ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
navari-look-caption-in-marathi

80+ Best नवरी लुक कॅप्शन मराठी | Navari Look Caption In Marathi

कोणत्याही मुलीसाठी खास दिवस असतो तो म्हणजे लग्नाचा. आपण नवरी होऊन सजून आणि श्रृंगार करून मस्तपैकी आपल्या मनाप्रमाणे या दिवशी सजतो. नवरीचा साज आणि तोरा लग्नाच्या दिवशी काही वेगळाच असतो. आजकाल नवरीसाठी खास फोटोशूटही करण्यात येते. प्रि-वेडिंग शूट असो अथवा लग्नातील फोटोग्राफी असो काहीतरी खास अशी थीम घेऊनही हे फोटोशूट करण्यात येते. वेडिंगचे बेस्ट फोटोग्राफरही असतात. पण हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेकदा इन्टाग्राम अथवा फेसबुकवर छानसे कॅप्शन लागते. पण प्रत्येक फोटोसाठी प्रत्येकाला वेगळी कॅप्शन सुचतेच असं नाही. नवरी लुकसाठी खास कॅप्शन मराठीत (Navari Look Caption In Marathi) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. तुम्ही नवरी असाल आणि तुम्हालाही काही खास कॅप्शन हव्या असतील तर तुम्ही यै लेखाचा वापर करून घेऊ शकता.

नवरीसाठी मराठी इन्स्टाग्राम कॅप्शन | Marathi Caption For Instagram For Bride 

नवरीसाठी मराठी इन्स्टाग्राम कॅप्शन | Marathi Caption For Instagram For Bride
नवरीसाठी मराठी इन्स्टाग्राम कॅप्शन

नवरीसाठी लग्नाचा दिवस असतो खास. महाराष्ट्रीयन नवरी नऊवारी साडीमध्ये अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये खूपच सुंदर दिसते. नऊवारी साडी कोट्सदेखील यासाठी वापरण्यात येतात. या खास दिवशी काढण्यात आलेले नवरीचे फोटोही खास असतात. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर काही खास कॅप्शनचा तुम्हीही करा वापर – 

1. सौभाग्यवती बनण्याचा नवा प्रवास…फक्त तू आणि मी 

2. सौ. बनण्याच्या मार्गावर…

ADVERTISEMENT

3. जोपर्यंत नवरी येत नाही तोपर्यंत पार्टी नक्कीच सुरू होत नाही

4. आजचा दिवस फक्त माझा अर्थात नवरीचा

5. आवाज कोणाचा…नवराईचा!

6. रंग ह्यो कोणता सांग नवराई गंं…तुला बघून होतोय नवऱ्याचा जीव वरखाली गं!

ADVERTISEMENT

7. आजच्या दिवशी सौंदर्य खुलविते खास, नवरीचा आहे लय न्यारा साज!

8. नऊवारी साडी सुंदर ल्याले मी आज…नजर ना लागो कुणाचीही आज!

9. पैठणीच्या साजात उठून दिसतोय नवरीचा माज!

10. नखरेल नथीची शोभा आणेल सौंदर्याला बहर…नवरीचा साज करेल नवऱ्याच्या मनावर कहर!

ADVERTISEMENT

नवरी लुक कॅप्शन मराठीत | Navari Look Caption In Marathi

नवरी लुक कॅप्शन मराठीत | Navari Look Caption In Marathi
नवरी लुक कॅप्शन मराठीत | Navari Look Caption In Marathi

नवरीचा लुक हल्ली केवळ महाराष्ट्रीयन लुक केला जातो असं नाही. तर अगदी लग्नकार्यासाठी लेहंग्यामध्येही नवरीचा लुक खुलून दिसतो. नवरी इतर दिवशी कशीही असो लग्नाच्या दिवशी मात्र अगदी खास दिसते आणि तिच्या या फोटोंसाठी नवरी लुक कॅप्शन मराठीत (Navari Look Caption In Marathi) आम्ही सुचवत आहोत. 

1. नवरीचा लुक पाहताच जाणवेल की सध्या हवेतच प्रेमाची हवा पसरली आहे…तुला पाहता मन हरवले आहे

2. तुझी बायको होण्यासाठी आता आतुर झाले आहे, आता अजिबातच वाट पाहू शकत नाही

3. नवरी म्हणून हा लुक आहे की नाही परफेक्ट? काय वाटतं Mr…?

ADVERTISEMENT

4. मी नवरी आहे आणि मला कोणत्याही दुसऱ्या फिल्टरची आज गरज नाही

5. अॅटिट्यूड, माज, तोरा काहीही म्हणा…पण नवरीसाठी हे सर्व नक्कीच गरजेचे आहे!

6. मी सध्या परीजगात आहे असंच मला वाटतंय …तुझी नवरी होणं हे यापेक्षा कमी नक्कीच नाही

7. जरीच्या साडीत सजून धजून…येई माझं सौंदर्य खुलून 

ADVERTISEMENT

8. पारंपरिक आणि आधुनिक दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे माझा लुक

9. मराठमोळं असं माझं सौंदर्य दिसतंय नवरीच्या लुकमध्ये अधिक खुलून!

10. इथून पुढचा सगळा प्रवास असेल तो तुझं नाव आणि तुझ्या साथीसह…हा लुक आहे आयुष्यभरासाठी आठवणीत राहणारा!

नवरीसाठी इन्स्टाग्राम कॅप्शन मराठीत 

नवरीसाठी इन्स्टाग्राम कॅप्शन मराठीत
नवरीसाठी इन्स्टाग्राम कॅप्शन मराठीत 

आजकाल अनेक ठिकाणी नवरीचे आणि अगदी नवऱ्याचेही खास फोटोशूट केले जाते. फोटो सर्वात जास्त अपलोड केले जातात ते इन्स्टाग्रामवर (Instagram Photo Caption). पण फोटो पोस्ट करताना नक्की काय कॅप्शन द्यायची असाही प्रश्न पडतो. मग त्यासाठी गुगल सर्च (Google Search) सुरू होतो. पण अनेकदा इंग्रजीमध्येच अशा कॅप्शन्स असतात. तुम्हीही तुमच्या नवरीच्या लुकसाठी मराठी कॅप्शन शोधत असाल तर तुम्ही नक्की योग्य जागेवर आला आहात. नवरीसाठी इन्स्टाग्राम कॅप्शन मराठीत 

ADVERTISEMENT

1. नवरीचा लुक इतका खास केल्यावर रडणंदेखील जीवावर येतं 

2. आयुष्यभर माझ्याबरोबर आता तू राहणार आहेस, त्यासाठी तुला ऑल द बेस्ट आणि अभिनंदन!

3. त्याने माझ्या मनाची चोरी केली आणि म्हणूनच मी त्याच्या आडनावाची चोरी करण्याचं ठरवलं आहे आणि अखेर आज तो दिवस आला जेव्हा मी आज नवरीच्या लुकमध्ये दिसतेय

4. नवरीचा लुक आणि हास्याचा, आनंदाचा दिवस!

ADVERTISEMENT

5. खा, प्या आणि लग्न करा!

6. इथून पुढे फक्त आणि फक्त आनंद!

7. आह!!! अखेर तो दिवस आलाच…

8. आयुष्यभरासाठी …लग्नाची बेडी!

ADVERTISEMENT

9. नवरीचा हा लुक फक्त फोटोसाठी नाहीये…आता मी गिफ्टही स्वीकारतेय हे लक्षात ठेवा!

10. काही वेळातच तुझी होईन म्हणता म्हणता…कायमची तुझी झाले!

नवरीसाठी फोटो कॅप्शन 

नवरीसाठी फोटो कॅप्शन
नवरीसाठी फोटो कॅप्शन 

कोणत्याही मुलीसाठी नवरी होणं म्हणजे आयुष्यात खास दिवस असणं होय. नवरीचा लुकही असतो खास. अशा खास नवरीच्या लुकसाठी नवरीसाठी फोटो कॅप्शन (Caption For Bride)

1. नवरीच्या लुकसाठी मेकअपने जो मला आत्मविश्वास दिलाय तो मला फारच आवडलाय

ADVERTISEMENT

2. माझं आयुष्य कदाचित परफेक्ट नसेल पण नवरीच्या लुकसाठी करण्यात आलेला हा मेकअप आहे परफेक्ट!

3. परफेक्ट साडी, परफेक्ट मेकअप आणि परफेक्ट लग्नाचा दिवस!

4. लाल रंग नवरीच्या आयुष्यात जी जादू घडवतो, तो कोणताच रंग घडवू शकत नाही

5. मी मनापासून आनंदी आहे आणि म्हणूनच या नवरीच्या लुकमध्ये अधिक सुंदर दिसत आहे

ADVERTISEMENT

6. नवरी असले म्हणून काय झालं, माझं प्राधान्य ठरलेलं आहे. सर्वात पहिले माझी स्किन, मग मेकअप आणि मग माझा नवरा!

7. नवरीचा लुक असावा असा की पाहातच राहावा!

8. फॅन्सी असं काहीच नाही… पण तू आहेस तर नवरी म्हणून मी कायमच सुंदर आहे!

9. मी तुझी आणि तू माझा!

ADVERTISEMENT

10. मला नशा करण्याची काहीच गरज नाही कारण तुझ्या प्रेमाची नशाच इतकी होती की आजचा लग्नाचा दिवस येऊन ठेपला आहे आणि मी आज नवरीच्या लुकमध्ये तुझ्यासमोर उभी आहे…आयुष्यात अजून काय हवं!

नवरी लुक स्टेटस कॅप्शन मराठीत  

नवरी लुक स्टेटस कॅप्शन मराठीत
नवरी लुक स्टेटस कॅप्शन मराठीत  

नवरीचा लुक स्टेटस कॅप्शन (Navari Look Status Caption Marathi) मराठीत ठेवण्यासाठी काही खास स्टेटस. 

1. मुलींसाठी हिरा सदैव महत्त्वाचा असतो असं म्हणतात पण आज नवरीच्या या लुकमध्ये आल्यानंतर तूच माझा खरा हिरा आहे हे जाणवलं

2. लहान लहान गोष्टींमुळेच आज हा मोठा दिवस येऊन ठेपला आहे…तुझी बायको होत असल्याचा आज अभिमान वाटतोय

ADVERTISEMENT

3. हे घडणारच होतं आणि म्हणूनच आपली भेट झाली…सौ आणि श्री

4. आपल्या आयुष्यातील पुढील पाऊल

5. माझं पाऊल आज जमिनीवर टेकतच नाहीये…कारण तुझ्याशी लग्न करण्याचं माझं स्वप्नं अखेर पूर्ण होतंय

6. मी, माझं आणि माझ्यापलीकडेही आज काहीतरी आहे…नवरीच्या या लुकनंतर यापुढे माझ्यासाठी सर्व काही तूच आहेस हे जाणवलं!

ADVERTISEMENT

7. तुझ्या आणि माझ्या संसाराच्या प्रवासाला सुरूवात…

8. नवरीचा साडी लुक आहे दर्जा, मला पाहून नक्कीच खूष होईल माझा सर्जा!

9. एक लाजरान् साजरा मुखडा, चंद्रावानी सजला गं…राजा…हसतोय असा की जीव माझा भुलला गं!

10. लावण्य म्हणजे साडी आणि त्यातही नवरीचा साडीतील लुक असेल तर मग फक्त चर्चाच चर्चा!

ADVERTISEMENT

निष्कर्ष – आम्हाला आशा आहे की, तुम्हाला आम्ही दिलेले नवरी लुक कॅप्शन मराठी | Navari Look Caption In Marathi नक्कीच आवडले असतील आणि तुम्ही हे स्टेटस आणि कॅप्शन तुमच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नक्कीच शेअर कराल…आम्हाला टॅग करायला मात्र विसरू नका. 

03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT