ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
घरातले वातावरण प्रसन्न हवे? मग घरातल्या भिंतींना हेच रंग द्या.

घरातले वातावरण प्रसन्न हवे? मग घरातल्या भिंतींना हेच रंग द्या.

आपण नवे घर घेतले असेल आणि त्या घराची सजावट करायला घेतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्या मनात येतं ते म्हणजे घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांसाठी रंग निवडणे. जुन्या घरात थोडा चेंज हवा असेल तर आपण  सामानाची हलवाहलवी करतो आणि शक्य असेल तर हॉलला किंवा बेडरूमला नवा रंग देतो.  अश्या वेळेला योग्य रंगसंगती निवडणे खूप कठीण आहे.

केवळ आपल्याला एखादा रंग खूप आवडतो म्हणून आपण तो खोलीला देऊ शकत नाही. घराच्या बाबतीत रंगांची निवड करताना बऱ्याच बाबींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ खोलीतला प्रकाश, खोली लहान आहे की मोठी, बेडरुमला कोणता रंग द्यायचा, हॉलसाठी कुठले रंग निवडायचे, घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी कुठला रंग ठरवायचा इत्यादी! ह्याशिवाय एक महत्वाची गोष्ट देखील आपल्याला लक्षात ठेवावी लागते. ती म्हणजे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रकारचा मूड सेट करतात. घरात वेगवेगळ्या खोल्या विविध प्रकारे आपण वापरतो.प्रत्येक खोलीचा एक वेगळा मूड असतो हे लक्षात घेऊनच आपल्याला रंगांची निवड करायची असते. 

घर सजावट करताना वापरा थर्मल पडदे, घर दिसेल कूल

रंगांचा आपल्यावर काय परिणाम होतो?

ADVERTISEMENT

आपल्यापैकी बहुतेक जण खोलीच्या रंगाबद्दल विचार करण्यात फार वेळ न दवडता आपल्याला आवडतात ते रंग निवडून मोकळे होतात.पण खोलीचा रंग आपल्या मनःस्थितीवर आणि आपल्या विचारांवर परिणाम करू शकतो. तुम्हाला उबदार किंवा थंड वाटणे हे तुमच्या खोलीच्या कलर टोनवर अवलंबून असू शकते. उबदार रंगात रंगवलेली खोली आपल्याला कूल टोन्स असलेल्या खोलीपेक्षा जास्त उबदार वाटते. अर्थात हे आपल्याला केवळ मनाचे वाटत खेळ असले तरीही आपल्या दैनंदिन आयुष्यात रंग फार मोठी भूमिका बजावतात.  रंगांचा केवळ आपल्या मानसिक आणि भावनिक अवस्थेवरच नव्हे तर आपल्या शरीरावरही परिणाम  होतो.

धोका आणि हिंसा दर्शवणारा लाल रंग शारीरिक सतर्कता वाढवण्यासाठी ओळखला जातो. लाल रंग आपल्या मज्जासंस्थेला सक्रिय करतो आणि आपली हृदयगती वाढवतो तसेच आपल्या रक्तप्रवाहात ऍड्रिनॅलीनचे प्रमाण वाढवतो. म्हणूनच बेडरूमच्या भिंती कधीही लाल रंगाच्या असू नयेत. लाल रंग रोमान्सचा असला आणि रोमँटिक वातावरण असावे असे कितीही वाटले तरीही बेडरूमच्या भिंती लाल रंगांच्या असू नयेत. कारण बेडरूममध्ये आपण रिलॅक्स होऊन शांत झोपण्यासाठी जातो. लाल रंग आपल्याला रिलॅक्स होण्यात अडथळा आणू शकतो.  

घरासाठी रंग निवडताना या गोष्टी घ्या विचारात

कुठला रंग कुठल्या खोलीला द्यावा?

बेडरूममध्ये आपल्याला आराम करायचा असतो, रिलॅक्स व्हायचे असते. त्यामुळे ही खोली तुम्हाला शांत आणि आरामशीर वातावरण देऊ शकेल अशीच असायला हवी. तसेच जेवणाच्या खोलीत तुम्हाला अधिक चैतन्यशील आणि खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे जिथे सगळे कुटुंब एकत्र बसून गप्पागोष्टी करत जेवू शकेल. खोलीचे रंग हे असे विविध मूड सेट करण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच त्या त्या खोलीला अनुसरूनच आपण योग्य रंगांची निवड केली पाहिजे.

ADVERTISEMENT

तुम्हाला जर लाल रंग फारच आवडत असेल आणि घरात कुठेतरी वापरायचाच असेल तर तो डायनिंग रूमला किंवा लिविंग रूम/ हॉलला देऊ शकता. कारण लाल रंगामुळे खोलीची एनर्जी लेव्हल वाढते. तर नारंगी(ऑरेंज) रंगामुळे मनात उत्साहाची भावना निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्याच्या खोलीला किंवा व्यायामाच्या खोलीला तुम्ही ऑरेंज रंग देऊ शकता. पिवळा रंग आनंदाचे प्रतीक असल्याने तो रंग तुम्ही लिविंग रूमसाठी किंवा बाथरूम, किचनसाठी निवडू शकता. बेडरूमला  तुम्ही हलका गुलाबी, फिकट हिरवा, फिकट निळा, आकाशी किंवा फिकट जांभळा, लव्हेंडर असे रंग देऊ शकता. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीची रंगसंगती सुद्धा करू शकता.  

तर पुढच्या वेळी ही कलर सायकॉलॉजी लक्षात ठेवून रंग निवडा आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. 

अधिक वाचा –

कमी बजेटमध्येही सजवू शकता तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर, या टिप्स करा फॉलो

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

The Great Glamm Survey 

31 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT