ब्रायडल फॅशन आणि मेकअपमध्ये लाल रंगाला खास महत्त्व आहे. पूर्वी लग्नात प्रत्येक नववधू लाल रंगाचे वधूवस्त्र नेसत असे. मात्र आता फॅशनमध्ये अनेक बदल होताना दिसतात त्यामुळे लाल रंगासोबतच अनेक शेड नववधूच्या पेहरावात दिसून येतात. लग्नात नववधून लाल रंगाचा पेहराव केला नाही तरी बोल्ड लुकसाठी लाल रंगाची लिपस्टिक मात्र आवर्जून वापरली जाते. एवढंच नाही तर हळद, मेंदी, गृहप्रवेश, रिसेप्शन, लग्नानंतरचे पूजाविधी अशा सर्व कार्यक्रमात नवरी नेहमी लाल रंगाच्या लिपस्टिकचा लुक करते. पण रेड लिपस्टिक वापराताना नवरीवे काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर तिचा ब्रायडल लुक खराब होण्याची शक्यता आहे. यासाठी जाणून घ्या लाल रंगाची लिपस्टिक लावताना कोणती काळजी घ्यावी. यासोबतच वाचा 80+ Best नवरी लुक कॅप्शन मराठी | Navari Look Caption In Marathi, नवरीच्या मेकअप किटची खास यादी | Navricha Makeup Kit List, नवरीला साडी कशी नेसवावी (How to Drape Saree to Bride)
लाल लिपस्टिक लावताना लक्षात ठेवा या गोष्टी
लाल लिपस्टिक लावताना काही गोष्टी केल्या तर तुमचा लुक अधिक खुलून दिसतो.
- लाल लिपस्टिकमध्ये अनेक शेड असतात. त्यामुळे बाजारातून तुमच्या लग्नासाठी खास लिपस्टिक खरेदी करताना तुमच्या स्कीन टोननुसार शेड निवडा.
- लाल लिपस्टिकमध्ये बोल्ड शेड अथवा लिप कलर वापरताना लिप लायनरचा वापर करा.
- लाल लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना लिप बाम जरूर लावा. कारण त्यामुळे तुमचे ओठ मऊ राहतील आणि लिपस्टिक जास्त काळ टिकेल.
- रेड लिपस्टिकने बोल्ड लुक करताना लिपस्टिक नेहमी लिप ब्रशनेच ओठांवर लावा.
- लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना कन्सिलर अथवा फाउंडेशन लावल्यामुळे तुमचा लुक क्लीन आणि नीट नेटका दिसतो.
लाल लिपस्टिक लावताना काय करू नये
लाल लिपस्टिक लावताना काही गोष्टी टाळल्या तर तुमचा लुक नक्कीच बिघडणार नाही.
- लाल लिपस्टिक लावल्यावर त्यावर लिप ग्लॉस लावणं टाळा. कारण लिप ग्लॉस पसरला तर तुमचा लुक खराब होऊ शकतो.
- लाल लिपस्टिक लावून बोल्ड दिसायचं असेल तर ओठां व्यतिरिक्त इतर भागावर बोल्ड मेकअप ट्राय करून हायलाइट करू नका.
- लाल लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांची निगा राखण्यासाठी ओठ स्वच्छ करा. कारण फुटलेल्या ओठांवर लाल लिपस्टिक चांगली दिसत नाही.
- लाल लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही ओठांवर फाउंडेशन लावू शकता मात्र फाउंडेशनची शेड जास्त लाइट असता कामा नये, नाहीतर तुमच्या लिपस्टिकचा शेड बदलतो.
- ओठांवर लाल लिपस्टिक लावताना लिप लायनर जास्त उठून दिसेल असं लावू नका, नाहीतर तुमच्या ओठांचा शेप कृत्रिम वाटू लागेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक