक खराब होतो
  • तसंच साडीसह तुम्ही कोणता क्लच अथवा बॅग घेणार आहात याचीही निवड योग्यरित्या करा. तुमच्या संपूर्ण लुकला साजेल अशाच अॅक्सेसरीजचा वापर तुम्ही करा 
  • साडीबरोबर तुम्ही ब्लाऊज मॅच करताना नीट विचार करा. हेव्ही साडीवर साधा ब्लाऊज ठेवा आणि साधी साडी असेल तर ब्लाऊज अधिक आकर्षक आणि हेव्ही ठेवा

लग्नसराईसाठी तुम्हीही यातील साड्यांचे प्रकार वापरून करू शकता अधिक आकर्षक लुक. लक्षात ठेवा या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स.

07 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT