ADVERTISEMENT
home / Uncategorized
can-we-lose-weight-by-eating-poha-in-marathi

खरंच पोहे खाल्ल्याने वजन कमी होते का, काय आहे तथ्य

आठवड्यातून साधारण एक वेळा प्रत्येक घरामध्ये नाश्त्यासाठी पोहे केले जातातच. फार क्वचित कांदेपोहे अथवा बटाटेपोहे महाराष्ट्रीयन घरात तयार झाले नाहीत असं घडतं. काही जण पोहे साखर घालून थोडेसे गोड करतात, तर काही जण यामध्ये शेंगदाणे, शेव, कांदा आणि बटाटा, गाजर अशा भाज्यांचाही वापर करतात. पोहे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय झटपट नाश्त्यासाठीही महाराष्ट्रीयन डिश म्हणून पोहे हा अप्रतिम पर्याय आहे. पोहे हा एक पौष्टिक आहार आहे, यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, विटामिन्स याचा भरपूर भरणा असून वजन कमी करण्यास उपयोग करून घेता येतो. आपण सकाळच्या नाश्त्यात पोहे खातो. कारण हे आपल्याला शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व मिळवून देते आणि तुम्हाला वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही तुमच्या आहारात पोह्यांचा समावेश करून घ्यायलाच हवा. 

वजन कमी करण्यासाठी पोह्याचे फायदे (Benefits of Poha)

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये पोह्यांचा समावेश करून घ्यायला हवा. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत असतो. याशिवाय लोह, फायबर, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सचादेखील पोहे हा चांगला स्रोत आहे. पोह्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहाते आणि मग लवकर भूक लागत नाही. याशिवाय तुम्हाला एखादा पदार्थ पाहिल्यावर तो खायला हवा असंही वाटत नाही आणि त्यामुळे अतिरिक्त खाण्यापासून तुम्ही वाचता. वजन कमी करताना ऊर्जा साठवणेही गरजेचे असते. अशावेळी पोह्यांचा उपयोग होतो.

पोहे आहे पौष्टिक आहार 

पोह्यामध्ये अत्यंत कमी कॅलरी असते आणि त्याशिवाय जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. तसंच पोह्यामध्ये पोषण मूल्य 100 ग्रॅममध्ये 67.6 एमसीजी विटामिन ए, 1.9 मिलिग्रॅम विटामिन सी, 6.1 मिलिग्रॅम लोह आणि 79.7 मिलिग्रॅम फॉस्फोरसचे प्रमाण असते. वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत चांगले ठरते आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाजी मिक्स करून याचे पोषणाचे प्रमाणही वाढवू शकता. याशिवाय पोह्याचा नाश्ता हा अधिक स्वादिष्ट होतो. 

वजन कमी करण्यासाठी कसे खावे पोहे?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात पोहे खायला हवेत. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साधारण पाऊण प्लेट पोहे खावे. इतके पोहे खाल्ल्यानंतर बराच वेळ तुमचे पोट भरलेले राहाते. असं अजिबात नाही की, पोहे केवळ नाश्ता म्हणूनच खाता येतात. आपल्याला संध्याकाळच्या वेळीही बऱ्याचदा खूप भूक लागते आणि त्यावेळीही तुम्ही पोह्यांचा खाण्यात वापर करू शकता. तुम्ही दुपारच्या अथवा रात्रीच्या जेवणाच्या वेळीदेखील पोहे हा पर्याय वापरू शकता. यामध्ये केवळ प्रोटीन कमी प्रमाणात असते, पण यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

पोहे खाल्ल्यामुळे तुम्हाला चांगले पचन होते. बऱ्याच व्यक्तींना पचनाची समस्या असते, पण पोह्यात फायबर असल्यामुळे पोटाची स्वच्छता राखण्यास याची मदत मिळते आणि पोहे हे ग्लुटन फ्री (Gluten Free) असल्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांपासूनही सुटका मिळते. बरेचदा अन्न न पचल्यावर वजन वाढते. मात्र पचानाचा हा त्रास पोह्यांमुळे सुटण्यास मदत मिळते आणि वजनावर नियंत्रण राहण्यासही मदत मिळते.

तुम्ही पोह्याचा आपल्या आहारामध्येही वापर करून घेऊ शकता आणि वजन कमी करण्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT