ADVERTISEMENT
home / आरोग्य
tips-to-maintain-energy-during-the-weight-loss-in-marathi

वजन कमी करताना अशा पद्धतीने साठवा ऊर्जा, सोप्या टिप्स

स्वतःला निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. आजकाल वजन वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. वजन अधिक असेल तर अनेक पद्धतीचे आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः महिलांना आपल्या शरीराचा आकार बदलला की अधिक त्रास होताना दिसून येतो. आपले वजन जराही वाढले तरीही महिलांचा जीव वरखाली होताना दिसून येतो. पुन्हा एकदा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात महिलांचे काम सुरू होते. मात्र वजन कमी करताना अंगात शक्ती राहाते की नाही याचा बरेचदा विचार होत नाही. वजन कमी करताना शरीरातील ऊर्जा मात्र साठवली जात नाही आणि मग अशक्तपणाचा त्रासही होतो. वजन कमी करणे म्हणजे आपल्या डाएटमध्ये बदल करणे. पण डाएटमध्ये बदल करताना योग्य व्यायाम आणि नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याची गरज अधिक आहे आणि वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहे. वजन कमी करण्याच्या वेळी आपल्या कॅलरी काऊंटचाही विचार करायला हवा. वजन कमी करायचे म्हणून अनेकदा आपले आवडते पदार्थ आपण सोडून देतो अथवा उपवास करणे आणि अन्य गोष्टींकडे अधिक लक्ष देतो. मात्र त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा साठून राहात नाही याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वजन कमी करताना ऊर्जा कशा पद्धतीने साठवायची याबाबत तुम्ही काही महत्त्वाची माहिती घ्या. 

प्रोटीनकडे द्या अधिक लक्ष 

जेव्हा तुम्ही वजन कमी करता, तेव्हा योग्य प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे असते. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायला हवी की, तुमचे जितके वजन आहे, तुम्हाला तितके ग्रॅम प्रोटीन दिवसभरात आवश्यक असते. वास्तविक तुम्ही जेव्हा प्रमाणात प्रोटीन घेता, तेव्हा तुमचे पोट अधिक काळ भरलेले राहते आणि तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. वास्तविक प्रोटीन शरीरामध्ये हळूहळू पसरते. तसंच तुम्हाला प्रोटीनमुळे शरीरात ऊर्जा साठवून ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला पोट रिकामं असल्याची जाणीव होत नाही. 

पाणी अधिक प्या 

ही एक अत्यंत उपयुक्त टीप आहे, ज्याची तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी. शरीरामध्ये पाणी कमी झाल्यावर अधिक थकवा येतो आणि तुमच्या शरीरात एनर्जी राहात नाही. त्यामुळे तुम्हाला पाण्याचे अधिक सेवन करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिता, तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ पटकन बाहेर निघून जाण्यास मदत मिळते आणि तुम्ही अधिक प्रमाणात अॅक्टिव्ह राहाता आणि अत्यंत हलके वाटू लागते. पाणी अधिक प्रमाणात प्यायलास तुम्हाला वजन कमी करणे सोपे जाते आणि त्याशिवाय शरीरात ऊर्जा अधिक प्रमाणात राहाते. पाण्याशिवाय तुम्ही लिक्विड ज्युस अथवा अन्य लिक्विडचा उपयोग करून घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये फळांचा रस, नारळाचे पाणी, ताक आणि लिंबू पाण्याचा उपयोग करून घ्या. 

शरीरात ऊर्जा साठविण्यासाठी करा दह्याचे सेवन 

दह्याचा त्रास होत नसेल तर दही हे तुम्हाला अन्न पचविण्यासाठी अधिक मदत करते. दही एक प्रोबायोटिक आहे, तुमच्या शरीराला निरोगी राखण्यास याची मदत होते. तुमचे अन्न जेव्हा अधिक चांगल्या पद्धतीने पचते, तेव्हा तुमच्या शरीराला योग्य ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही नियमित दिवसातून कमीत कमी एक ते दोन वाटी दही खायला हवे. वजन कमी करताना याचा खूपच उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

चांगल्या फॅट्सना आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्या 

वजन कमी करताना तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी डाएटमध्ये तुम्ही चांगल्या फॅट्सचा वापर करून घ्यायला हवा. यामध्ये सीड्स, नट्स अर्थात शेंगदाणे, बदाम, अक्रोड यासारख्या पदार्थांचा समावेश करून घ्या. याचे सेवन केल्याने तुम्हाला सारखी भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे राहते. इतकंच नाही तर शरीराला योग्य प्रमाणात एनर्जी मिळते. 

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या टिप्स नक्की लक्षात ठेवा. या टिप्स तुम्ही वापरल्यास, तुमच्या शरीरात ऊर्जा साठविणे सोपे जाते आणि ऊर्जेची कमतरता जाणवत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT